' श्रीलंका सरकारने इस्लामविरुद्ध युद्ध पुकारलंय का? वाचा एका धाडसी निर्णयाबद्दल!

श्रीलंका सरकारने इस्लामविरुद्ध युद्ध पुकारलंय का? वाचा एका धाडसी निर्णयाबद्दल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“तू ना हिंदू बनेगा, ना मुसलमान बनेगा..इंसान की औलाद है इंसान बनेगा!” हे गाण्यातून किंवा काव्यातून ऐकायला कितीही छान वाटत असलं तरी वास्तव हे बरचसं वेगळं आहे!

सर्वधर्मसमभाव अशी वागणूक देणाऱ्या आपल्या भारतातसुद्धा विविध जाती धर्माचे लोकं गुण्या गोविंदाने राहतात! पण एखादी अशी घटना घडते ज्यामुळे लोकांच्या विचारातली तेढ आणि एकेमेकांकडे बघायचा दृष्टिकोनच बदलतो!

जसं की एखादी आतंकवादी घटना देशात किंवा राज्यात घडली तर देशातल्या एका ठराविक वर्गाकडे वेगळ्या नेजरेतून बघितलं जातं, त्यांच्याशी होणाऱ्या वागणुकीत फरक पडतो हे आपण कित्येकांनी सिनेमात आणि खऱ्या आयुष्यातसुद्धा बघितलं जातं!

 

terrorism inmarathi

 

आतंकवादाला कोणताही धर्म नाही हे मान्य जरी केलं तरी १०० पैकी ९५ दहशतवादी लोकं ही समाजाच्या एकाच वर्गातून येतात, म्हणजे नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय!

आणि नुकतंच श्रीलंकेच्या सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे देशातले सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघत आहे!

===

हे ही वाचा इस्लाम+ख्रिश्चनिटीच्या हजारो वर्षांच्या आक्रमणांनंतरही हिंदू धर्म का टिकून आहे?

===

बुद्धिस्ट लोकांची मेजॉरिटी असलेल्या श्रीलंकेच्या सरकारने बुरखा घालण्यावर बंदी घातली आहे. शिवाय इतकंच नाही तर तब्बल १००० मदरसेसुद्धा येत्या काही दिवसांत बंद केले जाणार आहे!

श्रीलंकेच्या पब्लिक सिक्युरिटी मिनिस्टर सरथ विरसेखरा यांनी शुक्रवारी या संबंधित कागदांवर सह्या करून कॅबिनेट कडून या कायद्यासाठी संमती घेतली, आणि राष्ट्राची सुरक्षा म्हणून यासाठी मान्यता देखील देण्यात आली आहे!

 

burqa inmarathi

 

श्रीलंकेतल्या काही चर्चेस तसेच हॉटेल्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे २०१९ मध्ये बुरखा घालण्यावर तात्पुरती बंदी आणली होती. पण या वर्षी याची सक्त अंमलबजावणी करण्यासाठी हा कायदा पास करून श्रीलंका सरकारने पास करून घेतला आहे!

गेल्या काही वर्षात झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील असलेल्या लोकांचे ISIS शी असलेले संबंध उघड झाल्याने धार्मिक माथेफिरूंच्या विरोधात कारवाई करण्यासाठी श्रीलंकेने हे पाऊल उचलल्याचं स्पष्ट होत आहे.

याबरोबरच १००० मदरसेसुद्धा बंद करण्याचं श्रीलंकेने ठरवलं आहे, जिथे मुस्लिम मुलांना किंवा मुलींना धर्माचं शिक्षण दिलं जात असे.

देशातल्या शिक्षण पद्धतीपेक्षा हटकून केवळ स्वतःच्या धर्माचं शिक्षण देणं हे कुठेतरी या दहशतवादाला खतपाणी घालण्यासारखंच असल्याने श्रीलंका सरकारने हा निर्णय घेतला आहे असा अंदाज वर्तवला जात आहे!

 

islamic schools inmarathi

 

या सगळ्या निर्णयामुळे सोशल मीडियावर देखील बरीच चर्चा होताना दिसत आहे, काही लोकं याच्या समर्थनार्थ बोलतायत आणि काही लोकं या  निर्णयचा विरोध करताना दिसत आहेत!

पण एका देशाचे सरकार म्हणून देशहितासाठी घेतलेल्या या निर्णयाची सगळीकडेच चर्चा होताना दिसत आहे. येणाऱ्या काही दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी जेव्हा होईल तेव्हाचं नेमकं सांगता येईल की हा निर्णय कितपत यशस्वी झालाय ते!

===

हे ही वाचा – इस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान” वेळीच दूर व्हायला हवं – भाग १

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?