' लाडक्या मुलीच्या हट्टापायी, “खिलजीने” हिंदूंसमोर गुडघे टेकले पण… – InMarathi

लाडक्या मुलीच्या हट्टापायी, “खिलजीने” हिंदूंसमोर गुडघे टेकले पण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

“प्रेम आंधळं असतं” हे वाक्य आपण कित्येकदा ऐकलं आहे. प्रेमात पडलेल्या व्यक्तींना धर्मभेद, जातीभेद, वर्ण भेद हे काहीच कळत नसतं. एक अंतरीक ओढ असते जी त्या दोन व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत एकत्र ठेवत असते. प्रेमाची नेमकी व्याख्या ही कोणीच करू शकत नाही. प्रेम ही अशी भावना आहे जी की फक्त अनुभवायची असते.

 

couple-inmarathi

 

प्रेम मिळवण्यासाठी एके काळी चंद्र, तारे आणून देण्यापर्यंत वचन दिले जायचे. आजचं ‘प्रेम’ हे त्यामानाने कालानुरूप प्रॅक्टिकल झालं आहे. आज प्रेमात असलेल्या व्यक्तींना एकमेकांकडून फक्त ‘वेळेची’ अपेक्षा असते. सुशिक्षित घरांमध्ये आज आधी व्हायचा इतका जातीभेद, धर्मभेद हे बघणं सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी झालं आहे. छोट्या गावांमध्ये आजही लग्न करण्यासाठी जात ही सर्वात महत्वाची गोष्ट मानली जाते.

बॉलीवूडच्या सिनेमांमध्ये अगदी मुगल-ए-आझम पासून दोन प्रेमींना एकत्र येण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे दाखवण्यात आलं आहे. लैला-मजनू, हिर-रांझा या सर्व प्रेमकथा आपल्याला बॉलीवूड मुळेच कळल्या असं म्हणता येईल.

 

mughal e aazam inmarathi

 

‘एकतर्फी’ असलेलं प्रेम हे सुद्धा काही प्रेमकथा पूर्ण न होण्याचं आपण इतिहासात बघितलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘पद्मावत’ सिनेमातून अल्लाउद्दीन खिलजी या दिल्लीच्या राजाच्या चित्तोड ची महाराणी पद्मावती वर असलेल्या एकतर्फी प्रेमाचा इतिहास बघायला मिळाला होता. राणी पद्मावतीने ‘जौहर’ करून अल्लाउद्दीन खिलजी ला आपल्या महालापासून लांब ठेवलं होतं.

‘एकतर्फी’ प्रेम असल्याने अल्लाउद्दीन खिलजी च्या मुलीला ‘फिरोजा’ ला सुद्धा आपलं प्रेम विसरावं लागलं होतं. आपलं प्रेम पूर्ण होणार नाही हे बघून तिने स्वतःचा जीव दिला होता.

दिल्लीच्या सुल्तानची मुलगी फिरोजा आणि जलोर चे राजपुत्र विरामदेव या दोघांबद्दल आपण यापूर्वी ऐकलं नसेल.

अल्लाउद्दीन खिलजीने जलालूद्दीन या दिल्लीच्या तत्कालीन सुल्तान च्या मुलीशी लग्न केलं होतं. सत्तेच्या मोहापायी अल्लाउद्दीन खिलजीचा खून केला. या घटनेनंतर जलालूद्दीनच्या मुलीने अल्लाउद्दीन खिलजीकडे तिला दिल्लीच्या गादीवर बसवण्यासाठी तगादा लावला होता.

 

allaudin khilji inmarathi

 

राणीच्या सतत उद्धट वागण्यामुळे अल्लाउद्दीन खिलजीने महरू नावाच्या एका नर्तिकेसोबत लग्न केलं होतं. अल्लाउद्दीन खिलजीला ‘फिरोजा’ नावाची मुलगी होती. फिरोजाचं विरामदेव या जलोर राज्याच्या राजपुत्रावर प्रेम होतं. पण, या एकतर्फी प्रेमाचा सुद्धा शेवट गोड होऊ शकला नाही.

विरामदेव च्या प्रथमदर्शनी प्रेमात पडलेल्या फिरोजा ला आपल्या प्रेमाला विसरावं लागलं होतं ? का ?

कथा सुरुवातीपासून…

अल्लाउद्दीन खिलजी हा एक हिंदू धर्म विरोधी राजा होता हे सर्वश्रुत आहे. आपल्या प्रत्येक मोहिमेत तो त्या राज्यातील हिंदू मंदिरांचं ठरवून नुकसान करायचा. एका मोहिमेत त्याने शिव मंदिराचं नुकसान केलं आणि तिथलं शिवलिंग दिल्लीला नेण्याचा तो प्रयत्न करत होता. जलोरच्या राजा कन्हार देव चौहान यांना जेव्हा या घटनेबद्दल कळलं तेव्हा त्यांनी पूर्ण शक्तीनिशी अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्यावर आक्रमण केलं. या हल्ल्याचं नेतृत्व विरामदेव या राजपुत्राने केलं होतं.

जलोरच्या सैन्यापुढे आणि विरामदेवच्या युद्ध कौशल्यासमोर अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य फार काळ तग धरू शकलं नाही. कन्हार देव चौहान यांनी हे युद्ध जिंकून शिवलिंग आपल्या ताब्यात घेतलं आणि जलोर मध्ये त्याची विधिवत स्थापना केली.

 

shivling-inmarathi

 

अल्लाउद्दीन खिलजीला हा पराभव जिव्हारी लागला होता. विरामदेवचा गौरव करण्याचं कारण सांगून अल्लाउद्दीन खिलजीने विरामदेवला दिल्ली दरबारी येण्यासाठी निमंत्रण पाठवलं. ‘आपल्या पराभवाचा सूड घेणं’ हा यामागे अल्लाउद्दीन खिलजीचा उद्देश होता हे जनतेला माहीत होतं.

विरामदेवने हे निमंत्रण स्वीकारलं आणि त्याने दिल्लीला येण्याची तयारी सुरू केली. अल्लाउद्दीन खिलजीच्या शाही दरबारात विरामदेवने प्रवेश केला. अल्लाउद्दीन खिलजीकडे तो चालत येत होता. त्याने या निमंत्रणासाठी राजाचे आभार मानले. दरबाराच्या कामकाजावर नजर ठेवून असलेल्या फिरोजा ला विरामदेव हा बघता क्षणीच आवडला होता.

 

firoza inmarathi

 

“लग्न करेन तर विरामदेव सोबतच” असा हट्ट तिने आपल्या वडील अल्लाउद्दीन खिलजी कडे करायला सुरुवात केली.

“हे शक्य नाही, तो आपल्या धर्मातील नाही आणि तो आपल्या शत्रूचा मुलगा आहे” हे आपल्या मुलीला सांगण्याचा प्रयत्न अल्लाउद्दीन खिलजी करत होता. पण, फिरोजाला यातील काहीच मान्य नव्हतं.

अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या मुलीच्या हट्टापुढे हात टेकले आणि जलोर च्या राजा कन्हार देव चौहानकडे विरामदेव सोबत फिरोजाच्या लग्नाचा प्रस्ताव पाठवला. जलोरच्या राजघराण्यासाठी ही आश्चर्याची गोष्ट होती. कारण, विरामदेवने फिरोजाला बघितलं सुद्धा नव्हतं. सहाजिकच, त्याने या विवाह प्रस्तावाला नकार दिला.

फिरोजा आणि अल्लाउद्दीन खिलजी यांना हा नकार मान्य नव्हता. आपल्या मुलीचा चुकीचा हट्ट पुरवण्यासाठी दिल्लीच्या सुल्तानने जलोरच्या राज्यावर आक्रमण करायचं ठरवलं. अल्लाउद्दीन खिलजीची ही इच्छा होती की, तो कन्हार देव यांना युद्धात हरवेल, विरामदेवला कैद करेल आणि त्याला पकडून आणून आपल्या मुलीशी लग्न करायला लावेल.

आपला हेतू साध्य करण्यासाठी मोठ्या सैन्यानिशी अल्लाउद्दीन खिलजी ने जलोरवर आक्रमण केलं. या युद्धाच्या वेळी कन्हार देव ने विरामदेवकडे पूर्ण राज्याचं नेतृत्व सोपवलं. कन्हार देव यांचा या युद्धात मृत्यू झाला. त्यानंतर विरामदेव ने युद्ध सुरू ठेवलं.

आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत विरामदेव हे युद्ध लढत राहिला. अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याने विरामदेवची तलवार हातातून पडल्यावर युद्ध नियमांचं उल्लंघन करत विरामदेवचा खून केला.

ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि दिल्लीपर्यंत पोहोचली. एकीकडे दिल्ली सल्तनत हे विजयोत्सव साजरा करत होतं आणि त्याचवेळी फिरोजाने यमुना नदीमध्ये उडी मारून आपला जीव दिला.

आपल्या आवडत्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी ऐकून स्वतःचा जीव देण्याची ही दिल्ली सल्तनत मधली ही पहिलीच वेळ होती. सतत कपट आणि कारस्थान करणाऱ्या अल्लाउद्दीन खिलजी ला तिच्या मुलीने प्रेम काय असतं ? हे शिकवण या घटनेतून दिली असं कित्येक वर्ष बोललं जायचं.

 

firoza viramdev inmarathi

 

आपल्याला एखादी व्यक्ती आवडणे किंवा एखाद्या व्यक्तीला आपण आवडणे ही खूप सुंदर गोष्ट आहे. त्याचा आदर करा. स्वीकार करणं अथवा नकार देणं हा प्रत्येकाकडे अधिकार असतो. ही गोष्ट जर प्रत्येकाने मान्य केली तर एकतर्फी प्रेमाचा शेवट हा कोणाच्या जीवावर बेतणार नाही.

आपला जीव हा आपल्या निकटवर्तीयांसाठी महत्वाचा आहे. अश्या कारणांमुळे आपलं जीवन संपवू नका ही शिकवण आपण या एकतर्फी प्रेमकथेतून घेऊ शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?