' हे ५ चित्रपट आजच्या काळात रिलीज झाले तर, त्यांना ‘बॉयकॉटचा’ सामना करावाच लागेल – InMarathi

हे ५ चित्रपट आजच्या काळात रिलीज झाले तर, त्यांना ‘बॉयकॉटचा’ सामना करावाच लागेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बॅन आणि बायकॉट हे शब्द आपल्याला नवीन राहिले नाहीत. सध्या आपल्या लोकांची मानसिकता इतकी विचित्र झाली आहे की त्यांच्या मताशी मिळतं जुळतं मत मांडलं गेलं नाही तर लगेच ते मत दाबलं जातं, त्या गोष्टींवर बॅन आणायची भाषा केली जाते!

सिनेमाक्षेत्रात आपण हा बॅन आणि बायकॉट काही वर्षांपासून प्रचंड अनुभवला आहे. शाहरुख आमीरच्या असहिष्णतेच्या टिप्पणीपासून संजय लीला भन्साळीच्या पद्मावत पर्यंत आपण कित्येक फिल्म्सवर बहिष्कार घाला हे आपण बऱ्याचदा ऐकलं आहे!

ताजं उदाहरण द्यायचं झालं आर नेटफ्लिक्सच्या बॉम्बे बेगम्स या सिरिज वरून उद्भवलेला वाद आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातून या सिरिजच्या बॅनसाठी होणारी मागणी!

 

bombay begums inmarathi

 

या सिरिज मधल्या काही विचित्र पात्रांमुळे, विवाहबाह्य संबंधांमुळे, आणि मासिक पाळीच्या बीभत्स चित्रणामुळे लोकांनी ही सिरिज दाखवणं बंद करावं किंवा अशा कंटेंटवर बहिष्कार घालावा अशी मागणी केली आहे!

ओटीटीच्या बाबतही हे पहिल्यांदाच होतंय असं नाही, सेक्रेड गेम्स, मिर्जापुर, अ सुटेबल बॉय, तांडव अशा कित्येक सिरिजच्या बाबतीत आपण हे असे पडसाद उमटलेले पाहिले आहेत!

===

हे ही वाचाखुद्द भारतात बॅन झालेले पण जगभरात नावाजलेले १० भारतीय चित्रपट

===

या सगळ्यामागे एकमेव कारण ते म्हणजे सोशल मीडिया. सध्या सोशल मीडिया आणि खासकरून फेसबुकसारख्या माध्यमातून सामान्यातला सामान्य माणूससुद्धा प्रत्येक छोट्या गोष्टीवर व्यक्त होत असतो, आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी आपल्याला सर्रास ऐकायला मिळत असतात!

पण काही वर्षांपूर्वी असे काही सिनेमे आपल्या देशात मोठ्या पडद्यावर रिलीज केले गेले, ज्यांच्याबाबतीत खरंतर बॅन, बायकॉट हे घडणं अपेक्षित होतं, पण ते तसं न होता ते सिनेमे बॉक्स ऑफिसवर हीट झाले आणि करोडो रुपयांची कमाई देखील केली!

आज आपण अशाच काही फिल्म्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आजच्या काळात रिलीज केले गेले तर ते सरसकट बायकॉट होतील!

१) हैदर (२०१४) :

 

haider inmarathi

 

विशाल भारद्वाज या हुशार दिग्दर्शकाने शेक्सपिअरच्या हॅम्लेटला काश्मीरच्या खोऱ्यात नेऊन एक वेगळच कथानक लोकांसमोर आणलं. सिनेमा होता हैदर, काश्मीरमधल्या मिलिटंटच्या अवतीभोवती फिरणाऱ्या या सिनेमावर त्या वेळेससुद्धा टीका झाली.

पण एकंदरच तब्बू, शाहिद कपूर, के के मेनन सारखी तगड्या कलाकारांचा अभिनय आणि कथेमुळे लोकांना सिनेमा आवडला आणि हीट झाला!

शेक्सपिअरच्या हॅम्लेटचं adaption जरी असलं तरी काश्मीरमधलं राजकीय वातावरणाचं चित्रण, तिथल्या हाल्फ विडो बायकांचं वास्तव हे सगळं उघडपणे मांडलं जरी असलं तरी पत्थरबाज लोकांचा उदात्तीकरण आणि भारतीय आर्मीचं नकारात्मक चित्रण हे सुद्धा या सिनेमाचे काही निगेटिव्ह पॉईंट्स होते!

आज याच धर्तीवर रिलीज केलेल्या विधु विनोद चोप्रा यांच्या शिकारा या सिनेमाचं काय झालं हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहेच!

त्यामुळे आजच्या काळात जर हैदर रिलीज केला गेला तर तो नक्कीच बायकॉट होऊ शकतो!

 

२) नायक (२००१) :

 

nayak inmarathi

 

एक दिवसाच्या मुख्यमंत्र्याची गोष्ट म्हणून अनिल कपूर अमरीश पुरी यांचा नायक सगळ्यांना आठवत असेल. रजनीकांतचे रोबोटसारखे सिनेमे बनवणाऱ्या शंकर या दिग्दर्शकाच्या साऊथच्या सिनेमाचा हिंदी रिमेक म्हणजे नायक!

आजही टीव्हीवर हा सिनेमा लागला की आपण सगळेच तो अत्यंत आवडीने बघतो. त्यातली ती फेमस चिखलातली मारामारी, अनिल कपूरचा अभिनय आणि अमरीश पूरी यांनी साकारलेला भ्रष्ट मुख्यमंत्री हे सगळं आजही बघताना तितकीच मजा येते!

एका मुख्यमंत्र्याला एका टेलिव्हिजन इंटरव्ह्यूमध्ये बरेच उलटसुलट प्रश्न विचारले जातात आणि मग तो मुख्यमंत्री त्याचा बदला म्हणून त्या शोच्या एंकरला एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याचं चॅलेंज देतो!

हे सगळं वाचून आपल्यासमोर उभा राहतो तो करण थापर या पत्रकाराने बऱ्याच वर्षांपूर्वी घेतलेली नरेंद्र मोदी यांची मुलाखत, त्या मुलाखतीत मोदींनी दिलेली उत्तर आणि काही विचित्र प्रश्न विचारल्यामुळे मोदींनी अर्धवट सोडलेली मुलाखत आणि त्यामुळे लाईव्ह टेलिव्हिजनवर झालेली गरमा गरमी!

२००१ साली नायक मध्ये जे दाखवलं गेलं तेच जर आज दाखवलं तर किती विरोध होईल याचा विचार न केलेलाच बरा!

 

३) रंग दे बसंती (२००६):

 

rang de basanti inmarathi

 

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित रंग दे बसंती हा सिनेमा आजही तरूणांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. रहमानचं अप्रतिम संगीत, सगळ्या कलाकारांचा दांडगा अभिनय आणि इतिहासाशी मिळतं जुळतं कथानक यामुळे हा सिनेमा आजही लोकांच्या आठवणीत आहे!

तरुणांचे प्रॉब्लेम्स, ध्येयासाठी झटणं, इतिहासातून घेतलेला धडा याबरोबरच आपल्या देशातल्या भ्रष्ट सिस्टिमची पाळंमुळं खणून काढणं, देशाच्या सुरक्षाक्षेत्रात होणारे घोटाळे आणि गचाळ राजकारण दाखवणारा हा सिनेमा बऱ्याच लोकांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरला!

आज याच कथेवर आधारित सिनेमा थेटर्स काय तर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सुद्धा टाकणं म्हणजे विवादांना निमंत्रण देण्यासारखच ठरेल!

 

४) पिके (२०१४) :

 

PK inmarathi

 

२०१४ साली आलेला आमीर खानच्या पिके या सिनेमाने जगभरात ६०० करोडपेक्षा जास्त कमाई केली. परग्रहावरून आलेला एलियन काशाप्रकारे आपल्या पृथ्वीवरच्या माणसांना माणूस म्हणून जगायला शिकवतो याचं चित्रण या सिनेमात केलं गेलं!

धर्म श्रद्धा, अंधश्रद्धा यावरही या सिनेमाने अत्यंत जहाल भाष्य केलं ज्यामुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकलादेखील, एकाच समाजाला टार्गेट केल्याने लोकांनी यावर सडकून टीकादेखील केली. भगवान शंकर यांचा एक छोटासा सीन तर खूपच आपत्तिजनक होता!

या सगळ्या जोडीला पकिस्तानी मुसलमान आणि भारतीय हिंदू मुलगी यांच्यातली लव्ह स्टोरी दाखवून या सिनेमाला सर्वधर्मसमभाव असा रंग देण्याचासुद्धा प्रयत्न केला गेला!

पण तरीही लोकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला. आजच्या काळात खुद्द या सिनेमाचे मेकर्स किंवा इंडस्ट्रीतले आणखीन कोणतेही कलाकार असा सिनेमा करण्याच्या आधी हजारवेळा विचार करतील!

 

५) ओह माय गॉड (२०१२) :

 

omg inmarathi

 

आस्तिक नास्तिक या संकल्पनेवर आधारीत परेश रावल, अक्षय कुमारचा ओह माय गॉड सिनेमासुद्धा याच पठडीतला. देव धर्म, श्रद्धा अंधश्रद्धा, यांच्या नावाखाली चालणारे उद्योग उघडकीस आणणारा हा सिनेमा आजही आपण सगळेच आवडीने बघतो!

 कोर्ट रूम ड्रामा आणि कॉमेडी सिनेमा जरी असला तरी यातूनही बरंच वर्मी लागेल असं भाष्य केलं गेलं आहे!

त्यावेळेससुद्धा या सिनेमाला विरोधाचा सामना करावा लागला होता, पण आजच्या काळात इतका फ्रँक सिनेमा आणि मतं मांडायचा विचार कोणताच कलाकार करू शकत नाही!

===

हे ही वाचा इंग्रजी चित्रपटांमध्ये भारतीयांबद्दल दाखवलं जाणारं चित्र चीड आणणारं आहे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?