' अभिनय नव्हे, पॅरालिसिसचा झटका! ‘डेडिकेशन’ कशाला म्हणतात ते दाखवणारा प्रसंग! – InMarathi

अभिनय नव्हे, पॅरालिसिसचा झटका! ‘डेडिकेशन’ कशाला म्हणतात ते दाखवणारा प्रसंग!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – ईशान घमंडे 

===

‘हम आप कें हैं कौन’ एक एव्हरग्रीन आणि जबरदस्त चित्रपट! आजही दिवसभरातील कुठल्याही वेळात तो चित्रपट लागला असला, तरी बाकीची सगळी चॅनल्स बंद करून मी तो चित्रपट लावून बसू शकतो.

या चित्रपटाला ‘लग्नाचं रेकॉर्डिंग’ म्हटलं जायचं,  शिवाय काही लोक या सिनेमाला गाण्यांचा अल्बमसुद्धा म्हणत, असं आई-बाबा, किंवा त्या पिढीतील मंडळी बऱ्याचदा बोलत असल्याचं आठवतंय. चुकीचं काहीच नाही म्हणा यात, कारण गाणी आहेतच उत्तम!

‘चॉकलेट, लाईम ज्यूस, आईसक्रिम, टॉफीया’ हे गाणं म्हणत नाचणारी माधुरी दीक्षित पाहिली, की ती अनेकांच्या दिलाची धडकन का होती, हे लक्षात येतं. अशीच कुणीतरी गोड मुलगी आपल्याही आयुष्यात असावी वगैरे स्वप्नं हा चित्रपट पाहताना अनेक तरुण करत असतील.

 

madhuri dixit inmarathi

 

तीच गोष्ट ‘हम आपके हैं कौन’ मधल्या सलमान खानची सुद्धा! अनेक मुलींनी त्याच्याकडे स्वप्नातला राजकुमार म्हणून पाहिला असेल. मात्र त्याने केलेल्या उत्तम कामांपैकी हे एक आहे.

तसं मला सलमान खानचं काम आणि अभिनय फारसं आवडत नाही, पण या चित्रपटातला सलमान वेगळी छाप सोडून जातो. अभिनेतेच कशाला, कुत्र्यानं सुद्धा भन्नाट काम केलंय सिनेमात! मला कुत्र्यांची भीती वाटते आणि त्यामुळेच कुत्रे आवडत सुद्धा नाहीत, पण या सिनेमातला कुत्रा मात्र लईच आवडलाय राव…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – जेव्हा अनुपम खेर बच्चनजींना AC रिपेअर करण्यास सांगतात…

===

थोडक्यात सांगायचं म्हणजे, या एव्हरग्रीन चित्रपटाची मोहिनी माझ्यावरही आहे, हे मात्र खरं आहे. माधुरी आणि सलमानच नाहीत, तर मोहनीश बहल, रीमा लागू, अलोकनाथ, सतीश शाह, रेणुका शहाणे, अनुपम खेर इत्यादी इत्यादी अशी बडी स्टार मंडळी या सिनेमात होती. अगदी आपला लाडका लक्ष्या आणि प्रिया बेर्डे यांनी सुद्धा या सिनेमात उत्तम काम केलंय.

 

hum aapke hain koun inmarathi

 

या चित्रपटातील आणखी एका सिनची नेहमीच चर्चा असते आणि तो सिन म्हणजे अनुपम खेर यांनी वठवलेला शोलेमधील सिन! या सिनची कहाणी मात्र, काहीशी निराळी, खूप काही शिकवणारी आणि विचार करायला लावणारी आहे.

अनुपम यांचा या दृश्यातील उत्तम अभिनय आवडला असेल ना? असेलच की… हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे, असं म्हणाल तुम्ही. पण, आपल्याला सगळ्यांना आवडलेला हा अभिनय, हा अभिनयच नव्हता असं तुम्हाला कुणी सांगितलं तर? होय तुम्ही अगदी बरोबर वाचलंय. अनुपम खेर यांच्या चेहऱ्यावरील अत्यंत उत्कृष्ट वाटणारे ते भाव, हा अभिनयाचा भाग नव्हता. तो होता त्यांचा नाईलाज…

एकदा रात्री त्यांच्या असं लक्षात आलं, की त्यांना तोंड सहजपणे हलवता येत नाहीये. दिवसभराच्या थकव्याचा हा परिणाम असावा असा विचार करून, त्यांनी रात्री या त्रासाकडे दुर्लक्ष केलं. मात्र, सकाळी उठल्यावर दात घासत असताना सुद्धा ओठ आणि डावीकडील चेहरा हलवण्यास त्रास होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. इथे मात्र त्यांना कळून चुकलं, की ही काहीतरी गंभीर गोष्ट आहे.

त्यांनी तातडीने डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि त्यांना फेशियल पॅरालिसीस झाला असल्याचं निदान केलं. एवढंच नाही, तर त्यांना २ महिने काम न करण्याचा सल्ला त्यावेळी देण्यात आला होता, असंही त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हटलं आहे.

===

हे ही वाचा – “शोले”बद्दल खूप चर्चा होतात – पण शोलेबद्दलच्या या पडद्यामागील १५ गोष्टी फार कमी जणांना माहिती असतील!

===

ही मुलाखत मध्यंतरी पाहण्यात आली आणि या सगळ्या गोष्टीबद्दल कळलं. अनुपम खेर यांनी त्यावेळी घेतलेला निर्णय ऐकला आणि त्याचं कारण जाणून घेतलं, की लक्षात येतं की हा कलाकार आज इतका श्रेष्ठ का ठरला आहे.

 

anupam kher inmarathi

 

त्यांनी २ महिनेच काय, तर २ मिनिटं सुद्धा वाया दवडायची नाहीत, असं ठरवलं आणि थेट दिग्दर्शक सुरज बडजात्या यांची भेट घेतली. ‘मला फेशियल पॅरालिसीस झालेला आहे आणि तरीही मी शूटिंग करायला तयार आहे’, असं त्यांनी दिग्दर्शकांना कळवलं.

म्हणूनच, चित्रपटातील तो सिन थोडासा बदलण्यात आला. अनुपम खेर यांना धर्मेंद्रजींच्या शोलेमधील दृश्याची नक्कल करताना दाखवण्यात आलं.

मी मगाशी म्हणालो, तसं तो त्यांचा अभिनय नव्हता. त्यांना जबडा हलवणं शक्यच होत नव्हतं. तसाच तिरका झालेला जबडा कॅमेऱ्यासमोर नेऊन त्यांनी दारू पिऊन तर्राट झाल्याचा अभिनय उत्तमरित्या केला.

पॅरालिसिसचा झटका येऊन गेल्यावर जेव्हा अनुपम खेर सेटवर पोचले त्यावेळी त्यांना नीट बोलताही येत नव्हतं. त्याच अवस्थेत ते माधुरी आणि सलमानच्या समोर आले, त्यावेळी ही त्यांची नवी काहीतरी मस्करी असावी असंच त्या दोघांनाही वाटलं होतं. मुद्दाम तोंड वाकडं करून, विचित्र पद्धतीने बोलून ते आपली मस्करी करत आहेत, असंच त्या दोघांनाही वाटलं होतं.

===

हे ही वाचा – ….आणि दारूच्या नशेत थेट चेन्नईला जाऊन धर्मेंद्रने थांबवलं हेमामालिनी आणि जितेंद्रचं लग्न!!

===

अखेर सेटवरील सगळ्यांना एकत्र बोलावून त्यांनी त्यांच्या पॅरालिसीसबद्दल आणि शूटिंग सुरु ठेवण्याच्या निर्णयाबद्दल सगळ्यांना सांगितलं. मोठ्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने त्यांनी हे चित्रीकरण पूर्ण केलं. अनुपम यांनी या चित्रपटात किती छान काम केलंय, हे आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे.

आजाराला घाबरून आज जर मी काम केलं नाही, तर ही अशीच सबब यापुढे अनेकदा दिली जाईल आणि मी माझं सर्वोत्तम काम करू शकणार नाही. असा विचार अनुपम यांनी केला. म्हणूनच, २ महिने आराम करण्याचा सल्ला नाकारून त्यांनी चित्रीकरण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.

 

anupam kher sholay scene inmarathi

 

खरंतर अनुपम खेर हे त्यावेळी प्रसिद्ध अभिनेते होते. १५० हून अधिक सिनेमांमधून त्यांनी काम केलं होतं. अशावेळी आजारपण आल्याने त्यांनी काम थांबवलं असतं, तरीही चाललं असतं. मात्र त्यांनी आराम न करण्याचा निर्णय घेतला.

त्यांची कामाप्रती श्रद्धा आणि निष्ठा दिसून येते. त्या अनुभवाविषयी अनुपम खेर यांनी नेमकं काय सांगितलं, ते तुम्हीही ऐकायला हवं, आणि म्हणूनच हा विडिओ सुद्धा नक्कीच बघा…

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?