' ब्रिटिश प्रशिक्षकाच्या नाकावर टिच्चून भारताला पहिला विजय मिळवून देणारा कॅप्टन! – InMarathi

ब्रिटिश प्रशिक्षकाच्या नाकावर टिच्चून भारताला पहिला विजय मिळवून देणारा कॅप्टन!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतीय क्रिकेटला जगभरात एक वेगळे स्थान आहे. भारतातील क्रिकेट रसिकांच्या कथा जगभर प्रसिद्ध आहेत. याचं कारण म्हणजे भारतीय खेळाडूंनी हा खेळ गाजवला आणि नुसता गाजवलाच नाही, तर संपूर्ण जगाला धुळ चारुन दोन वेळा विश्वचषक देखील भारतात खेचून आणला.

भारताचं क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव गाजण्यामागे अनेक खेळाडूंचं मोठं योगदान आहे. आज आपण अशाच एका खेळाडूबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्याने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताला क्रिकेटमध्ये पहिला विजय मिळवून द्यायला मदत केली.

भारतीय क्रिकेट संघाचे नाव संपूर्ण जगामध्ये मोठ्या आदराने घेतले जाते. परंतु त्यामागे सुद्धा अनेक माजी खेळाडूंचं, त्यांच्या प्रशिक्षकांचं मोठं योगदान आहे हे विसरून चालणार नाही. रवी शास्त्री, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, सेहवाग, राहुल द्रविड या खेळाडूंनी अनेक विश्वविक्रम रचले.

 

sunil gavaskar sachin tendulkar inmarathi

 

या सर्वांची नावे आपल्याला माहिती आहेतच, परंतु तुम्ही विजय हजारे यांचं नाव क्वचितच ऐकलं असेल. राहुल द्रविड ज्या संयमाने फलंदाजी करत त्याहीपेक्षा कितीतरी पट अधिक संयमाने फलंदाजी करण्यासाठी विजय हजारे प्रसिद्ध होते.

विजय हजारे यांनी स्वातंत्र्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यांनी त्याकाळी १४ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं.

त्यांच्या नेतृत्वात भारताने जे विजय मिळवले, त्यातील सर्वात महत्त्वाचा विजय मानला जातो, तो म्हणजे इंग्लंड विरुद्धचा!

हा विजय महत्त्वाचा मानला जातो, कारण भारतीय क्रिकेट संघाला स्वातंत्र्याच्या आधी क्रिकेट खेळायला इंग्लंडच्या प्रशिक्षकाने शिकवले होते आणि भारतीय संघाने त्यांना त्यांच्याच खेळात पराभूत केले.

विजय हजारे यांचा जन्म ११ मार्च १९१५ रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला होता. विजय हजारे यांचे वडील सांगली जिल्ह्यात शिक्षक म्हणून कार्यभार पाहत होते. त्यांना एकूण आठ अपत्ये होती.

 

vijay hajare inmarathi

 

विजय हजारे यांनी आपल्या क्रिकेट करियरमध्ये एकूण तीस कसोटी सामने खेळले. या सामन्यांमध्ये फलंदाजी करत असताना त्यांनी ४७.६५ च्या सरासरीने एकूण २१९२ धावा केल्या.

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विजय यांनी चांगली कामगिरी केलीच, परंतु भारतामधील सामन्यांमध्ये त्यांच्या फलंदाजीला अधिक धार चढत असे. आज विजय हजारे यांनी निवृत्ती स्वीकारून एवढी वर्षं झाली, तरीही काही मोजके भारतीय फलंदाज सोडले तर इतर भारतीय फलंदाजांना विजय यांचा देशांतर्गत क्रिकेटमधील धावांचा विक्रम मोडता आलेला नाही.

अगदी मोजक्याच फलंदाजांना ही किमया करता आली आहे. त्यातच विजय हजारे यांचं यश अधोरेखित होतं असं म्हणता येईल.

===

हे ही वाचा – वीरूने ९९ धावांवर षटकार ठोकला; तरीही त्याचं शतक झालं नाही, कारण…

===

विजय हजारे यांनी देशांतर्गत फलंदाजी करत असताना ५३.३८ च्या सरासरीने एकूण १८७४० धावा बनवल्या आहेत. यामध्ये १० द्विशतकं आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजय हजारे यांनी यातील सहा द्विशतक तेव्हा ठोकली आहेत, जेव्हा संपूर्ण जगामध्ये विश्व युद्ध सुरू होतं.

विश्व युद्धाच्या काळात भारत एकमेव असा देश होता ज्याने कुठल्याही खेळावर बंधन आणलं नाही.

विजय हजारे यांचे विक्रम एवढ्यावरच मर्यादित नाहीत, तर रणजी क्रिकेटमध्ये सर्वप्रथम त्रिशतक झळकावण्याचा विक्रमदेखील विजय हजारे यांच्या नावावर आहे.

 

vijay hajare batting inmarathi

 

विजय हजारे यांनी रणजी क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून खेळत असताना तब्बल ३१६ धावांची विक्रमी पारी खेळली होती. त्यांच्या याच खेळीमुळे त्यांना पद्मश्री या सर्वोच्च पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. डिसेंबर २००४ ला यकृताच्या कर्करोगामुळे त्यांचा मृत्यू झाला.

देशांतर्गत क्रिकेटसाठी विजय हजारे यांचं योगदान बघता २००२ मध्ये भारत सरकारने त्यांच्या नावाने हजारे ट्रॉफी या क्रिकेट शृंखलेची मुहूर्तमेढ रोवली. या शृंखलेला भारताच्या एकदिवसीय सामन्यातील रणजी स्पर्धा असे देखील संबोधले जाते.

रणजी स्पर्धा संपल्यानंतर लगेच ५० षटकांचे हे सामने खेळवले जातात. या सामान्यांना देखील मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे. कारण या सामन्यांमधून देखील अनेक दिग्गज खेळाडू भारतीय संघात खेळण्यासाठी निवडले गेलेले आहेत.

 

vijay hajare trophy inmarathi

 

विजय हजारे यांचे काही विक्रम

देशांतर्गत क्रिकेट सामन्यांमध्ये पहिलं त्रिशतक झळकवणारा खेळाडू म्हणून विजय हजारे यांची ओळख आहे. त्यांनी हा विक्रम एकदा नव्हे तर तब्बल दोन वेळा केला होता. एकदा ३१६ वर ते नाबाद राहिले, तर एकदा ३०९ धावांची खेळी सुद्धा त्यांनी खेळली आहे.

पहिला भारतीय खेळाडू ज्याने कसोटी क्रिकेटच्या दोन्हीही डावामध्ये फलंदाजी करताना शतक झळकावलं. हा विक्रम त्याने केला १९४७ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एडीलेडमध्ये खेळत असताना.

देशांतर्गत कसोटी सामन्यांमध्ये ५० शतक झळकवण्याचा विक्रम देखील विजय हजारे यांनी केला आहे.

===

हे ही वाचा – क्रिकेटपटू नसुनही क्रिकेट विश्वातला सेलिब्रिटी बनलेल्या या अवलियाच्या रंजक गोष्टी!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?