' या ८ प्रकारच्या लोकांशी मैत्री करणं म्हणजे स्वतःच्या भविष्याचं नुकसान करून घेणं – InMarathi

या ८ प्रकारच्या लोकांशी मैत्री करणं म्हणजे स्वतःच्या भविष्याचं नुकसान करून घेणं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मित्र आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा घटक असतात या मित्रांसोबत आपण अनेक विचित्र गोष्टी केलेल्या असतात आपण या मित्रांसोबत अनेक आठवणींमध्ये भागीदार असतो परंतु आपल्या ग्रुप मध्ये असे देखील काही मित्र असतात ज्यांच्या मुळे आपल्याला अनेक ठिकाणी नुकसान सहन करावं लागतं आज या लेखामध्ये आपण अशाच आठ प्रकारच्या मित्रांबद्दल जाणून घेणार आहोत….

आयुष्याच्या अनेक वळणांवर आपल्याला मित्रांची अनेक प्रकारे साथ मिळते काही मित्र आपल्यासाठी सर्व काही असतात मित्र आयुष्यभराचा धडा शिकवून जातात. त्यामुळे मित्र निवडणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे मित्र निवडताना असेच मित्र निवडा जे तुम्हाला प्रोत्साहन देतील, तुम्हाला वेगळ्या दृष्टिकोनातून जगाची ओळख करून देतील तुमच्यातील कमतरता दूर करून तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मदत करतील.

 

jay veeru inmarathi

 

आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची मित्रमंडळी वावरत असतात त्यामुळे त्यांच्यातील कुठल्या प्रकारचे मित्र आपल्याला नको आहेत हे ठरवलं की तुम्ही निश्चितपणे अनेक व्यक्तींशी मैत्री करू शकता.

आम्ही या लेखात तुमच्यासाठी अशा आठ प्रकारच्या मित्रांची यादी घेऊन आलो आहोत ज्यांच्यापासून तुम्ही अंतर राखलतं तर भविष्यात तुम्हाला मित्रांमुळे नुकसान सहन करावं लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात…

 

१. वापरून घेणारा मित्र :

हा मित्र तुमच्याशी गोड बोलतो तुमच्या सोबत वेळ व्यतीत करतो अगदी आठवड्याच्या शेवटी कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन देखील तयार करतो, पण त्याचे हे प्लॅन तोपर्यंतच तुमच्या सोबत टिकतात जोपर्यंत त्याला नवीन जोडीदार मिळत नाही.

एकदा का त्याला नवीन तुमच्यापेक्षा चांगला मित्र सापडला की तो तुम्हाला नंतर बोलणार देखील नाही. त्याचा कार्यभाग संपला की मग मात्र तो तुम्हाला विसरुन जाईल त्यामुळे अशा मित्रांपासून अंतर राखणे अत्यंत गरजेचे आहे.

friend 4 inmarathi

 

२. गरजेच्या वेळी तुमच्याशी संपर्क करणारा मित्र :

तुमच्या ग्रुपमध्ये देखील असा एक मित्र नक्कीच असेल जो तुम्हाला कधीही मदत करत नाही परंतु त्यांची अशी अपेक्षा असते की त्याने फोन केल्यावर किंवा मदत मागितल्यावर तुम्ही तुमच्या हातातील सर्व काम सोडून त्याला मदत.

 

friend 8 inmarathi

 

मित्रांनो लक्षात घ्या अशा मित्राशी संबंध ठेवत असताना तुम्हाला काही मर्यादा पाळणे गरजेचे आहे नाहीतर असे मित्र त्यांच्या कामासाठी तुमची संपूर्ण एनर्जी वाया घालवतील.

 

३. नकारात्मक ऊर्जा देणारा मित्र :

अशाप्रकारचे मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतात यांच्याकडे सर्व गोष्टी समाधानकारक असतात तरीही यांना आणखी हवं असतं. आणि याच हव्यासापोटी ते तुम्हाला जगाच्या बाबतीत नकारात्मक गोष्टी सदैव दाखवत राहतात. यामुळे तुमची विचार करण्याची पद्धत देखील नकारात्मक होण्याचा धोका असतो त्यामुळे अशा मित्रांना वेळीच ओळखून यांच्यापासून अंतर राखणे अत्यंत गरजेचे आहे.

 

negative inmarathi

हे ही वाचा – या १० पैकी एकही गुण असलेल्या व्यक्तीशी चुकूनही लग्न करु नका. पश्चाताप होईल!

४. नेहमीच अडचणीत असणारा मित्र :

हा मित्र नेहमीच अडचणीत असतो त्याच्याशी कधीही संपर्क करा तो कुठले तरी अडचणीत अडकलेला असतो आणि गरज नसतानाही तुम्हाला त्या अडचणीचे कथा ऐकवतो. त्या कथादेखील एवढा नाट्यमय असतात की आपल्याला वाटतं की देवाने जगातील सर्व दुःख याच्याच नशिबात दिले आहेत की काय. पण मित्रांनो, आपल्या दुःखाचे भांडवल करायची सवय लागलेल्या या मित्रांमध्ये कधीही बदल होणार नाही हे लक्षात घ्या.

frind 9 inmarathi

 

 

ते आयुष्यात सुखी जरी असले तरीही त्यात देखील त्यांना काहीतरी अडचण दिसेल आणि त्याची कथा ते तुम्हाला परत ऐकवतील त्यामुळे अशा मित्रांना तुम्ही जवळ करणार नाहीत याची काळजी घ्या

 

५. प्रत्येक गोष्टीत चुका काढणारा मित्र :

हा मित्र अत्यंत स्वार्थी आणि स्वतःचा विचार करणार असतो. तो सर्वांसमोर तुमच्या वागण्यातील बोलण्यातील चुका काढतो आणि तुम्हाला टोमणे मारतो.

 

friend 7 inmarathi

 

तो तुम्हाला मारलेले टोमणे तुमच्या मागे देखील मित्रांना विनोद म्हणून सांगत असतो. अशा मित्रांना नेहमीच दुर्लक्ष करण्याऐवजी काही अनुभवानंतर त्यांच्यापासून अंतर राखलेलं कधीही चांगलं, असे मित्र कधीच तुम्हाला आयुष्यात कुठलाही चांगला सल्ला देणार नाहीत. त्यामुळे अशा मित्रांपासून दूर गेलेलं केव्हाही चांगलं.

 

६. नेहमी चर्चा करणारा मित्र :

आपल्या ग्रुपमध्ये एक मित्र नक्कीच असा असतो जो नेहमीच कुठल्या न कुठल्या तरी विषयावर चर्चा घडवून आणतो किंवा काहीतरी नवीन अफवेला खतपाणी घालत असतो, कुठल्यातरी मित्राची त्याच्या गैरहजेरीत टिंगल-टवाळी करत असतो.

 

friend 2 inmarathi

हे ही वाचा – “मी तुला चांगला मित्र समजते रे” : हे काही मुलांच्या नशिबातच असतं का? कुठे चुका होतात? समजून घ्या

मित्रांनो लक्षात घ्या जर असा मित्र दुसऱ्याची टिंगल टवाळी करत असेल तर कधी न कधी तरी तो तुमच्या गैरहजेरीत तुमच्या बद्दल देखील टिंगल टवाळी करू शकतो. त्यामुळे शा मित्राला ओळखून त्याच्यापासून अंतर ठेवा.

७. टुकार मित्र :

हा असा मित्र असतो ज्याच्या पासून लांब राहण्याचा सल्ला अगदी लहानपणापासून आपले आई वडील आणि नातेवाईक आपल्याला देत असतात. काही जणांना अशा मित्रांसोबत राहायला वेळ घालवायला मजा येते परंतु लक्षात घ्या यांच्या सोबत राहणं तुमच्यासाठी जोखमीचा आहे.

 

friend 3 inmarathi

 

अशा मित्रांसोबत राहिलात तर एक दिवस तो तुम्हाला कुठल्यातरी प्रकरणात नक्कीच अडकवेल, कदाचित तुम्हाला अडकवायचा त्याचा उद्देश नसेल ही, तरीही अशा मित्रा सोबत राहाल तर तुम्ही कधीतरी गोत्यात येणार हे नक्की, मग धोका माहिती असतानादेखील अशा मित्रांसोबत मैत्री ठेवण्यात काही अर्थ आहे त्यामुळे आपल्या मित्रांच्या यादीत अशा प्रकारची मित्र नसलेली केव्हाही चांगले.

 

८. बालिशपणा करणारा मित्र :

आपल्या ग्रुपमध्ये असा एक मित्र नक्कीच असतो जो अत्यंत बालिश वर्तन करतो. त्याचा आपल्या भावनांवर आणि पृथ्वीवर कुठल्याही प्रकारचा ताबा नसतो.

 

friend 6 inmarathi

 

जर तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये जेवायला गेलं तर तो चित्रविचित्र आवाज काढून संपूर्ण हॉटेलचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतं आणि त्याच्या या कृत्यामुळे तेथील लोक त्याच्या सोबतच तुमच्या ग्रुपला देखील नाव ठेवतात मित्रांनो असे मित्र आपल्या मित्र यादीत नसावेत.

===

हे ही वाचा – या दोन मित्रांच्या प्रयत्नांमुळे स्वयंपाकघरात जेवणासह ‘आत्मविश्वासाचा सुगंध’ दरवळला…

====

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?