' बंगलोरमध्ये डिलिव्हरी बॉयने केली महिलेला मारहाण, महिलेने शेअर केला व्हिडिओ – InMarathi

बंगलोरमध्ये डिलिव्हरी बॉयने केली महिलेला मारहाण, महिलेने शेअर केला व्हिडिओ

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ऑनलाइन या शब्दाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. खरेदीपासून ते बिलांची चुकवणीपर्यंत सर्वच गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. अनेक फूड अँप आल्याने त्यावरून जेवण मागवण्याचे प्रमाण देखील खूप आहे. या अँपमुळे घरपोच मिळणारी सेवा खूप सोयीस्कर असल्याने अनेक जणं या अँपवरून फूड ऑर्डर करतात.

 

zomato inmarathi

हे ही वाचा – खमंग पदार्थ आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या स्विगीबद्दल ही इंटरेस्टिंग माहिती वाचून तुम्हीही थक्क व्हाल…!

मात्र झोमॅटो या फूड अँपवरून जेवण मागवणे एका महिलेसाठी डोक्याला ताप ठरला आहे. जेवण ऑर्डर करून ऑर्डर करुन ते कॅन्सल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने त्या महिलेला मारहाण केल्याची घटना कर्नाटकाच्या बंगलोरमध्ये घडली आहे.

पीडित महिलेने हा सर्व प्रकार एक व्हिडीओ तयार करून सांगितला आहे. सादर महिलेने तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट देखील केला आहे.

 

बंगलोरमध्ये एका महिलेने झोमॅटो या फूड अँपवरून जेवण ऑर्डर केले, मात्र दिलेल्या वेळेत जेवण न आल्याने त्या महिलेने झोमॅटोच्या कस्टमर केअर सेंटरमध्ये फोन करत, जेवण वेळेत न आल्याने महिलेने तिची ऑर्डर कॅन्सल करायला सांगितली. ती कस्टमर केअरशी बोलत असतानाच तिने ऑर्डर केलेले जेवण घेऊन डिलिव्हरी बॉय आला. मात्र तिने उशीर झाल्यामुळे आपण ऑर्डर कॅन्सल केल्याचे सांगितले.

ऑर्डर कॅन्सल केल्याचे ऐकून तो डिलिव्हरी बॉय चिडला आणि त्याने त्या बॉयने घरात घुसून ते जेवण ठेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र महिलेने त्याला विरोध करताच, त्या बॉयने महिलेला मारहाण केली, आणि यातच तिच्या नाकाला जोराचा मार बसला. तो व्यक्ती महिलेला मारून पसार झाल्यानंतर त्या महिलेने व्हिडिओ तयार करत झालेल्या प्रकारची माहिती दिली. सोबतच त्या डिलिव्हरी बॉयवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

women 2 inmarathi

 

पीडित महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या सर्व प्रकरणाची दखल बंगलोर पोलिसांनी घेतली असून, आरोपीला लवकर अटक करण्याचे आश्वासन दिलेले आहे. सोबतच झोमॅटोनेसुद्धा झालेल्या प्रकारावर माफी मागत असे प्रकार भविष्यात खडणार नाही असे सांगितले आहे. महिलेच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची तयारी झोमॅटोने दाखवली आहे.

===

हे ही वाचा – स्वरा भास्करने केलं असं काही की युजर्स “झोमॅटोवर” झाले नाराज!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?