' भारतातील एकमेव शहर जिथे धर्म, पैसा, राजकारणाशिवाय गुण्यागोविंदाने लोकं राहतात!

भारतातील एकमेव शहर जिथे धर्म, पैसा, राजकारणाशिवाय गुण्यागोविंदाने लोकं राहतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे…ही साने गुरुजींनी लिहीलेली प्रार्थना असो किंवा ज्ञानोबा माऊलींनी लिहीलेली विश्व कल्याणाची प्रार्थना असो, सर्वांना जग सुखी आणि सुंदर व्हावं, जगातील लोकांनी एकमेकांशी प्रेमाने, बंधुभावाने आणि सलोख्याने रहावे असंच वाटतं.

जगात पावला पावलावर चालणारी कट कारस्थानं, माणसांची होणारी हत्त्या हे सगळं कोणाही सहृदय माणसाला व्यथित करुन जाणारं आहे. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे.. दे वरची असा दे अशी प्रार्थना संत तुकडोजी महाराज करतात ती याचसाठी.

जगातील सर्व दुःखी कष्टी माणसे, गरीब श्रीमंत, काळा गोरा हा भेद नष्ट व्हावा हे पूर्वापार संतसज्जनांना वाटत आलं आहे. ते तसं व्हावं यासाठी पण कितीतरी प्रयत्न करणारी माणसं पण होऊन गेली.

 

discrimination inmarathi

 

कधी त्यात समाजानं खोडा घातला, कधी धर्मानं विरोध केला तर कधी राजकारण आडवं आलं आणि असं एकत्रित सुखी आणि समाधानी समाजाचं चित्र काही उभं राहिलं नाही.

भारतामध्ये तर अठरा पगड जाती, जमाती.. जवळपास आठशे भाषा.. वेगवेगळे धर्म, हजारो रीती रिवाज हे सगळं पाहता असं एकत्रित समाजाचं चित्र उभं करणं अतिशय अवघड आहे असंच वाटतं.

पण प्रायोगिक तत्त्वावर अशी एक टाऊनशिप भारतात उभी राहिली आहे. तिथं कसलंही धर्माचं, पैशाचं, राजकीय पक्षाचं वर्चस्व नाही. दारिद्रय, चोरी हे काही काही नाही. बस.. माणूस ही एकच जात, माणूसकी हा एकच धर्म आणि मानव्य हा एकच पक्ष! आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे!

योगी अरविंद यांनी स्थापन केलेली आॅरोव्हिले ही नगरी. आदर्श पण अव्यवहार्य कल्पना आहे असं मानलं जाईल अशी पण वास्तवात असलेली ही नगरी अस्तित्वात आहे.

१९६८ साली स्थापन करण्यात आलेली आॅरोव्हिले ही नगरी ‘पहाटेचं गाव’ म्हणून पण ओळखली जाते. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं कुणीही शासक नाही. इथं कसलेही कायदे नाहीत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा फक्त ८२५ रहिवासी असलेला देश! या अज्ञात गोष्टी तुम्हालाही भुरळ घालतील

===

 

auroville inmarathi

 

कसलेही नियम नाहीत, पण तरीही नागरिक सगळे नियम पाळतात, प्रेमानं एकमेकांसोबत मिळून मिसळून राहतात, आणि इथं शिक्षण आणि संशोधन यांना जास्त महत्त्व दिलं जातं.

आॅरोव्हिले ही दक्षिण भारतात वसलेली आहे. याचा काही भाग तामिळनाडू आणि काही भाग केंद्रशासित प्रदेशात पुद्दूचेरीमध्ये येतो. आॅरोव्हिला योगी अरविंद आश्रम यांचा प्रकल्प म्हणून ओळखला जातो.

आॅरोव्हिलाची स्थापना २८ फेब्रुवारी १९६८ या दिवशी झाली. ही कल्पना मीरा अल्फान्सा यांची. मीरा अल्फान्सा या योगी अरविंद यांच्या सहकारी होत्या.

त्यांचा या संकल्पनेवर नितांत विश्वास होता..की कसलेही नियम, नियंत्रण शासन धर्म नसले तरीही माणूस चांगूलपणाने, प्रामाणिकपणे राहू शकतो. भारतात याच विचाराचा, कल्पनेचा जागर व्हावा ही त्यांची इच्छा होती. सर्व धर्मांचे, जगातील सर्व देशांचे लोक इथं राहू शकतात..नव्हे राहतात.

 

mira alfaasa inmarathi

 

आॅरोव्हिले हे गाव भविष्यातील पृथ्वीवरील मूलभूत सुविधा असलेलं गांव आहे. हे असं एक गाव आहे, जिथं लोक अतिशय सलोख्याने..प्रेमाने बंधुभावाने राहतात.

आॅरोव्हिले या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावाची बांधणी, रचना. अगदी पध्दतशीरपणे वसवलेल्या आॅरोव्हिलेची रचना आकाशगंगेसारखी केली आहे.

आॅरोव्हिले या गावात असलेले रहिवासी जवळपास पन्नास देशांतून आले आहेत. सर्व वयोगटातील, वेगवेगळ्या समाजातील, वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील, वेगवेगळ्या संस्कृतीमधील हे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

हे गाव वसवताना पन्नास हजार लोक रहावेत अशी रचना केली आहे. मात्र तिथे केवळ २५०० कायमस्वरूपी राहणारे लोक आहेत. तर ५००० लोक दरवर्षी प्रवासी म्हणून येऊन भेट देऊन जातात.

खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आॅरोव्हिले इथे कोणताही धर्म नाही. खरेखुरे निधर्मी शहर आहे हे! इथं फक्त सत्य हाच ईश्वर आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात मातृमंदिर आहे. इथं जाऊन योगसाधना केली जाते. इथे एका वेळी साधारण १०० लोक योगसाधना करु शकतात.

 

auroville 2 inmarathi

 

अजून एक आश्चर्याची बाब म्हणजे आॅरोव्हिले इथे कोणीही शासक नाही, कोणताही कायदा नाही, कुणी प्रशासक नाही, कसलेही लेखी कायदे इथे नाहीत!

हे गांव केवळ एकाच सत्यावर चालतं…एकमेकांशी प्रेमाने बंधुभावाने वागावं! इथं शिक्षण आणि संशोधन यांना प्राधान्य दिलं जातं.

पण इथे गेस्ट हाऊस, सभागृह आहे, संशोधन केंद्र आहे..उच्च तंत्रज्ञान असलेले सुपर कॉम्प्युटर, इंटरनेट आहे. इथे सामूहिक शेती केली जाते. १६० हेक्टर क्षेत्रावर असलेली शेती येथील लोकांचे पोटपाणी सहज सांभाळते.

त्याहून जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे या गांवात पैसा वापरला जात नाही. आजही इथं वस्तूविनिमय केला जातो. इथं एक विनिमय केंद्र आहे, जिथं नागरिकांना आणि प्रवाशांना जेवण दिलं जातं.

===

हे ही वाचा हिमालयातील या गावाबद्दलच्या काही गोष्टी तुम्हाला कदाचित माहित नसतील! वाचा

===

१९७० पासून इथं झाडं लावून हा पट्टा हिरवागार करुन टाकला. त्यामुळे इथं प्रदूषण जवळजवळ नाहीच. ताजी, शुद्ध हवा, मनमोहक निसर्ग यांनी आॅरोव्हिले अतिशय सुंदर बनला आहे.

 

 

इतकंच नव्हे तर इथं सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प आहे. ज्यामुळे पाण्याचा पुनर्वापर केला जातो. इथली घरंही स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना म्हणून पाहीली जातात.

प्रायोगिक तत्त्वावर बांधून परत त्यात बदल सुधारणा केल्या जातात. साधनसामुग्रीचा पुनर्वापर आणि प्रक्रिया यांवर आधारलेले आॅरोव्हिले येथील जीवनशैलीचे तत्त्व आहे.

सरकारी, धार्मिक, पक्षीय, कसलाही हस्तक्षेप नसलेलं आॅरोव्हिले खरोखर आदर्श शहर आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?