' आजही या किल्ल्यावर ऐकू येतात ७ तरुणींच्या किंकाळ्या...!!

आजही या किल्ल्यावर ऐकू येतात ७ तरुणींच्या किंकाळ्या…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

चित्रपट कथांमधे तुम्ही शापित आणि भुताटकीनं भारलेल्या जागांविषयी बरेचदा पाहिलं, वाचलं, ऐकलं असेल. मात्र उत्तर प्रदेशातील ताबेलहट किल्ल्यात प्रेतात्म्यांचा वावर असून आजही तरूण मुलींच्या किंकाळ्या ऐकू येतात असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

रात्री अपरात्री आणि कधी कधी तर दिवसाउजेडी सुद्धा या किंकाळ्या ऐकल्याचं अनेकांनी ठामपणे सांगितलं आहे. या किंकाळ्यांमागचं कारणही अतिशय ह्रदयद्रावक आहे.

काही काही वास्तू आपल्या पोटात अनेक रहस्यं घेऊन उभ्या असतात. उत्तर प्रदेशातील तालबेहट गावात एक दोनशे वर्ष जुना पुरातन किल्ला आहे. या किल्ल्याच्याबाबतीतल्या अनेक भयकथा परिसरात प्रसिध्द आहेत.

 

talebhat inmarathi

 

असं म्हणतात की आजही या किल्ल्यात रात्रीच नाही, तर दिवसाढवळ्या जायलाही लोक घाबरतात. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या किल्ल्यात दीडशे वर्षांपूर्वी अशी एक घटना घडली आहे, जिच्यामुळे हा किल्ला शापित बनला आहे.

या घटनेची साक्ष देतात किल्ल्याच्या दारावर असणारी सात तरूणींची चित्रं. आजूबाजूच्या गावातील महिला दरवर्षी अक्षय्य तृतियेला या मुलींच्या चित्रांची पूजाही करतात आणि त्यांच्या आत्म्यांच्या मुक्ततेसाठी प्रार्थना करतात.

 

talbehat 7 girls inmarathi

 

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार १८५० च्या आसपास ललितपूर राज्याच्या बानपूरचे महाराज होते मर्दनसिंह. त्यांचं तालेबाहटला नियमित येणं जाणं असायचं. यामुळेच तालेबाहटमधे त्यांनी एक स्वतंत्र आणि खास महालही बनवला होता.

त्याच महालात त्यांचे वडील प्रल्हाद हे सुद्धा वास्तव्यास होते. राजा मर्दनसिंह यांनी १८५७ च्या चळवळीत राणी लक्ष्मीबाई यांना साथ दिल्याच्या कथा सांगितल्या जातात. त्यांना एक योध्दा आणि क्रांतिवीर म्हणून ओळखलं जातं.

दुर्दुवाची बाब अशी, की एका बाजूला मर्दनसिंह यांचं नाव जिथे आदरानं घेतलं जातं, तिथे त्यांचे वडील प्रल्हाद यांनी मात्र या राजघराण्याला कलंक लागेल अशी कृष्णकृत्यं केली. सार्‍या बुंदेलखंडात या महाराज प्रल्हादांमुळे राजघराण्याची नाचक्की झाली.

===

हे ही वाचा – अंधेरी मार्ग, खंदक…यामुळे मराठवाड्याची शान असलेला अभेद्य किल्ला! 

===

नेमकं असं काय घडलं होतं या किल्ल्याच्या भक्कम भिंतींच्या आत?

इथल्या स्थानिक परंपरेनुसार परिसरातील स्त्रिया अक्षय्य तृतियेला राजाकडे शगून मागायला जात असत. या परंपरेनुसार तालबेहट राज्यातील सात तरुणी राजा मर्दनसिंह यांच्या या किल्ल्यात शगून मागायला मोठ्या आनंदात गेल्या. त्यावेळेस महाराज मर्दशनसिंह नव्हते पण महाराज प्रल्हाद मात्र होते.

किल्ल्यात त्यावेळेस फार कोणी नव्हतं. या सुंदर तरूणींना बघून महाराज प्रल्हाद यांची मती फिरली. त्यांनी पहारेकर्‍यांना आदेश दिले आणि या सातहीजणींना बंदी केलं. त्यानंतर त्यांच्यावर बलात्कारही केला. राजाकडून असा अन्याय झाल्यावर न्याय तरी कोणाकडे मागणार? झालेल्या घटनेनं लज्जीत अशा त्या तरूणींनी किल्ल्याच्या तटबंदीवरून उड्या मारून स्वत:चा जीव दिला.

 

talbehat wall inmarathi

 

या घटनेनंतर आजुबाजूच्या गावात हाहाकार माजला. लोक संतापले. मात्र राजाच असा अन्यायी झाल्यावर लोकांनी संतापून करायचं तरी काय? जनमानसातला हा संताप लक्षात घेऊन आणि वडिलांनी केलेल्या कृत्याचा थोडाफार तरी पश्चात्ताप म्हणून, या मुलींना श्रध्दांजली वहाण्याच्या उद्देशानं राजा मर्दशनसिंह यांनी किल्ल्याच्या मुख्यद्वारावर सात तरूणींची चित्रं रेखाटली. ही चित्रं आजही पहायला मिळतात.

देशभरात अक्षय्यतृतिया शुभ मानली जाते. साडे तीन मुहुर्तापैकी एक असा हा दिवस ललितपूरमधे मात्र अशुभ, काळा दिवस मानला जातो. या दिवशी कोणतंही चांगलं कार्य या गावात होत नाही.

इतक्या पिढ्यांनंतर आजही गावातील महिला या दिवशी किल्ल्यात येऊन या सात चित्रांची पूजा करतात. असं करण्यामागचं कारण हे सांगितलं जातं, की किमान या पूजेमुळे अजूनही त्यांची आठवण गावाला आहे, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव आहे हे त्या आत्म्यांपर्यंत पोहोचतं आणि त्यांच्या आत्म्याला थोडीफार तरी शांती मिळते.

 

talbehat girls soul inmarathi

 

स्थानिकांच्या मते आजही सात मुलींच्या किंकाळ्या किल्ल्यातून ऐकू येतात. जिवंतपणी नरकयातना भोगलेल्या या मुलींच्या आत्म्याला अजूनही मुक्ती मिळालेली नाही. वेळीअवेळी किल्ल्यातून मुलींच्या किंकाळ्यांचे आवाज येतात. हा किल्ला यांच्या आत्म्यानं ताब्यात घेतला आहे असं स्थानिकांचं मत आहे.

===

हे ही वाचा – दूरून स्पष्ट दिसणाऱ्या या किल्ल्याजवळ जाताच तो क्षणार्धात चक्क दिसेनासा होतो…!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?