' महिलेचा धर्म भ्रष्ट करणाऱ्या पिझ्झा कंपनीला थेट १ कोटींचा फटका बसणार का? वाचा

महिलेचा धर्म भ्रष्ट करणाऱ्या पिझ्झा कंपनीला थेट १ कोटींचा फटका बसणार का? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज घरबसल्या आपण काहीही मागवू शकतो, अगदी फर्निचर ते खाण्याचे पदार्थ सुद्धा एका क्लिकवर आता सर्व काही शक्य होत असते. लोकांची आवड निवड, त्यांच्या काय गरजा आहेत त्यांच्या सोयीनुसार आता कंपन्या आपल्या वस्तूंचे मार्केटिंग करून ग्राहकांना आकर्षित करत असतात.

काही वेळा ग्राहकांना आकर्षित करून बऱ्याचदा फसवणुकीचे प्रकार देखील घडताना दिसून येतात. जितक्या आजकाल गोष्टी सोप्या झाल्या  आहेत तितक्याच ग्राहकांना मनस्ताप  देणाऱ्या सुद्धा झाल्या आहेत.

अनेकदा ऑर्डर बुक करून सुद्धा वेळेवर येत नाही काहीतरी कारण सांगून ऑर्डर कॅन्सल करतात व पैसे आधीच घेतले असल्याने त्यांचा परतावा करायला १० ते १५ दिवस लावतात. अशाने ग्राहक प्रचंड नाराज होतात.

 

consu 1 inmarathi

 

हे ही वाचा – १० रुपयांच्या हव्यासापोटी हॉटेलला २ लाख दंडाचा दणका! जाणून घ्या ग्राहक हक्क...

आजकाल वर्क फ्रॉम होममुळे अनेकजण कामात व्यस्त असतात त्यामुळे साहजिकच घरातील जेवण करण्यापेक्षा सरळ बाहेरून ऑर्डर करावे याकडे अनेकांचा कल असतो.

बंगलोर येथील एका मुलीने जेवण मागवले आणि ते उशिरा आले, म्हणून तिने त्या डिलिव्हरी करणाऱ्या माणसासोबत आणि कंपनीच्या कस्टमर केअर अधिकाऱ्यासोबत भांडण केले. तिचे असे म्हणणे आहे, की त्या माणसाने तिला मारहाण केली.

सोशल मीडियावर तिने विडिओ पोस्ट केला आणि तो विडिओ मोठ्या प्रमाणावर चर्चेतदेखील आला. संबंधित कंपनीने त्या माणसावर कारवाई सुद्धा केली. परंतु त्याने देखील हे आरोप फेटाळून लावले. आता पुढे कोर्ट कचेरी प्रकरण चालू राहीलच.

 

consu 2 inmarathi

 

अशीच एक घटना गाजियाबादमध्ये घडली. पण यामध्ये कारण थोडे वेगळे होते. एक महिलेने जेवण मागवले, जे तिला वेळेत सुद्धा मिळाले नाही आणि ऑर्डर केलेले जेवणसुद्धा चुकीचे दिलेले होते. त्यामुळे संतापून शेवटी तिने कोर्टात धाव घेतली.

नक्की प्रकरण काय?

ही घटना दोन वर्षांपूर्वीची आहे, दीपाली त्यागी असे त्या महिलेचे नाव आहे . २१ मार्च २०१९ रोजी होळी होळीचा सण असल्याने काहीतरी बाहेर मागवूयात म्हणून त्यांनी व्हेज पिझ्झा मागवला. ३० मिनिटात ऑर्डर डिलीव्हर करणार अशी जाहिरात करणाऱ्या पिझ्झा कंपन्या प्रत्यक्षात मात्र किती वेळेत पोहचतात याचा अनेकांना प्रत्यय आला असेलंच. 

 

pizza inmarathi

 

ऑर्डर केलेला  पिझ्झा काही ३० मिनिटांत पोहचला नाही. तरी देखील त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही. भुकेपुढे काहीच सुचत नाही, पण पिझ्झा जेव्हा त्यांनी खायला सुरवात केली तेव्हा त्यांना लक्षात आले, की हा पिझ्झा व्हेज नसून नॉनव्हेज आहे.

आधीच भुकेने व्याकुळ झालेली त्यांची मुले, त्यात उशिरा डिलिव्हरी आणि मुख्य म्हणजे चुकीची ऑर्डर, त्यामुळे संतापून त्यांनी कस्टमर केअरला कॉल करून चांगलीच कानउघाडणी केली. त्यांनी पुढे असेही म्हटले, की त्यांचा धर्म भ्रष्ट केलाआहे. 

तिकडच्या संबंधित पिझ्झा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना फोन करून त्यांची माफी मागितली आणि त्यांना हवा तसा पिझ्झा मोफत देऊ असे आश्वासन दिले. मात्र या स्कीममध्ये ती महिला भुलली नाही तर तिने थेट त्यांना कोर्टात खेचले.

 

consumer 4 inmarathi

 

महिलेने थेट ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली, त्यामध्ये त्यांनी असे नमूद केले, की नॉन व्हेज पिझ्झा दिल्याने त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा धर्म भ्रष्ट करण्याचा प्रयत्न पिझ्झा कंपनीने केला आहे. तसेच यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास झाला आहे.

यासाठी त्यांनी तब्बल १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई कंपनीकडे मागितली आहे. या केसचा निकाल १७ मार्चला लागणं अपेक्षित आहे.

आज खाद्यउत्पादक कंपन्या अशा अनेक छोट्या छोट्या चुका करत असतात. अनेकजण पिझ्झा ऑर्डर करत असतात, त्यात एखादी चूक जरी झाली, तर ती त्यांना मोठ्या प्रमाणात महागात पडू शकते कारण शेवटी त्यांचा ग्राहक हा राजा आहे.

customer is always right या प्रणालीनुसार तुम्हाला तुमच्या ग्राहकाचे ऐकावेच लागते आणि त्याला झालेल्या नुकसानीचे भरपाई ही द्यावीच लागते.

 

consum 5 inmarathi

 

आज जागतिक ग्राहक हक्क दिन आहे. त्यानिमित्ताने सांगणे एवढेच आहे, की आजकाल कंपन्या ऑफरची भुरळ घालून ग्राहकांची फसवणूक करत असतात. त्यामुळे आपली जर फसवणूक होत असेल तर वेळीच ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करा.

अनेकजण कोर्ट-कचेरी नको म्हणून कोर्टात जाणे टाळतात, मात्र तसे न करता आपला हक्क बजावा. तसेच हक्कांसोबत आपली काही कर्तव्येदेखील आहेत, तीसुद्धा लक्षात ठेवा.

जागो ग्राहक जागो  

===

हे ही वाचा – हॉटेल ग्राहकांना दिलेली “जबरदस्त ऑफर” आली अंगलट, सगळ्यांसाठी मोठी शिकवण!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?