' ‘संभोगातून समाधीकडे’ असं अध्यात्म शिकवणाऱ्या ओशोचा गूढ जीवनप्रवास… – InMarathi

‘संभोगातून समाधीकडे’ असं अध्यात्म शिकवणाऱ्या ओशोचा गूढ जीवनप्रवास…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा :

===

ऐंशीच्या दशकात जगभरात अक्षरश: धुमाकूळ घातलेलं नाव म्हणजे, आचार्य रजनिश अर्थात ओशो. अध्यात्माची एक वेगळीच आणि तत्कालीन समाजाला भलतीच वाटणारी वाट ओशोंनी जगाला दाखवली.

एक गट होता भारावून जाऊन ही वाट चालणारा आणि दुसरा होता हे सगळे निव्वळ चाळे म्हणणारा. ‘संभोग से समाधी तक’ अशी ज्या अध्यात्माची ‘टॅग लाईन’च होती त्या अध्यात्मात काय होतं हे उघड आहे.

महागड्या रोल्स रॉयस गाड्या ते ब्रॅण्डेड कपडे आणि चारचौघात न बोलला जाणारा संभोगासारखा विषय अध्यात्मिक पातळीवर घेऊन जाणारं ओशो हे व्यक्तिमत्वच वेगळं होतं.

सुप्रसिध्द अभिनेता विनोद खन्ना अनेक वर्षं इंडस्ट्रीतूनच नव्हे तर जगाच्या नकाशावरून लापता होता. त्यानंतर तो पुण्याच्या ओशो आश्रमात सापडला आणि ओशो आश्रम हे नाव जास्त चर्चेत आलं. विनोद खन्ना आणि परविन बाबी या दोघांमुळे हे नाव सामान्यांपर्यंत गेलं.

 

parveen babi vinod khanna inmarathi

 

तोपर्यंत समाजाच्या एका गटालाच ओशोचं अध्यात्म माहित होतं. ओशोंच्या जगावेगळ्या अध्यात्मिक मार्गाविषयी बातम्यांच्या रुपानं सुरस कथा प्रसिध्द होऊ लागल्या आणि लोकांचे जबडे आ वासून उघडले गेले. जो विषय नवरा बायकोही चारचौघात बोलत नसत तो ओशोंनी खुल्लम खुल्ला नुसता चर्चिलाच नाही तर त्यांच्या भक्तांनी अगदी खुलेआम त्याची “प्रॅक्टिस”ही केली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

संभोगातून साधना आणि साधनेतून अध्यात्मिक उन्नती असा हा मार्ग जगासाठी नवाच होता. विशेषत: परकीय भक्तांनी हे नवं भारतीय अध्यात्म आपलंसं करायला सुरवात केली.

मध्य प्रदेशातिल रायसेन येथील कुचवाडा गावात कापड व्यावसायिक कुटुंबात जन्मलेला आणि चंद्र मोहन जैन असं नाव असलेला हा मुलगा अकरा भावंडात सगळ्यात मोठा होता.

घरी देखभाल करणारं कोणी नसल्यानं ते कायम आपल्या आजोळी राहिले. एकवीस वर्षांचे झाल्यावर कुटुंबियांनी लग्नाचा लकडा मागे लावला मात्र तोवर चंद्रमोहन याचा संन्यासी जीवन जगण्याचा निर्णय पक्का झालेला होता.

चंद्रमोहन नंतर अध्यात्मिक गुरू बनला. या ‘सेक्सगुरू’ने (भारतीय आणि परदेशी माध्यमांनी ओशोंना दिलेलं नाव) त्याचं ओशो हे नाव लॅटिन भाशेतील “ओशोनिक” शब्दावरून घेतलं.

 

chandra mohan jain aka osho inmarathi

जबलपूरमध्ये सगळं शिक्षण झाल्यावर जबलपूर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून ते रूजू झाले. विविध धर्मातील अध्यात्माबाबत कुतुहल असणार्‍या चंद्रमोहन यांनी या विषयावर देशभरात व्याख्यानं द्यायला सुरवात केली.

त्यानंतर १९८१ ते १९८५ या दरम्यान ते अमेरिकेला निघून गेले. तिथे त्यांनी ओरेगॉन येथे एका आश्रमाची स्थापना केली. हा आश्रम ६५ हजार एकर इतक्या विस्तीर्ण आवारात पसरला होता. आश्रमात भोगविलासाची सर्व साधनं पुरवली जात. इथूनच चंद्रमोहन यांचा ओशोंच्या रूपानं नवा जन्म झाला.

ओशोनिकचा अर्थ आहे सागराला जाऊन मिळणारा, त्याच्याशी एकरूप होणारा प्रवाह. जीवनाला नदीचं नाव देणार्‍या ओशोंचं खाजगी आयुष्य अत्यंत रहस्यमय होतं आणि नंतर ते विवादास्पद बनलं.

ओरेगॅनो येथील आश्रमानंतरच ते जगाच्या नजरेत आले. महागड्या रोल्स रॉयससारख्या गाड्या, लाखोंच्या किंमतींची घड्याळं यामुळे ते जगभरात चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय बनले.

 

osho inmarathi

 

१९८५ साली त्यांनी अमेरिकेतला त्यांचा आश्रम नोंदणीकृत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला खूप विरोध झाल्यानं त्यांना भारतात परतावं लागलं.

भारतात परतल्यावर पुण्यातील कोरेगाव पार्क या भागातील त्यांच्या आश्रमात ते वास्तव्यास आले. भारतीय अध्यात्मिक गुरूंनी त्यांची भोगवादी म्हणून कायमच हेटाळणी केली असली, तरीही दुसर्‍या बाजूला जगभरातील प्रचंड पैसा बाळगून असलेली श्रीमंत मंडळी झपाट्यानं त्यांचे भक्त बनत गेली. ओशो नावाची संमोहित करणारी जादू जगभरात लाटेसारखी पसरत चालली होती.

ओशोंची प्रवचनं ज्यांनी ऐकली आहेत त्यांना त्या आवाजातली ताकद नक्कीच माहित असेल. त्या आवाजात ऐकणार्‍याला संमोहित करण्याची ताकद आहे. त्यांचे विचार ज्यांनी वाचले आहेत त्यांना त्या शब्दातली ओढ नक्कीच जाणवली असेल.

विवादास्पद वाटेवरचं हे अध्यात्म अनेकांना आपल्याकडे खेचून घेणारं होतं हे नक्की. त्याची जादू आजही इतक्या वर्षांनंतर त्यांच्या मृत्युनंतरही कायम आहे.

ओशो हे नाव मात्र अध्यात्मापुरतंच मर्यादित राहिलं नाही. या नावानं अनेक विवादही उभे केले. अध्यात्मिक गुरुची इमेज बदलून टाकणारी जीवनशैली असणार्‍या ओशोंचे आश्रम हे एखाद्या चित्रपटात शोभेल असे होते.

osho international pune inmarathi

 

रजनिशपूर हे नाव नंतर इतक्या विचित्र पध्दतीनं चर्चेत राहिलं, की त्यातलं अध्यात्म बाजूला राहून जवळपास चमडी बाजार म्हणून त्याची ओळख ठळक होऊ लागली. संभोगातून समाधीकडे घेऊन जाणारं ओशोंचं अध्यात्म कधी बाजारू बनलं कोणालाच कळलं नाही. या सगळ्या विवादात एक नाव सतत समोर येत राहिलं, माँ शिला आनंद!

ओशो आणि माँ शिला यांची प्रेमकहाणी हा विषय असो किंवा माँ शिला यांचं खाजगी आयुष्य. जितके ओशो रहस्यमय होते तितक्याच माँ शिलाही…

माँ शिला यांच्यामते एक सामान्य फकीर असणार्‍या ओशोंना जगभरात ओळख मिळाली ती माँ शिलांमुळे; तर ओशोंच्यामते एक सामान्य हॉटेल परिचारिका असणार्‍या मुलीला त्यांनी राणीचा दर्जा मिळवून दिला.

 

osho and ma sheela inmarathi

 

मुंबईतील एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या शिला अंबालाल पटेल या मुलीचे वडील ओशोभक्त होते. वयाच्या सोळाव्या वर्षीच शिला ओशोंकडे आकृष्ट झाली. हे संमोहन इतकं प्रभावी होतं की त्या ओशोंच्या मागोमाग शिक्षणासाठी म्हणून अमेरिकेला निघून गेल्या.

शिक्षण आणि लग्न करून त्या पती मार्क यांच्यासोबत भारतात परतल्या. दोघेही रजनिश भक्त होते. पती निधनानंतर १९८१ मध्ये त्या ओशोंच्या खाजगी सचिव बनल्या. त्या सचिव बनल्यानंतर पुण्यातील या आश्रमातून अचानक अमेरिकेला स्थलांतरीत होणार्‍या भक्तांची संख्या वाढली. याचं कारण ओशो यांनी ओरेगॅनो येथे घेतलेली ६४ हजार एकर जागा (ही जागा शिला यांनी घेतल्याच्या चर्चा आहेत).

स्थलांतर केल्यानंतर याठिकाणी त्यांनी एका स्वतंत्र समाजाची बांधणी केली. रजनिशपुरम येथे शाळेपासून दुकानांपर्यंत सर्व काही होतं. राजकीय फायद्यापायी या शहरातील रहिवाशांना मास पॉईझनिंग केल्याचा शिला यांच्यावर आरोप होता. हा एकच काळा डाग त्यांच्या व्यक्तिमत्वावर नव्हता तर इतर अनेक काळ्या कृत्यात त्यांचा सहभाग होता. १९८६ साली त्यांना जेलमधेही जावं लागलं.

ओशोंच्या मृत्यूनंतरही त्यांना अनेक विवादांना सामोरं जावं लागलं होतं. असं म्हटलं, जातं की मां शिला यांनी तीन हजार बेघर लोकांना रजनिशपूरममध्ये आणलं आणि त्यांना अंमली पदार्थांच्या अंमलाखाली त्यांच्याही नकळत कैदेत ठेवलं होतं.

 

ma anand sheela inmarathi

 

इतकंच नाही तर साक्षात ओशोहो अंमली पदार्थांचे व्यसनी असल्याचं कालांतरानं अनेक रजनिशीजनी आपल्या मुलाखतीत सांगितलं. हे ड्रग्ज त्यांना शाररिक वेदनांसाठी त्यांच्या डॉक्टर देत असल्याचं म्हटलं जातं.

गत्यांच्या निकटवर्तीय माँ शिला यांच्यामते त्यांच्या मर्जीविरुध्द ते ड्रग त्यांना दिलं जात होतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?