' जुना मोबाईल देऊन नवा घेताय: एक्सचेंज करण्यापूर्वी फोनची खरी किंमत जाणून घ्या! – InMarathi

जुना मोबाईल देऊन नवा घेताय: एक्सचेंज करण्यापूर्वी फोनची खरी किंमत जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्न आणि मोबाईल बाबत एक गोष्ट सर्रास म्हटली जाते..जरा थांबलो असतो तर अजून छान माॅडेल मिळालं असतं!! कर लो दुनिया मुठ्ठी में असं म्हणत अवघं जग एका अंगठ्याच्या जोरावर समोर आणणारा मोबाईल हा सगळ्या जगापासून आपल्याला बाजूला ठेवून हर तऱ्हेने आपलं मनोरंजन करु शकतो.

३० वर्षांपूर्वी जर हे कुणी सांगितलं असतं तर पटलं असतं का? नाही! ३० वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात जपानने असे फोन तयार करायला सुरुवात केली आहे, ज्यात बोलणाऱ्या माणसाचा फोटो दिसेल..त्याचं ठिकाण समजेल..अशा बातम्या येतही होत्या.

पण लोक ते अगदी हलक्यात घेत होते. मग साधे फोन हळूच पेजरवर गेला..मग आला मोबाईल. तेव्हा असलेले इनकमिंग आणि आऊटगोईंग काॅलचे चार्जेस फक्त श्रीमंतानाच परवडतील असे होते.

 

mobiles inmarathi

===

हे ही वाचा मोबाईल डिस्प्ले फुटला तर हजारोंचा फटका! मग तो वाचवण्यासाठी हे वापरा

===

नंतर साधे मोबाईल पण स्मार्टफोन झाले आणि नवं डिजिटल युग अवतरलं. इंटरनेटच्या पॅकची किंमत पण सामान्य लोकांना परवडेल अशी झाली..आणि मोबाईल पण स्वस्त झाले.

प्रत्येक कंपनीचा वेगळा फोन वेगळे फीचर्स. या पाच सात वर्षांत बघा किती कंपन्या आल्या, किती फोन बाजारात आले, बघता बघता आख्खी बाजारपेठ मोबाईलनी काबिज केली. मग सुरु झाला मोबाईल बदलण्याचा खेळ!

लोक काही महिने..काही दिवस मोबाईल वापरत आणि नवं माॅडेल आलं की नवा मोबाईल खरेदी करत. आजही हा ट्रेंड तितकाच जोरात आहे. कधी मोबाईलच्या दुकानात जा, तिथं एक्सचेंज साठी येऊन पडलेले कितीतरी मोबाईल दिसतील.

खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईटवर गेलात तर तिथेही तुम्हाला ढिगाने आॅप्शन सापडतील. एक मोबाईल विकायचा, त्यातून आलेल्या पैशात थोडी भर घालून नवा माॅडेलचा मोबाईल घ्यायचा!

 

mobile exchange inmarathi

 

कॅमेऱ्याचे मेगा पिक्सल..फोटोचे रिझोलेशन, मेमरी कपॅसिटी, कुणाचा डिस्प्ले चांगला..तर कुणाची बॅटरीची कपॅसिटी चांगली..कुणाचा प्रोसेसर चांगला.. असे निरनिराळे फीचर्स लोकांना भुरळ पाडत राहतात आणि मोबाईलची बाजारपेठ जोरात चालते.

पण तुम्हाला हे माहित आहे का? मोबाईल एक्सचेंज करताना तुम्ही योग्य किंमतीत एक्सचेंज करता का? की दुकानदार सांगेल त्यानुसार विकता? कधी कधी त्यात नुकसान झाले आहे का तुमचे?काय बघता तुम्ही मोबाईल एक्सचेंज करताना?

योग्य काळजी घेऊन मोबाईल एक्सचेंज केल्यास योग्य किंमत मिळते!

खूप लोकांना हे पर्याय माहीत नसतात, फोन विकताना जरा घासाघीस करून चार ठिकाणी चौकशी करुन मग जर फोन विकला तर कदाचित चांगली किंमत मिळू शकते.

काहीजणांकडे ही घासाघीस करायला वेळ नसतो. काहीजण असे दहा पंधरा लोकांना भेटू शकत नाहीत किंवा OLX, Quicker वर लिस्टिंग करु शकत नाहीत.

 

olx inmarathi

 

मग त्यांना एकच सोपा पर्याय म्हणजे अॅमेझाॅन किंवा फ्लिपकार्ट वर येणाऱ्या एक्सचेंज आॅफरवर लक्ष ठेवून जुने देऊनी नवीन घ्या हा बाणा अवलंबावा किंवा असे काही प्लॅटफॉर्म आहेत जिथं जुन्या फोनच्या बदल्यात पैसे दिले जातात तिथंच आपला फोन विकणे.

===

हे ही वाचा मोबाईल स्लो झालाय? मनस्ताप करण्यापेक्षा हे घ्या फोनचा स्पीड वाढवण्याचे जबराट फंडे

===

या दोन्ही ठिकाणी वस्तू विकून पैसे घेणं हेच तत्त्व असतं. अशा ठिकाणी आपण फोन सहजासहजी विकू शकतो.

याचबरोबर आपण घरबसल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्या फोनची विक्री करण्यासाठी आॅफर देऊ शकतो. उदा. Cashfi, Insta cash, Cash For Phone, Badali, Amazon Exchange Value, Flipkart Exchange Value.

 

cashify inmarathi

 

या प्लॅटफॉर्मवर आपल्याला आपल्या फोनची जास्तीत जास्त किंमत कोण देईल हे समजते. त्यांनी दिलेली ही किंमत वरवरची नसते. फोनबाबत सगळी माहिती आपल्याकडून घेऊन ती तपासून मगच ते आपल्याला किंमत सांगतात.

एक सर्वसामान्य निरिक्षण –

१. फ्लिपकार्ट वर अॅमेझाॅन पेक्षा एक्सचेंज करताना जास्त किंमत मिळते.

२. कोणताही प्लॅटफॉर्म आपल्याला इतरांपेक्षा जास्त किंमत देऊ शकतो.

३. प्रत्येक प्लॅटफॉर्मचं आकडेमोडीचं सूत्र वेगळं असतं. तुमच्या फोनची चालू कंडीशन, त्याच्या सोबत असलेल्या अॅक्सेसरीज जसे चार्जर, हेडफोन्स, मॉडेल यावर ही किंमत आधारित असते.

४. सर्वात महत्त्वाचे जर तुम्हाला तुमचा फोन विकायचा असेल तर कुणाच्याही एकाच्या भरवशावर न राहता जास्त ठिकाणी नोंदणी करा. जिथं चांगली किंमत मिळेल तिथे फोन विकून टाका.

५. या एक्सचेंज ऑफरमध्ये अॅमेझाॅन किंवा फ्लिपकार्ट यांचा जास्त मोठा फायदेशीर भाग असतो. त्यांची स्पेशल ऑफर या सर्व किंमतींना मागे टाकत असते. त्यामुळे जर तुम्ही फोन विकायला उत्सुक असाल तर या दोन प्लॅटफॉर्मना प्राधान्य द्या.

 

flipkart exchange inmarathi

 

शेवटी आपली वस्तू विकताना आपल्याला योग्य दाम कोण देतं हे या सर्वात महत्त्वाचे. त्यामुळे नीट विचार करुन योग्य ठिकाणी आपण फोनच्या विक्रीसाठी पोचणं महत्त्वाचं..भले तो फोन वापरलेला असला तरीही!

===

हे ही वाचा तुमचा स्मार्टफोन या ९ ठिकाणी ठेवण्याची चूक तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?