' किडनी स्टोनच्या असह्य वेदनांवर ही ७ घरगुती पेयं ठरतील गुणकारी – InMarathi

किडनी स्टोनच्या असह्य वेदनांवर ही ७ घरगुती पेयं ठरतील गुणकारी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपले शरीर आतील बाजूने स्वच्छ करून निरूपयोगी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी किडनी हे अवयव काम करत असते. मात्र कधी कधी शरीरातील एक किंवा दोन्ही किडनीमध्ये काही खडे तयार होतात आणि हे खडे शरीरातील मूत्र बाहेर टाकण्याच्या मार्गात अडथळा बनतात. यालाच आपण मुतखडा असे म्हणतो.

हा त्रास अत्यंत वेदनादायी असतो. वेळीच त्याचा धोका ओळखता आला नाही तर दिवसेंदिवस त्रास वाढतो. मुतखड्याचा आकार वाढल्यानंतर शस्त्रक्रियेने तो बाहेर काढावा लागतो.

 

Kidney Pain Feature InMarathi

हे ही वाचा – ही असू शकतात किडनी खराब असण्याची लक्षणं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका…

मुतखडा हा आजार कोणत्याही वयोगातील व्यक्तीला होतो. मात्र स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना हा रोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. मूतखडा हा छोटा असेल, तर तो स्वतःहूनच लघवीवाटे पडून जाण्याची शक्यता असते. असे अंदाजे ८० टक्के छोटे खडे आपल्या नकळत पडूनसुद्धा जातात. आपल्याला त्यांचा त्रास तर होत नाहीच, पण मूतखडा पडून गेल्याचे जाणवतही नाही.

खाण्यापिण्यातील अनियमीतता आणि आवश्यक तेवढं पाणी न पिणे हे किडनी स्टोन होण्याचं मुख्य कारण आहे. सोबतच किडनी स्टोनमुळे पाठीच्या खालच्या भागात फार जास्त वेदना होतात. मळमळणे किंवा उटल्याही होऊ शकते. खूप जास्त घाम येणे, लघवी करताना त्रास होणे असेही काही प्राथमिक लक्षणे आहेत.

किडनी स्टोनची समस्या असणाऱ्या लोकांना नेहमी गुलाबी, लाल रंगाची लघवी होते आणि स्टोनचा आकार वाढल्याने मूत्रमार्ग ब्लॉग होतो. किडनी स्टोन झालेल्या लोकांच्या लघवीतून दुर्गंध येणे, सतत लघवीला जावे लागणे, पाठदुखी तीव्र वेदना होणं, किडनी आणि पोटावर सूज येणे अशी किडनी स्टोनची लक्षणे आहेत.

 

man urine

 

एवढा त्रास होण्यापेक्षा आपण मुतखडा न होण्यासाठी आपण साधे आणि सोपे उपाय अंमलात आणू शकतो.

काही घरगुती पेय या आजारातून तुमची सुटका करतील.

भरपूर पाणी पिणे 

 

drinking warm water inmarathi

 

रोज दिवसभरात १४/१५ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या शरीरातून सर्व निरुपयोगी पदार्थ यूरीनसोबत बाहेर टाकले जातात आणि शरीर शुद्ध आणि निरोगी राहते.

लिंबू पाणी 

 

nimbu-pani1-inmarathi

 

लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असते. हे ऍसिड कॅल्शियमपासून तयार होणाऱ्या मुतखड्याना मज्जाव करते, त्यामुळे लिंबू पाणी पिणे फायदेशीर आहे.

हे ही वाचा – मुतखड्यावर “रामबाण उपाय” म्हणून बिअर पिण्याआधी हे वाचा, नीट समजून घ्या!

तुळशीच्या पानांचा रस 

आयुर्वेदात तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. अनेक रोगांच्या उपचारामध्ये तुळशीचा वापर केला जातो.

 

tulsi inmarathi

 

तुळशीच्या पानांमध्ये ऍसिटिक ऍसिड असते जे शरीरातील मुतखड्याला तोडण्यासाठी उपयुक्त ठरते.

अँपल सायडर व्हिनेगर 

 

apple cyder inmarathi

 

एका शोधानुसार अँपल सायडर व्हिनेगर पाण्यासोबत घेणे देखील स्टोन न होण्यासाठी लाभदायक असते.

ओव्याचा रस 

हा रस देखील शरीरातील विषारी आणि निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो. शिवाय स्टोन्सला देखील तयार न होण्यासाठी मदत करतो.

 

ajwain inmarathi

 

हा रस तुम्ही दिवसातून २-३ वेळा घेऊ शकतात.

डाळिंबाचा ज्यूस 

 

juice inmarathi

 

या ज्युसमध्ये मोठ्याप्रमाणावर अँटिओसिडेन्ट असते, ज्यामुळे किडनीचे काम तर सुधारतेचसोबतच मुतखडा न होण्यासाठी देखील लाभदायक आहे.

राजम्याचे पाणी 

 

rajma water inmarathi

 

राजमा देखील किडनीला स्वच्छ ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. दिवसभर शिजवलेल्या राजम्याचे पाणी थोडे थोडे प्यायले तरी किडनी स्टोनचा धोका दूर होतो.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?