'या ४ सवयींमुळेच बिल गेट्स जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत स्थान मिळवू शकले

या ४ सवयींमुळेच बिल गेट्स जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत स्थान मिळवू शकले

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘अशक्य ते शक्य’ ही उक्ती ख-या अर्थाने जगणा-या अनेक व्यक्ती जगभरात आहेत. कला, क्रिडा, उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी लोकं ही कायमच आपली आदर्श ठरतात.

आयुष्य कसं जगावं? केवळ श्रीमंत नव्हे तर यशस्वी कसं व्हावं? याची बोलकी उदाहरणं समाजात दिसून येतात. स्वप्नाकडून सत्याकडे जाण्याचा हा प्रवास करणा-यांमध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचं नाव आवर्जून घेतलं जातं.

 

bill gates inmarathi

 

जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत आपलं अढळ स्थान राखलेल्या बिल गेट्स यांची यशोगाथा वाचताना त्यांनी यशाचं हे शिखर कसं सर केलं असेल? आपल्यालाही त्यांच्यासारखं यशस्वी, श्रीमंत बनता येईल का? असे विचार मनात आल्यावाचून रहात नाही.

प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात यशस्वी व्हाव, स्वतःची वेगळी ओळख निर्माण व्हावी, आपले कार्य हे इतरांसाठी आदर्श असावे आणि मुख्यत: आपल्या कामाचा योग्य मोबदला मिळून आपली तिजोरी कायम भरलेली असावी हे प्रत्येकाचं स्वप्न असतं.

मात्र केवळ असा विचार करून आपण यशस्वी होणार नाही तर त्यासाठी यशस्वी लोकांच्या सवयी, त्यांचे गुण यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि याप्रकारचा अभ्यास करण्यासाठी बिल गेट्स हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.

बिल गेट्सच्या अशा ४ सवयी, ज्या त्यांना इतरांपेक्षा अधिक वेगळं ठरवतात, त्यांचं व्यक्तीमत्व खुलवतात आणि त्यांना यशस्वी उद्योजक बनवतात, त्या इतरांनाही सहज अंगीकारता येतील.

बिल गेट्स यांच्या ४ सवयींचा रकानमंत्र हा विद्यार्थी, उद्योजक अशा प्रत्येकासाठीच उपयुक्त ठरतो.

जाणून घेऊयात त्यांच्या त्यांच्या या ४ सवयी ज्या तुम्हालाही भविष्यात निश्चित उपयोगी ठरू शकतात.

उत्सुकता आणि जिज्ञासु वृत्ती कायम ठेवणे

stay hungry, stay foolish हा स्टिव्ह जॉब्स यांचा कानमंत्र तुम्हाला ठाऊक असेलच. हीच सवय बिल गेट्स यांच्या व्यक्तीमत्वातील महत्वाची बाब म्हणून अधोरेखित होते.

एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात बिल गेट्स हे प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. भविष्याचा वेध घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. भविष्यात यशस्वी होण्यासाठी नेमके कोणते गुण आवश्यक आहेत? या प्रश्नावर गेट्स यांनी दिलेलं उत्तर तुम्हालाही नक्कीच फायदेशीर ठरु शकेल.

 

bill gates inmarathi

हे ही वाचा – बिल गेट्सच्या डोळे दिपवणाऱ्या यशामागे आहेत “या” ९ गोष्टी, ज्या सामान्य लोकांमध्ये अभावानेच आढळतात..!

बिल गेट्स म्हणतात, येणारा काळ हा जगभरातील तरुण, विद्यार्थी यांच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आला आहे. इंटरनेट, ऑनलाईन शिक्षण यांच्याबळावर विद्यार्थ्यांना हव्या त्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल, मात्र तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलात तरी जिज्ञासु वृत्ती कायम ठेवा.

कितीही शिकलो, पदवी मिळवली, एका नामांकित कंपनीची स्थापना केली तरी कधीही, कुठेही प्रश्न विचारण्यास मी नेहमी सज्ज असतो, यामुळेच सातत्याने नवी माहिती कळते.

 

question inmarathi

 

उत्सुकतेने प्रत्येक क्षेत्राकडे बघा, नव्या गोष्टींचा ध्यास घ्या आणि प्रत्येक बदलासाठी तयार रहा हा बिल गेट्स यांचा गुरुमंत्र प्रत्येकासाठी महत्वाचा आहे.

इतरांसाठी प्रेरणादायी नेतृत्व बनणे

तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा, आपली नोकरी, संघटना या ठिकाणी आपल्याला महत्वाचं पद, भुमिका मिळावी ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र त्यासाठी तुम्ही स्वतंत्र तयारी करता का?

याचं उत्तर जर नाही असेल तर बिल गेट्सची ही दुसरी सवय तुम्ही वाचायलाच हवी. बिल गेट्स यांच्या मते यशस्वी नेतृत्व तेच, जे इतरांना प्रेरणा देतं.

 

leadership inmarathi

हे ही वाचा – मुलांनी स्वत:च्या हिंमतीवर पैसा कमवावा – बील गेट्सचं प्रेरणादायी मृत्यूपत्र प्रत्येकाने वाचायलाच हवं!

तुम्ही केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार करत असाल तर तुम्ही कधीही यशस्वी नेतृत्व करू शकणार नाही, तर जी व्यक्ती आपल्या संस्थेतील प्रत्येकाच्या यशाचा विचार करते, त्यांना मेहनत घेण्यासाठी प्रोत्साहन देते, मार्ग दाखवते तोच यशस्वी लीडर!

तुम्हाला भविष्यात यशस्वी व्हायचं असेल तर उत्तम व्यक्तीसह यशस्वी नेतृत्व करण्याचं स्वप्न बघा आणि आजपासूनच त्यासाठी प्रयत्न सुरु करा असा सल्ला बिल गेट्स देतात.

कमतरतेला सामोरं जा

एक यशस्वी माणूस होण्यासाठी आपल्यातील गुणांसह अवगुणही ओळखणं गरजेचं आहे असं बिल गेट्स म्हणतात.

यासाठी स्वतःचंच उदाहरण देताना ते त्यांनी सांगतात, की त्यांना प्रत्येक काम स्वतःच्या पद्धतीनुसार करण्याची सवय होती. इतरांकडून काम करून घेणं, इतरांवर विश्वास ठेवणं या बाबी त्यांना जड जात होत्या. मात्र कंपनीचा विकास करायचा असेल तर इतरांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे ही बाब त्यांनी वेळीच स्वतःला समजावली तसेच स्वतःत तसा बदल घडवला.

 

bill gates team inmarathi

 

कोणताही माणूस शंभर टक्के गुणांसह जन्माला येत नाही, प्रत्येकात काही कमतरता असतेच, मात्र तुम्ही त्याकडे कसं पाहता? त्यात बदल घडवता की आहे त्या कमतरतेला कुरवाळत इतरांची सहानुभूती मिळवता? यावर तुमचं यश अवलंबून असतं.

आपला प्राधान्यक्रम ठरवणे

तुमच्यासाठी काय महत्वाचे आहे याचा प्राधान्यक्रम आपल्यालाच ठरवावा लागतो, यातही वेळेला प्राधान्य देणं सर्वाधिक महत्वाचं आहे.

तुमच्याकडे कितीही संपत्ती असली तरी तुम्ही त्याने वेळ विकत घेऊ शकत नाही, त्यामुळे हाती असलेल्या वेळेचा सदुपयोग करा ही शिकव बिल गेट्स वर्षानुवर्षांपासून देतात. 

 

time management inmarathi

 

वेळेचं योग्य नियोजन, प्राधान्यक्रमानुसार कामाची आखणी करणं महत्वाचं आहे.

बिल गेट्स स्वतःला दररोज, ” आत्ताच्या घडीला सर्वात महत्वाची गोष्ट कोणती ” ? असा प्रश्न विचारतात, त्यानुसार जे उत्तर मिळते तीच गोष्ट ते पूर्ण करतात.

त्यांची ही सवय आपणही अंगीकारली तर कामं खोळंबणं, महत्वाचं काम विसरणं किंवा वेळ वाया जाणं या तक्रारींना जागाच उरणार नाही.

बिल गेेट्स यांची ओळख जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील अग्रगण्य नाव अशी असली तरी हे स्थान मिळवण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे कष्ट, मेहनत यांबाबत मात्र फारशी माहिती घेतली जात नाही.

 

bill gates inmarathi

हे ही वाचा – आपली कन्या इजिप्शियन मुस्लिमाशी लग्न करणार हे कळताच बिल गेट्स म्हणाले…

यशस्वी लोकांच्या कथा वाचताना, त्यांचे गुण, चांगल्या सवयी आपणही स्विकारल्या, आत्मसात केल्या तर भविष्यात आपल्यासाठीही संधींची अनेक दारं खुली होऊ शकतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?