पासपोर्ट आहे? अहो मग या २४ देशांमध्ये फिरून या, येथे भारतीयांना व्हिसा लागत नाही!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सध्या कोरोनामुळे जगाचे व्यवहार काहीसे ठप्प झाल्यासारखे आहेत. सध्या अनेक देशात पुन्हा एकदा ते सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असले तरीही कडक नियमावलींमुळे आपले राज्य किंवा देश सोडून भटकंती करण्याचा प्रश्नच येत नाही.
गरजेपुरता प्रवास सुरु असला तरी फॅमिली, मित्र यांच्यासह मनसोक्त भटकण्याचा, दूरदेशी जाऊ धम्माल करण्याचा प्लॅन काही महिन्यांपासून थंडावला आहे.
कोरोनाचं संकट ठरताच पुन्हा नव्या जोमाने भटकंती करू असा आशावादही अनेकांनी बाळगला आहे.
तुम्हीही त्यातलेच एक आहात? मग हा लेख तुम्ही वाचलाच पाहिजे, कारण तुमच्या बकेट लिस्टमध्ये अनेक नवी ठिकाणं अॅड होवू शकतात.
ही नयनरम्य ठिकाणींची व्हर्च्युअल सफर तुम्हाला एकदम खुश करेल.
आपण पासपोर्ट का काढतो? कारण कधी तरी आपल्याला बाहेर म्हणजेच विदेशात, मग ते कोणत्याही देशात का असेना जायची संधी मिळाली की धावपळ होऊ नये म्हणून!
बहुतेक लोक याच भावनेने पासपोर्ट काढून ठेवतात, पण इकडे डोक्यावरचे केस पिकायला लागले तरी तसा योग काही मात्र जुळत नाही. स्वत:हून जायचं म्हटलं तर खर्च ऐकून डोक गरगरतं. तेव्हा विचार येतो एवढा खर्च जमला असता तर या आधीच जाऊन आलो असतो.
या खर्चात सर्वात जास्त खर्च कोणता असतो तर त्या ठराविक देशाच्या व्हिसाचा! तुमच्या कडे देखील पासपोर्ट असेल आणि अजूनही विदेशात फेरफटका मारायचा योग जुळून आला नसेल तर हा लेख खास तुमच्यासाठी.
आज आम्ही तुम्हाला जगातील अश्या २४ देशांची ओळख करून देणार आहोत जेथे जाण्यासाठी केवळ पासपोर्ट पुरेसा आहे, तुम्हाला व्हिसावर खर्च करण्याची गरज नाही, म्हणजे एकदम बजेटमधली ट्रीप तुम्ही करू शकाल.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकी बऱ्याच देशांची नाव तुम्ही पहिल्यादांच ऐकत असलं, पण विश्वास ठेवा इतर प्रसिद्ध देशांपेक्षा हे देश कैकपटीने सुंदर आहेत.
येथे गेलात तर तुम्हाला अमेरिका आणि युरोप पेक्षाही वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव मिळाल्याशिवाय राहणार नाही. चला पाहूया कोणकोणते देश आहेत हे.!
गुयाना

कंबोडिया

मादागास्कर

सोमालिया

इथियोपिया

ग्युनिया बिसाउ

इंडोनेशिया

जोर्डन

बोलिव्हिया

केनिया

केप वेर्डे

ग्रेनाडा

सामोआ

फिजी

टांझानिया

थायलँड

युगांडा

कोमोरॉस

डोमिनिका

मालदीव्स

मकाऊ

मॉरीशस

त्रिनिनाद अँड टोबॅगो

काय मग? कधी निघताय विदेशातील ड्रीम ट्रीप वर???
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
thanks