' वेळेवर पगार मिळाला नाही, म्हणून चोरली ACP ची खुर्ची! जाणून घ्या ही भन्नाट भानगड… – InMarathi

वेळेवर पगार मिळाला नाही, म्हणून चोरली ACP ची खुर्ची! जाणून घ्या ही भन्नाट भानगड…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असं म्हणतात ते उगाच म्हणत नाही. कोणाला कधी काय वाटेल आणि कोण काय करेल याचा तिळमात्र अंदाज सुद्धा लावता येत नाही. असाच काहीसा अनुभव मध्यंतरी बंगळूर पोलिसांना आला आहे.

जपानमधून आलेल्या तरुणाने आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यासाठी, ज्या पोलीस ठाण्याने त्याला दोषी ठरवलं होतं, त्याच पोलीस ठाण्यात चोरी केली. हा पठ्ठ्या तिथल्याच जेलमध्ये भरती झाला. काही कळलं? नाही ना? तर बघूया नेमकं प्रकरण काय आहे…

२०१९ साली हिरोटोशी टनाका नावाचा ३१ वर्षीय तरुण जपानमधून बंगळूरला इंग्रजी शिकण्यासाठी आला होता.

 

hirotoshi tanaka inmarathi

 

एका भ्रष्टाचारी पोलीस अधिकाऱ्याचा गुपित उघड करण्यासाठी त्याने जाणूनबुजून एक गुन्हा केला. हा गुन्हा काय तर एसीपी ऑफिस मधून त्याने चक्क स्टीलची खुर्चीच चोरी केली.

त्याने चोरी तर केलीच, शिवाय सेल्फी काढून तो पोस्ट करून, खुर्ची घरी घेऊन आला. आता तुम्ही म्हणाल हे असं का करावं त्याने? तर त्याने हे एवढ्यासाठीच केलं, की पोलिसांनी येऊन त्याला जेलमध्ये बंद करावं.

टनाका याला एका खोट्या केसमध्ये स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने गुंतवले होते. असं त्याचं म्हणणं आहे.

===

हे ही वाचा – लाच दिली नाही, तर इथले पोलीस थेट गोळ्या घालतात!

===

त्यामुळे त्याला अटक होऊन त्याच्यावर केस दाखल झाली. परंतु परदेशी नागरिकांसाठी असलेल्या फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसने त्याच्यावरची केस मागे घ्यायला सांगून त्याला २८ फेब्रुवारी पर्यंत भारत सोडण्याचा आदेश दिला.

टनाका स्वतःला निर्दोष समजतो आणि हे असं देश सोडून जाणं त्याला अजिबातच मान्य नव्हतं. म्हणून हे टाळण्यासाठी त्याला हा भन्नाट उपाय सुचला, तो म्हणजे पुन्हा अटक होऊन जेलमध्ये जाण्याचा…

 

jail inamrathi

 

त्याला जेलमध्ये नेमकं का जायचं होतं?

टनाकाला बंगळूरमध्ये राहायला महिन्याला साधारणपणे ३०,००० रुपये खर्च येतो. आणि त्याचे उत्पन्नाचे साधन मर्यादित असल्याने त्यात त्याला स्वतः ला निर्दोष सिद्ध करणे परवडले नसते.

जेलमध्ये राहायचं म्हणजे, ‘फुकटचे राहणे आणि खाणे’ या गोष्टी होणार होत्या. म्हणूनच तो जेलमध्ये भरती झाला

कोणत्या प्रकरणात टनाकावर गुन्हा झाला.?

टनाका ज्या शिक्षण संस्थेत इंग्रजी शिकत होता, तिथे तो नोकरी सुद्धा करू लागला. तिथल्या वरिष्ठांनी त्याला प्रमोशन देण्याचं कबूल केलं होतं. त्याने फार मेहनत घेऊन आणि मन लावून काम केलं. मात्र प्रमोशन तर दूर, या कामाचा मोबदला म्हणून त्याला पगारही देण्यात आला नाही.

यावरून त्याची वरिष्ठांशी शाब्दिक चकमक झाली. ही एवढी टोकाची ठरली, की दोघांमध्ये मारामारीचा प्रसंगदेखील उद्भवला.

वरिष्ठांनी पोलिसांमध्ये तक्रार करून, टनाका विरुद्ध एफआयआर दाखल करायची मागणी केली.

परदेशी नागरिक आणि त्यांच्यासाठी असलेले कायदे नेमके पोलिसांना माहीत असल्याने, पोलिसांनी दोघांमध्ये समेट घडवून आणत प्रकरण मिटवले. पण नंतर त्याला परत बोलवून प्रकरण शांत करण्यासाठी त्याच्याकडे पैशांची मागणी पोलिसांकडून करण्यात आली.

 

bribe inmarathi

 

तो पैसे देण्यास राजी नसल्याचे सांगून तिथून निघणार तेवढ्यात त्या रजिस्टर न झालेल्या केसमध्ये पुन्हा संशयित म्हणून एफआयआर दाखल करून त्याला जेलमध्ये टाकण्यात आले.

आधी समेट घडवून आणला आणि पुन्हा त्याच केसमध्ये पैशांसाठी त्याला परत गुंतवले गेले याचा त्याला राग आला. जवळपास दहा दिवस जेलमध्ये काढल्यानंतर टनाकाची केस हायकोर्टात गेली.

परदेशी नागरिक असल्याने आणि किरकोळ गुन्ह्याचे स्वरूप तसेच फॉरेनर्स रजिस्ट्रेशन ऑफिसमधून आलेले निवेदन मान्य करून हायकोर्टाने देश सोडून जाण्याच्या अटीवरून ती केस रद्द केली.

परंतु असं बेइज्जत होऊन परत आपल्या मायदेशी जाणे टनाकाला मान्य नव्हतं. त्यामुळे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्याने हे चोरीचे कृत्य केले. सदर पोलीस ठाण्यातील एसीपीनेच भ्रष्टाचाराचा प्रपंच केल्याचे त्याचे म्हणणे आहे.

त्याची मागणी आहे, की त्याला जो त्रास झाला आणि त्याचं जे नुकसान झालं ते भरून देण्यात यावं. त्याचा जपानला जाण्याचा खर्च सुद्धा पोलिसांकडून घेतला जावा, कारण त्यांच्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुख्य म्हणजे संबंधित अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि योग्य दंड आकारण्यात यावा.

===

हे ही वाचा – लोक विमानातून ह्या गोष्टी चोरून नेऊ शकतात याची तुम्ही कल्पनाही केली नसेल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?