' एक शिक्षिका शाहरुखला मिठी मारण्यासाठी नकार देते तेव्हा…. – InMarathi

एक शिक्षिका शाहरुखला मिठी मारण्यासाठी नकार देते तेव्हा….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लता दीदींच काल निधन झालं, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी वेळात वेळ काढून देशाचे पंतप्रधान मोदीजी उपस्थितीत राहिले, राजकीय मंडळींच्या बरोबरीने कलाकार मंडळी उपस्थितीत होती. त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सर्वजण हळूहळू येऊ लागले, सर्वांचं लक्ष होते ते कलाकार मंडळींकडे, ते किती दुःखी झाले आहेत यावर साऱ्यांच्या नजरा खिळून होत्या.

अखेर किंग खान दर्शनासाठी आला आणि त्याने आपल्या पद्धतीने आदरांजली व्हायली ज्याचा अनेकांनी चुकीचा अर्थ काढला…
शाहरूख आणि वाद हे समीकरणच बनून गेले आहे…त्याच्या हजरजबाबीपणामुळे तो अनेकदा वादात अडकतो, असाच एक किस्सा आजच्या लेखात जाऊन घेऊ…

 

 

“चलीये हम और आप शूरु करते है कौन बनेगा करोडपती!” आपल्या जेवणाच्या वेळेस टीव्हीवर लागणाऱ्या बच्चन साहेबांच्या दमदार आवाजातला हा आगळावेगळा टीव्ही शोची क्रेझ आजही तशीच आहे!

भारतीय टेलिव्हिजनवर सर्वात जास्त पाहिला जाणारा आणि पसंत केला जाणारा रीयालिटि शो कोणता असेल तर तो कौन बनेगा करोडपती!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :


हा शो २ गोष्टींसाठी लोकप्रिय होता त्यातली पहिली गोष्ट म्हणजे लोकांना सासू सुनेच्या टुकार मालिकातून डोकं खाजवायला वेळ मिळायचा यासाठी आणि दुसरं कारण म्हणजे अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावर दिसणार म्हणून!

 

amitabh kbc inmarathi

 

बच्चन साहेबांची हरवलेली ओळख मिळवून देण्यात या टीव्ही शोचा सिंहाचा वाटा होता!

मध्यंतरी काही काळ बच्चनजी काही कारणास्तव हा शो करू शकणार नव्हते, त्यामुळे त्यांच्या या लेगसीला पुढे नेऊ शकणारा एकमेव स्टार डोळ्यांपुढे होता तो म्हणजे किंग खान शाहरुख खान!

ठरल्याप्रमाणे अमिताभ यांच्यानंतर शाहरुखने या शोचा होस्ट म्हणून काम स्वीकारलं, शाहरुख हा ब्रॅंड मोठा होता त्यामुळे त्याला तसा मानमरातब आणि मानधन मिळणं अपेक्षितच होतं!

 

हे ही वाचा

===

 

आणि शाहरुखनेही त्याची कामगिरी चोख बजावलीच, बऱ्याच लोकांनी शाहरुखच्या सूत्रसंचालनावर टीका केली काहीनी त्याची तुलना थेट बच्चनशी केली, पण तरीही कसलाही फरक पडू न देता शाहरुखने केबीसीचं काम चोख केलं!

 

shahrukh in kbc inmarathi

 

शाहरुखच्याच केबीसीच्या सीझनमधल्या एका धमाल घटनेविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत!

२००७ च्या केबीसी सीझनपासून शाहरुखला मुख्य होस्ट म्हणून जवाबदारी देण्यात आली, तेंव्हाच एका एपिसोडमध्ये एक कॉनटेस्टंट म्हणून एक महिला शिक्षिका आली होती!

ती सिलेक्ट होऊन पुढचा गेमसुद्धा खेळायला तयार झाली होती, पण काही खासगी कारणास्तव तिला शाहरुख एक अभिनेता म्हणून न पटणारा होता आणि “मला तुम्ही फारसे आवडत नाही!” असं त्या शिक्षिकेने शाहरुखच्या तोंडावरदेखील बोलून दाखवलं होतं!

नंतर खेळात ती शिक्षिका एका प्रश्नावर अडली, तिला त्या प्रश्नाचे उत्तर येत नव्हते आणि तिच्याकडच्या सर्व लाईफलाईन्ससुद्धा संपल्या होत्या, त्यावर शाहरुखने त्यांना ऑप्शन दिला की त्या तो गेम तिथेच सोडून आहे ती रक्कम घरी घेऊन जाऊ शकता!

 

kbc contestant inmarathi

 

पण शाहरुख जेंव्हा केबीसी होस्ट करायचा तेंव्हा त्याची वेगळी स्टाइल होती वेगळा अंदाज होता, त्याचा गेम सोडून जाताना कॉनटेस्टंटला फक्त एवढच म्हणावं लागायचं “शाहरुख मुझे गले लगाओ!”

यामागे शाहरुखचा एकच उद्देश असायचा की समोरची जी व्यक्ति आहे तीच्यासोबत तो आनंद शेयर करता यावा!

पण हा नियम त्या शिक्षिकेला मान्य नव्हता, त्या शिक्षिकेने शाहरुखच्या तोंडावर सांगितलं की “मिस्टर खान मला हा खेळ इथेच थांबवायचा आहे, पण इथे येऊन तुम्हाला मिठी मारण्यात अजिबात रस नाही, त्यामुळे मी ते काही करणार नाही!”

यावर हजरजवाबी शाहरुखने जे काही केलं, ते तिथली जनता बघत बसली आणि तिथे शाहरुखच्या खऱ्या sarcasm ची लोकांना प्रचिती झाली!

खेळ संपवल्यानंतर दोघेही हॉटसीटवरून उतरले, शाहरुखने जिंकलेल्या रकमेचा चेक घेतला आणि त्या शिक्षिकेला कॅमेरासमोर उभ करून त्यांना एकच प्रश्न विचारला की “तुमची आई या शो मध्ये प्रेक्षक म्हणून बसली आहे तर मी हा चेक त्यांच्या हाती दिला तर चालेल का? कारण त्या नक्कीच मला मिठी मारून आशीर्वाद देतील!”

बास एवढं म्हणून शाहरुख प्रेक्षकांमध्ये शिरला आणि त्या शिक्षिकेच्या आईला मिठी मारून चेक देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन आला, त्या शिक्षिकेचा चेहरा आणि हावभाव नेमके काय होते ते तुम्ही या खालच्या व्हीडियो मध्ये बघू शकतो!

 

 

या सगळ्या घटनेवरून एक म्हण नक्की आठवते ती म्हणजे “आला अंगावर घेतलं शिंगावर”! शाहरुखने ज्या पद्धतीने हा सगळा प्रसंग जितक्या नाजुकतेने आणि कोपरखळ्या मारून हाताळला तो पाहून त्याच्या या हजरजवाबी पणाचे कौतुक नक्कीच करावेसे वाटते!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?