'दूरून स्पष्ट दिसणाऱ्या या किल्ल्याजवळ जाताच तो क्षणार्धात चक्क दिसेनासा होतो...!

दूरून स्पष्ट दिसणाऱ्या या किल्ल्याजवळ जाताच तो क्षणार्धात चक्क दिसेनासा होतो…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत हा गड, किल्ले यांचा देश आहे. यात बळकट, सुरक्षित, उत्तम स्थापत्यशास्त्र यांची अनेक उदाहरणे आहेत. त्या त्या काळातील राजे रजवाडे यांनी बांधलेले गडकिल्ले हे आपला सांस्कृतिक ठेवा आहेत. तिथं असलेल्या संपत्तीच्या साठ्यांची, वेगवेगळ्या गूढ कहाण्यांची एक अनोखी वेगळी दुनिया आहे.

काही खऱ्या काही खोट्या..काही दंतकथा..आख्यायिका यांनी हे काही किल्ले म्हणजे एक रहस्यमय ठिकाण ठरले आहेत. मग तो राजस्थानमधला एका रात्रीत मोकळा झालेला किल्ला असो की मध्यप्रदेशातील कंदारगड!

काही गडकिल्ले भीषण सभोवताल व गूढ वातावरण यासाठी प्रसिद्ध आहेत. येथे जाताना मन आणि पावले थिजलेली असतात. काहूर दाटलेले, कोंदल्या सारखी स्थिती होते.

मध्यप्रदेशातील निवरी जिल्ह्यातील कुंडार गावातील गडकुंडार नावाचा किल्ला गूढ अन् रहस्यमय म्हणून ओळखला जातो. हा किल्ला साधारण १५०० ते २००० वर्षांपूर्वीचा आहे.

 

gadhkundar inmarathi

 

या गडाची रचना विचित्र आहे. हा किल्ला ५ मजली असून यातील २ तळमजले आहेत.

===

हे ही वाचा भारतीयांच्या अफाट स्थापत्यशास्त्राची कल्पना देणाऱ्या या ११ ऐतिहासिक वास्तु बघायलाच हव्यात

===

हा किल्ला आपण १२ किलोमीटर वरुन पाहू शकतो. अगदी उघड्या डोळ्यांनी तो स्वच्छ दिसतो. पण जसजसे आपण जवळ जाऊ लागू किल्ला दिसेनासा होऊ लागतो. ज्या रस्त्याने आपण जायला निघतो ती वाट कुठे तरी वेगळीकडेच जाते!

कंदार गावातील लोक येथे घडलेला एक प्रसंग सांगतात तो असा की गावातील लग्नाच्या वऱ्हाडातील ५० ते ६० लोक हा किल्ला पहायला इथे आले होते. एकेक भाग पहात ही माणसे तळमजल्या पर्यंत पोचली अन एकाएकी कुठे गडप झाली कोणालाच कळले नाही ते फक्त परमेश्वरालाच माहिती!

 

gadhkundar 2 inmarathi

 

जे प्रवासी हा किल्ला पहायला, भेट द्यायला येतात त्यांचा खूप गोंधळ उडतो, ते रस्ता चुकतात, वाट विसरतात, हरवतात. जसा काही भूलभुलैयाच आहे हा गड!

या गडाचे खूप भाग आहेत. येथील काही भागात अंधार आहे. दिवसासुद्धा येथे सूर्य किरण पोचू शकत नाहीत. त्यामुळेच येथील वातावरण भितीदायक वाटते.

असे म्हटले जाते की या किल्ल्यावर बराच खजिना दडलेला आहे. ते जर सापडले तर भारत हा जगातील सर्वात श्रीमंत देश ठरेल!

मुघल व ब्रिटिशांनी येथे बऱ्याच वेळा लूटमार केली आहे. खूप धनसंपत्ती चोरून नेली. गाववाले किंवा इतर लोक इशारे करुन या गडाबद्दल सांगत असतात. यावरून ही गोष्ट लक्षात येते की गड कुंडार हा रहस्यांनी भरलेला आहे.

इथे चकवा हमखास लागतो, यात माणूस अडकला तर बाहेर पडणे कठीणच! हा गड मध्यप्रदेशातील प्रेमलालसेचं, तोडफोडीचं प्रतिक आहे. यातील मुख्य व्यक्ती नागदेव व रूपकुँवर आहे. यांच्या प्रेमाची ही कहाणी आहे.

खेतसिंग पृथ्वीराज चौहानचे प्रमुख सेनापती व जवळचे मित्र होते. त्यांनी युद्धात शासक शिवाला हरवले आणि गडावर कब्जा केला. खंगर वंश स्थापन केला. तेव्हापासून त्याला जिनागढ हे नाव मिळाले. खंगर नंतर कुंडर शासक झाले.

 

maharaja khet singh inmarathi

 

गडकुंडार हा १५० फूट उंच व ४००फूट रुंद आहे. या गडाची रचना पहाणाऱ्याला गोंधळवून टाकणारी आहे.

हा किल्ला एका विस्तीर्ण अंगणाजवळ बनवला गेला आहे. आतील लोक बाहेरील लोकांना सहजपणे बघू शकतील पण बाहेरील लोक आतील माणसांना पाहू शकणार नाहीत.

===

हे ही वाचा असा किल्ला जिथे “शून्य” चा आकडा पहिल्यांदा सापडला – वाचा ही रंजक कथा

===

या किल्ल्याची देखरेख होत नसल्याने नासधूस होऊ लागली आहे. धनसंपत्तीच्या शोधासाठी ठिकठिकाणी खोदकाम केल्याने बकालपणा आला आहे.

मुरली मनोहर मंदिर, सतीमहाल, अंधाकोप,राजमहाल, नरसिंह मंदिर, सिद्धबाबा स्थान, दिवान-ए-आम, दिवान-ए-खास इत्यादी ठिकाणे पर्यटकांची मुख्य आकर्षणे आहेत. महामाया ग्रीड वासिनीचे मंदिर महत्वपूर्ण आहे.

मंदिराजवळ एक पाण्याची टाकी आहे, इथून बेतवा नदी वहाते. सोमवार हा गावाचा बाजाराचा दिवस आहे. या दिवशी स्थानिक लोक खरेदी करतात. आॅक्टोबर ते जानेवारी दरम्यान इथे पर्यटक भेट देतात.

 

gadhkundar 3 inmarathi

 

पण या किल्ल्यावर कोठेही जागा बळकावलेली दिसत नाही. इथं कसलंही अतिक्रमण नाही. इथे इतकी शांतता आहे छोट्यात छोटा आवाजही ऐकू येईल.

गूढकथा, चित्तथरारक गोष्टी, क्राइम स्टोरीज आपल्याला नेहमीच ऐकायला आवडतात. आपण दूरदर्शन वरील सस्पेन्स मालिका आवडीने आणि चवीने पाहतो. या जगात अनेक अघटित घटना घडत असतात. त्यात भुताखेताच्या गोष्टी मनाला खूपच घाबरवतात.

पुढे काय होईल या उत्सुकतेपोटी अशा गोष्टी आपल्याला उद्युक्त करतात. आपल्याला सरळसोट आयुष्य जगायला आवडते. पण प्रत्येकाला असे आयुष्य वाट्याला येत नसते.

जशी माणसांची तशीच स्थानांची पण अवस्था असते.गड.किल्ले,वटवाघळे, चिंचेची झाडे हे सर्व रात्रीच्या वेळी काही ठिकाणे गूढ व रहस्यमयी! आणि कधी कधी भानगड, कंदारगड यासारखी ठिकाणे आपल्याला यावर विश्वास ठेवणे भाग पाडतात.

===

हे ही वाचा रहस्याने वेढलेल्या या किल्ल्यातील गुप्त खजिना आणि त्याच्या मोहात पडलेल्या इंदिरा गांधींचं कनेक्शन

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?