' विश्वास बसणार नाही पण तुम्हीही या सुंदर बेटाचे मालक होवू शकता, कसे? वाचाच – InMarathi

विश्वास बसणार नाही पण तुम्हीही या सुंदर बेटाचे मालक होवू शकता, कसे? वाचाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजच्या जगात अशी कोणतीच वस्तू किंवा गोष्ट नाही जी विकत येणार नाही.

अनेक माणसं त्यांचे जीवन चैनीत जगण्यासाठी विविध महागड्या, हटके आणि स्वतंत्र गोष्टी खरेदी करून त्याचा उपभोग घेतात. काल परवापर्यंत आपण खासगी विमान किंवा जेट विकत घेण्याच्या अनेक बातम्या पहिल्या किंवा ऐकल्या असतील.

 

online shopping inmarathi'

 

मात्र आज आम्ही तुम्हाला विक्रीसाठी निघालेली अशी गोष्ट सांगणार आहोत जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्यापासून राहणार नाही.

बहामास या देशाच्या दक्षिणेस असणारे एक खासगी सेंट एन्ड्रू नावाचे आयर्लंड म्हणजेच बेट आता लिलावासाठी सज्ज झाले आहे. या आयर्लंडला लिट्ल रॅग्ड आयर्लंड असे देखील म्हटले जाते. ७३० एकरवर पसरलेल्या या आयर्लंडला निसर्गाने मोकळ्या हाताने सौंदर्याचे वरदान दिले आहे.

चहूबाजूला निळाशार आणि नितळ पाण्याचा समुद्र आणि मध्ये असणारे हे आयर्लंड कोणत्याही स्वर्गापेक्षा कमी नाही.

 

land for sale

हे ही वाचा – ९ भयानक बेटं, इथे प्रत्येक क्षण वैऱ्याचा आहे!

या आयर्लंडवर सर्वच प्रकारच्या सुखसोयी करण्यात आल्या आहे. पांढऱ्या मातीचे बीच असणाऱ्या या बेटावर खासगी जेटच्या उड्डाणासाठी किंवा उतरण्यासाठी धावपट्टी तयार केली आहे. शिवाय मोठमोठी योर्ट ठेवण्यासाठी सुद्धा सोया केली गेली असून, एकावेळेस अनेक योर्ट इथे ठेवता येणार आहे.

या आयर्लंडच्या काही भागात घनदाट जंगल तर आहेच सोबत अनेक नारळाची झाडे देखील आहे. शिवाय या बेटावर पिण्याच्या पाण्यासाठी अनेक लहान मोठे गोड्या पाण्याचे तलाव देखील आहेत.

हे आयर्लंड वॉटर ऍक्टिव्हिटी आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी देखील खूप प्रसिद्ध आहे.

 

watersports inmarathi

 

हे बेट जो कोणी विकत घेईल त्याला त्याच्या मनाप्रमाणे या बेटावर आलिशान घर बनवता येणार आहे. तसेच आवश्यक त्या डेव्हलपमेंट देखील करता येणार आहे. मात्र या बेटाच्या लिलावासाठी अजुन पर्यंत तरी कोणतीही किमान रक्कम निश्चित करण्यात आली नसली तरी लिस्ट प्राईज म्हणून १४२.३ कोटी रक्कम ठेवण्यात आली आहे. पण ज्या लोकांना या लिलावात सहभाग घ्यायचा आहे, त्यांना ७३ लाख रुपये भरून नोंदणी करणे आवश्यक आहे.

ह्या बेटाच्या मालकाचे नाव अजून सांगितले नाहीये. ही लिलावाची प्रक्रिया २६ मार्च पासून सुरु होणार आहे. हे बेट क्युबा पासून २२३ किलोमीटर तर मियामी पासून ३७२ किलोमीटर इतके दूर आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?