' तुम्ही चप्पल घरात ठेवता की घराबाहेर? वाचा शास्त्रज्ञ काय सांगतात…

तुम्ही चप्पल घरात ठेवता की घराबाहेर? वाचा शास्त्रज्ञ काय सांगतात…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुकाराम महाराज आपल्या अभंगात एक फार छान गोष्ट सांगून गेले आहेत, पायीची वहाण पायी बरी!!! म्हणजे ज्या त्या गोष्टी ज्या त्या जागेवरच असाव्यात. त्यांची अवास्तव जागा बनवू नये.

आजकाल बघा, चप्पल सुद्धा किती प्रकारच्या असतात. ट्रॅडिशनल, फंक्शनल, मॅचिंग चप्पल, माॅर्निंग वाॅकला जाताना घालायचे‌ स्पोर्ट्स शूज. घरात घालायच्या स्लीपर्स, वगैरे वगैरे. नावं काहीही असोत पण चप्पल ती चप्पलच. तिची जागा ठरलेली आहे.

काही वेळा घरात वापरण्याच्या चपला वेगळ्या असतात आणि बाहेर वापरण्याच्या चपला वेगळ्या! काही वेळा फंक्शनल म्हणून घेतलेल्या चपलांवर काही कलाकुसर केलेली असते. यांची किंमतही काही हजारांच्या घरात असते. म्हणून कार्यक्रमाला जाताना घालून परत आलं, की अशा नाजूक महागड्या चपला परत एकदा घरात विराजमान होतात.

 

designer chappals inmarathi

 

आपल्याकडे बाहेरुन आलं, की चप्पल घराबाहेर काढून मगच आत जायची पद्धत आहे. घरात गेल्यावर सुद्धा पाय धुऊन मगच आपण आपल्या कामाला लागतो.

बाळंतिणीला, बाळाला बघायला जातानाही बाळंतिणीच्या खोलीबाहेर एक पाण्याचा टब, बादली ठेवलेली असते. तिथे पाय धुऊन मगच आत जातात. कोरोनाच्या काळात ही हात पाय धुऊन घरात यायची पद्धत परत एकदा रुढ झाली आहे.

===

हे ही वाचा – साधू – संत यांच्या पायात ‘लाकडी पादुका’ का असतात? त्यामागचं कारण जाणून घ्या!

===

काही लोक तर घरातही चप्पल घालूनच फिरतात. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करायची ही हौस खूप जणांना असते, आहे. पण चप्पल घरात न घालण्याची कारणं काय असतील? बहुतांश आशियाई देशांमध्ये ही चप्पल घराबाहेर काढून मगच आत जायची पद्धत आहे. मात्र अमेरिकेत आणि युरोपियन देशांत ही पद्धत खूप कमी आहे. हे लोक बाहेरच्या चपला सर्रासपणे घरात घालून वावरतात.

 

shoes at home inmarathi

 

या गोष्टींवर आता शास्त्रज्ञ सुद्धा विचार करत आहेत. बाहेरच्या चपला घरात नेणं कितपत योग्य आहे? यावर संशोधन करुन चप्पल घरात नेणं हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे हेच सिद्ध झालं आहे.

आपल्याकडे आई आजी सर्रास म्हणतात बाहेरच्या पायानं आत येऊ नको. पाय धू आणि मग ये. पाय धुवायचे म्हटलं, तर चप्पल काढावीच लागते.

चप्पल आपलं रस्त्यावरील काटे कुटे, छोटे छोटे अणकुचीदार खडे यांपासून संरक्षण करते. तसंच पायाला माती, घाण लागू देत नाही. रस्त्यावर लोक थुंकतात. ही थुंकी, त्यातील जंतू या चपलेला चिकटतात. ते आपल्या पायाला लागू न देता चप्पल आपलं काम इमानेइतबारे करत असते.

या एवढ्या घाणीतून आपण कळत नकळत किती घाणेरडे जीवजंतू, बॅक्टेरीया चप्पलवर वागवत असतो बघा. रस्त्यावरुन चालत जाणारे प्राणी कुत्रे, गाढवं, बैल यांचं मलमूत्र रस्त्यावरच असतं. हे सारं काही चपलेच्या तळाला लागतं. यासोबतच येतात ते घाणेरडे बॅक्टेरीया जे आरोग्यासाठी खूप धोकादायक असतात.

 

chappal inmarathi

 

या जंतूंना शास्त्रीय भाषेत क्लोस्ट्रीड्रीयन असे म्हणतात, तर साधारण भाषेत सी.डिफ. हे जंतू हवेशिवाय जगू शकतात व कोष बनवू शकतात आणि हे कुठेही सहजी पसरतात. धुळीत, फरशीवर, बाथरूममध्ये, टाॅयलेटमध्ये!!!

त्यांचे कोष कोरड्या पृष्ठभागावर व्यवस्थितपणे वाढू शकतात. सी.डिफ हे प्रतिकारशक्ती क्षीण करायला कारणीभूत ठरतात. दवाखान्यात बरेच रुग्ण या सी.डिफच्या इन्फेक्शनला बळी पडून दीर्घकाळ आजारी राहू शकतात. हे सी.डिफ. आतड्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. आणि आजारपणातील गुंतागुंत वाढते.

===

हे ही वाचा – कोल्हापुरी चप्पल घेताना फसवणूक होतेय, मग “अशी” ओळखा बनावट चप्पल…

===

संशोधनाअंती असं सिद्ध झालं आहे, रस्त्यावर पक्षांची विष्ठा, कुत्रे मांजर बैल गाढव यांचे मलमूत्र, वाळलेली, कुजलेली पाने यांचे अवशेष हे सारे घाणेरडे घटक चप्पलच्या तळाशी असलेल्या सोलवर विसावलेले असतात. हेच आपल्या अनारोग्याचं मूळ ठरतात.

बॅक्टेरीयांना वाढायला वाळलेल्या पानांचा फार चांगला उपयोग होतो त्यामुळे त्या पानांसोबत चप्पलला चिकटून हे बॅक्टेरीया आपल्या घरात प्रवेश करतात आणि घरभर अनारोग्याचा फैलाव करतात.आणि हे बॅक्टेरीया आपल्या घरात अनेक दिवस जिवंत राहू शकतात.

हे तपासून पाहीले अॅरिझोना युनिव्हर्सिटीनं. त्यांना आढळलं ते निरीक्षण असं होतं – त्यांनी नमुन्यासाठी जी बाहेरून फिरवलेली चप्पल घेतली त्या चप्पलच्या तळाशी एकूण नऊ वेगवेगळे डाग होते. त्यावर जवळपास ४,२१,००० बॅक्टेरीया त्यांना सापडले.

ते बॅक्टेरीया पोटाच्या, फुप्फुसे आणि डोळ्यांना होणाऱ्या इन्फेक्शनचं कारण ठरतात. जेव्हा आपण या चपला घरात वापरतो तेव्हा त्या धुळीत, कोरड्या पृष्ठभागावर, कुठेही आरामात वाढू शकणारे‌ बॅक्टेरीयाचा स्रोत ठरतात.

या बॅक्टेरीयामुळं पोटात इन्फेक्शन होतं तेव्हा उलट्या होणं, जुलाब होणं हे त्रास होतात. तसंच न्युमोनियासारखा घातक आजार जो फुप्फुसे निकामी करु शकतो त्याचंही कारण ठरु शकणारे घातक बॅक्टेरीया आपल्याही नकळत आपण आपल्या अवती भवती वागवत असतो.

लहान मुलांना यांचा धोका जास्त असतो, कारण ती फरशीवर खेळतात, लोळतात. कधी कधी खाली पडलेल्या वस्तू तोंडात घालतात आणि या जिवाणू विषाणूंच्या थेट संपर्कात येतात. त्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे आजारपण त्यांना लवकर पकडते.

 

indian child crawling inmarathi

 

याचसाठी आपल्या बाहेरच्या चपला कधीही घरात आणू नयेत. स्वच्छता पाळून आपण घरात साध्या स्लीपर वापराव्यात. पण बाहेर वापरलेल्या चपला कधीही घरात वापरु नयेत असं हे संशोधन सांगतं.

घराची स्वच्छता करणं जमलं नाही, तर हेच विषाणू नकळतपणे हल्ला चढवून आपलं आरोग्य धोक्यात टाकू शकतात. स्वच्छतेचे साधे सोपे नियम पाळले तर आरोग्यदायी जीवनाचा लाभ होतो.

जान है तो‌ जहान है‌ असं म्हणतात, कारण जीवंत राहीलात तर जीवनाचा उपभोग घेऊ शकता. छोट्या छोट्या सवयींनी ते जीवन आनंदी, आरोग्यदायी करणं आपल्याला अवघड नाही.

===

हे ही वाचा – हाय-हिल्स स्त्रियांसाठी नव्हे, तर पुरुषांसाठी बनवल्या होत्या, विश्वास बसत नाहीये? हे वाचा

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?