' हा देवदूत कित्येक मातापित्यांना सख्ख्या मुलापेक्षा अधिक जवळचा वाटतोय....

हा देवदूत कित्येक मातापित्यांना सख्ख्या मुलापेक्षा अधिक जवळचा वाटतोय….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या आयुष्यात घटणार्‍या काही घटना आयुष्याला पूर्ण कलाटणी देणार्‍या असतात. अशाच एक घटनेतून एका तरूणानं घेतलेला अनोखा निर्णय आज अनेकांसाठी मार्गदर्शक बनला आहे.

हैदराबाद येथील जैसपर पॉल हा तरूण सध्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय बनला आहे याचं कारण आहे त्याचा ’सेकंड चान्स”. व्यवसायानं अभियंता असलेल्या पॉलनं निराधार, बेघर ज्येष्ठांसाठी सेकंड चान्स हे आधार केंद्र चालवतो-

jaispar 6 inmarathi

 

 

रस्त्यावरून जाताना आपण बरेचदा फ़ाटक्या, मळक्या कपड्यात, अस्वच्छ अवतारात रस्त्याकडेला मुटकुळं करून पडलेले, कधी शून्यात टक लावून बघत बसलेले तर कधी पाय ओढत चालणारे ज्येष्ठ बघतो. सरसकट भिकारी असं लेबल लावत पुढे जातो.

कधी तरी त्यांना बघून दु:खही वाटतं पण ते तेवढ्यापुरतंच. आपल्याच रोजच्या जगण्यातली धकाधकी पुरी झालेली असताना या सगळ्यांचा विचार करत बसण्या इतका वेळच कोणाकडे असतो? हैदराबादमधला एक तरूण मात्र याला अपवाद ठरला. अशा लोकांचं रस्त्याकडेला कचर्‍यासारखं पडून रहाणं त्याला अस्वस्थ करत होतं. या अस्वस्थतेतूनच त्यानं एक निर्णय घेतला.

हैदराबादमधील जैसपर पॉल या तरूणानं बेघर, निराधार लोकांना आपल्या सेकंड चान्स या निवार्‍यात आणून त्यांना केवळ छतच नाही तर “स्वच्छ” आयुष्य जगण्याची दुसरी संधिही दिली. एक एक करत आज त्याच्या सेकंड चान्समधे दिडशे ज्येष्ठ आहेत.

 

jaispar inmarathi 2

हे ही वाचा – इंजिनियर्स काहीही करू शकतात, वाचा या तरुणाचा भन्नाट प्रयोग!

समाजातील हे असे गरजू बघितले की आपल्यालाही त्यांना मदत कराविशी वाटतेच, नाही असं नाही. आपण त्यांच्या हातावर एखादी नोट ठेवून पुढे सरकतो कारण मोठ्या प्रमाणावर काही करायचं तर तितकं आर्थिक बळ प्रत्येकाकडे असतंच असं नाही.

बिना पैशाची समाजसेवा होऊच शकत नाही असं आजही आपल्याला वाटतं. या वाटण्यालाच जैसपरनं छेद दिला आहे. जर मनापासून काही करण्याची इच्छा असे तर मदतिचे मार्गही आपोआप दिसू लागतात हे त्यानं त्याच्या उदाहरणातून दाखवून दिलेलं आहे.

सुरवातीला इतर लाखोंप्रमाणेच जैसपरलाही माहित नव्हतं की तो या बेघरांची मदत नेमकी कशी करू शकणार आहे. या लोकांना मदत तर करायचीच होती, त्यांना माणसांत तर आणायचंच होतं पण ते करायचं म्हणजे काय काय करायला हवं? हे त्याला काहीच माहित नव्हतं. त्याची इच्छा मात्र अगदी प्रामाणिक होती.

आज त्यानं सेकंड चान्स नुसतं उभंच केलं नाहीए तर हजारोंचे मदतीचे हातही मिळवलेली आहेत. त्याला या कामासाठी थोडी थोडकी नाही तर करोडों रूपयांची मदत मिळते आहे. अव्याहत मिळणार्‍या या मदतीमुळे आता तो अधिकाधिक बेघरांना मदत करू शकत आहे.

सेकंड चान्सची निर्मिती झाली २०१७ साली. मात्र सेकंड चान्सची गोष्ट सुरू झाली होती २०१४ साली आणि याला निमित्त होतं एक दुर्दैवी घटना. जैसपर तेंव्हा केवळ एकोणीस वर्षांचा होता आणि त्याच्या गाडीला एक दिवस जबरदस्त अपघात झाला. त्याची गाडी तीन पलट्या खात उडून पडली. जैसपर रस्त्याकडेला उडून पडला.

 

jaispar 4inmrathi.jpg 1

 

 

सुदैवानं त्याला या अपघातात काही इजा झाली नाही, अगदी थोडक्यात त्याचा जीव वाचला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा पूरेपूर अनुभव त्याला या अपघातानं दिला.

अपघाताच्या धक्क्यातून सावरल्यावर त्यानं याचा खूप विचार केला. जणू काही नशिबानं आयुष्याचं दुसरं दान त्याच्या ओंजळीत टाकलं होतं. या “सेकंड चान्स” ला जगताना समाजातल्या अशा एखाद्या घटकासाठी काम करावं, ज्याला या सेकंड चान्सची गरज आहे, असं त्याला वाटत होतं.

त्यावेळेस तो महाविद्यालयात शिकणारा सामान्य विद्यार्थी होता. मात्र त्यानं मनोमन ठरवलं होतं की आयुष्यात आपण एखादं समाजपयोगी काम करायचं. आपण समाजाचं देणं लागतो ते द्यायचं. वंचित, गरजूंना मदत करायची. मात्र असं काम कोणतं? हे काही त्याला सूचत नव्हतं.

हा विषय सतत त्याच्या डोक्यात घोळत होता. असाच एक दिवस तो सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवरून जात असताना फ़ुटपाथवर जागाचं भान नसलेल्या, अस्ताव्यस्त असलेल्या मळकट कळकट अशा एका म्हातार्‍या स्त्रीकडे त्याचं लक्ष गेलं. तिच्या हाताला जखम झालेली होती आणि त्यावर माशा घोंगावत होत्या. तिला त्याचिही काहीएक शुध्द नव्हती.

 

jaispar 5 inmarathi

 

त्यावेळेस जैसपर पुढे निघून गेला मात्र ती स्त्री त्याच्या डोळ्यासमोरून हटायला तयार नव्हती. यामुळे तो मागे परतला आणि पुन्हा त्या स्त्रीपाशी आला. त्या स्त्रीशी बोलल्यावर त्याला समजलं की, ती बेघर आहे आणि तिची हाताची जखमही बरीच जुनी आहे.

तिला मदत करायचं ठरवल्यावर त्यानं एका पोलिस कॉन्स्टेबलच्या मदतीनं तिला इस्पितळात नेलं. तिच्या जखमेवर मलमपट्टी केली. मात्र त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आता हिला पुन्हा फ़ुटपाथवरच सोडावं लागणार कारण तिला जायला घरच नव्हतं.

तो तिच्यासोबत हॉस्पिटलमधेच थांबला. एका आधारगृहाचा शोध लावून चौकशी केली आणि तिच्या रहाण्याची सोय करुन दिली. या महिलेचा एक व्हिडिओ बनवून तो सोशल मिडियावर पोस्ट केला. या व्हिडिओमुळे त्या महिलेच्या कुटुंबियांना तिचा पत्ता लागला आणि ते येऊन तिला हैदराबादला परत घेऊन गेले.

या कामानं जैसपरला खूप आत्मिक समाधान लाभलं. या प्रसंगामुळे त्यानं पक्का निर्णय घेतला की इथून पुढे अशा बेघर लोकांसाठीच काम करायचं. त्यानंतर तीन वर्षं तो शहरातील विविध आधारगृह आणि आश्रमांसाठी , संघटनांसाठी काम करत होता.

हे काम करत असतानाच त्याला या मदत कार्यातल्या उणिवाही बोचत होत्या. या बोचर्‍या जाणिवेतूनच त्यानं स्वत:ची सेकंड चान्स ही संस्था स्थापन केली.

सेकंड चान्स आणि जैसपर पॉल यांच काम नेमकं कसं चालतं?

जैसपरनं एक खास संपर्क क्रमांक या कामासाठी घेतला आहे. हा क्रमांक त्यानं शक्य होईल तितका पसरवला आहे. कोणालाही कोठेही अशी बेघर व्यक्ती दिसते तेंव्हा ते या क्रमांकावर संपर्क साधून जैसपरला याबाबत माहिती देतात. याव्यतिरीक्त तो हैदराबाद पोलिस आणि अन्य सामाजिक संस्थांच्याही संपर्कात असतो. जेणेकरून यांच्यामार्फ़त त्याला बेघर लोकांची माहिती मिळेल.

 

jaispar inmarathi 3

 

हैदराबादमधे सेकंड चान्सची तीन केंद्र आहेत. यापैकी कोणत्याही ठिकाणी संपर्क साधला गेला की जैसपरची टीम त्याठिकाणी जाते आणि त्या व्यक्तिला घेऊन यापरल या ठिकाणच्या केंद्रात सर्वात आधी येतात.

इथे त्यांना प्राथमिक उपचार दिले जातात. त्यांना आंघोळ वगैरे घालून, केस , नखं कापून, पुरूषांची दाढी करुन तर महिलांची वेणीफ़णी करून त्यांना स्वच्छ कपडे घालायला दिले जातात. त्यांना भरपेट जेवायला दिलं जातं. त्यानंतर त्यांची वैद्यकिय तपासणी केली जाते, जेणेकरून जर काही व्याधी, आजार असेल तर कल्पना यावी आणि उपचाराला सुरवात करता यावी.

ज्यांना फ़ार चिकित्सेची गरज नसते अशांना इतर दोन केद्रांत पाठवलं जातं. ज्यांना उपचारांची, तपासण्यांची गरज आहे अशांना तिथेच ठेवलं जातं. या कामात जैसपरसोबत सहा डॉक्टरांची टीम विनामोबदला काम करते.

जैसपरकडे साधारणपणे मानसिक संतुलन हरवून बसलेले बेघरच मोठ्या प्रमाणात दाखल होतात मात्र काहीजणांना थोड्या उपचारांनंतर बरं वाटू लागतं. ते माणासात येतात आणि मग त्यांच्या कुटुंबियांचा पत्ता लावण्याचं काम केलं जातं. अनेकजण अशापदध्दतीन स्वत:च्या घरी परतले आहेत.

आजवर त्यानं दीड हजारांहून जास्त लोकांना मदत केलेली आहे आणि त्यापैकी सत्तर-ऐंशी जणांच्या कुटुंबियांसोबत त्यांची गाठ घालून दिलेली आहे.

सध्या सेकंड चान्ससाठी वीसजणांचा चमू अहोरात्र काम करतो आहे. याशिवाय सरकारी इस्पितळात दाखल केलेल्या निराधार लोकांची जबाबदारीही जैसपर मायेनं घेतो.

===

हे ही वाचा – प्रत्येक मध्यमवर्गीय तरुणाकडे असायलाच हव्यात या १३ गोष्टी

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?