' फेमीनीजमच्या नावाखाली स्वतःचा अजेंडा सिद्ध करू पाहणारी बोगस ‘बॉम्बे बेगम्स’ – InMarathi

फेमीनीजमच्या नावाखाली स्वतःचा अजेंडा सिद्ध करू पाहणारी बोगस ‘बॉम्बे बेगम्स’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

नुकताच नवीन वर्षाचा नवीन मेन्यू या मथळ्याखाली नेटफ्लिक्सने जाहिरात केली ज्यात नेटफ्लिक्स इंडियाच्या वेगवेगळ्या फिल्म्स आणि सिरिजची झलक होती. २०२१ मध्ये नेटफ्लिक्स ज्या कलाकृती लोकांसमोर आणणार आहे त्याचा हा व्हिडिओ आहे.

त्यातली या वर्षाची सर्वात पहिली नेटफ्लिक्स ओरिजिनल सिरिज म्हणजे ‘बॉम्बे बेगम्स’. ८ मार्च म्हणजेच महिला दिनाचं औचित्य साधून ही सिरिज त्या दिवशी रिलीज केली गेली.

 

bombay begums inmarathi

 

ट्रेलरवरुन Women Centric वाटणारी सिरिज इतकी बेगडी पोकळ असू शकते याचा तुम्ही अंदाज लावू शकता ते म्हणजे या सिरिजच्या मेकरचं नाव ऐकून. अलंकृता श्रीवास्तव हिने ही सिरिज डायरेक्ट केली आहे जीने आधी ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ किंवा ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ अशा फिल्म्स दिल्या असतील.

आता एकंदर तुम्हाला अंदाज नक्कीच आला असेल की बॉम्बे बेगम्स ही सिरिज कशावर असणार आहे ते! असो मी ही सिरिज काल बघून संपवली, आणि त्यातून निष्पन्न काहीच झालं नाही, काय मिळालं असेल तर मनस्ताप!

तुम्हाला या सिरिजच्या ट्रेलरवरुन हिची कथा फेमीनीजम वर भाष्य करणारी वाटत असेल खरी पण, ही सिरिज आणि यातली सगळीच महिला पात्र ही गोंधळलेली, निगेटिव्ह आणि बीभत्स आहेत असं माझ्या कित्येक मैत्रिणींनीसुद्धा सांगितलं आहे!

===

हे ही वाचा दरवाज्याआडचं स्त्री पुरुषाचं नातं दाखवता दाखवता भलतंच काहीतरी दाखवणारा प्रयोग

===

मुळात फेमीनीजम किंवा महिला सशक्तीकरणाचा या सिरिजशी दूरदूरवर कोणताही संबंध नाही, तसं आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा असं disclaimer याच्या सुरुवातीलाच यायला हवं पण मग या सो कोल्ड बुद्धिजीवी लोकांना त्यांचा अजेंडा सिद्ध करणं आणखीनच कठीण होऊन बसलं असतं नाही का?

ही कथा आहे सिटी ऑफ ड्रीम्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतल्या ५ स्त्रियांची! रानी (पूजा भट) ही मुंबईतल्या एका मोठ्या बँकची CEO आहे, फातीमा (शहाना गोस्वामी) आणि आयेशा (प्लबीता बोरठाकूर) या दोघी त्याच बँकेत कामाला आहेत, रानीची मुलगी शाय ही अकाली प्रौढत्व आलेली शाळकरी मुलगी आहे, आणि लिली (अमृता सुभाष) ही एक बार डान्सर आणि वैश्यव्यवसाय करणारी आहे!

 

begums bombay inmarathi

 

कथा फिरते ती याच ५ मुख्य पात्रांभोवती. रानीचा सावत्र मुलगा लिलीच्या मुलाला गाडीने उडवतो आणि लिली रानीचं स्टेट्स सिम्बल बघून पोलिसात तक्रार करण्याऐवजी रानीला ब्लॅकमेल करून मुलाच्या भवितव्यासाठी तिच्याकडून पैसे उकळायला सुरू करते.

ही मुख्य घटना घडल्यानंतर कथेतल्या या सगळ्या महिलांचं आयुष्य कसं बदलत या संदर्भात ही सिरिज पुढे भाष्य करते, ज्याला खरंतर हात पाय काहीच नाही पण ओढून ताणून चाललेलं हे नाट्य बघताना तुमच्या डोक्याला शॉट बसतो ही मात्र नक्की!

रानीचं पात्र करारी, स्वतःच्या पायावर उभी असलेली मानी स्त्री जी एका रेप्यूटेड बँकची सीईओ आहे, ऑफिसमधल्या होणाऱ्या पॉलिटिक्सचा ती एक भाग आहे, आणि बाई असल्याने तिलादेखील या सो कॉल्ड पुरुषप्रधान समाजाने दाबलं आहे!

रानीची सावत्र मुलगी शाय, १२ – १३ वर्षाची शाळकरी मुलगी आहे आणि तीच या सिरिजची कथा आपल्याला नरेट करत असते. वयवर्ष १३ असलं तरी हीचं फक्त एकाच गोष्टीत लक्ष आहे ते म्हणजे मला पिरीएड कधी येणार? मी ब्रा कधी घालणार? मी प्रेमात कधी पडणार? आणि मी संभोग कधी करणार?

संपूर्ण सिरीजमध्ये ती फक्त तिची बॉडी आणि तिच्या शारीरिक गरजा याबाबतीतच बोलत असते, विचित्र आणि अश्लील चित्र काढत असते वगैरे वगैरे!

फातीमा हे पात्र एका मुस्लिम कुटुंबातलं आहे, तिचा नवरा देखील तिच्याच बँकेत काम करतो पण हे दाम्पत्य मूल होण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत असतं, शिवाय फातिमा स्वतःच्या करियर बद्दल इतकी passionate दाखवली आहे की त्यासमोर तिला प्रत्येक गोष्ट नगण्य वाटते!

 

fatima inmarathi

 

आयेशा ही इंदोरवरून आलेली आणि या बँकेत काम करणारी एक तरुणी आहे, जी स्वतः इतकी गोंधळलेली आहे की आपला Sexual Preference सुद्धा तिला धड ठाऊक नाही, तर करियर आणि आयुष्याच्या बाबतीत विचारायलाच नको.

एक सीन आहे ज्यात ती एका मुलीला कीस करत असते, लगेच तिथून निघून ती तिच्या ऑफिस कलीगच्या घरी जाते आणि त्याला कीस करते, बॉस नक्की दाखवायचंय तरी काय? आणि या सगळ्याचं एक्सप्लनेशन म्हणजे ती Bisexual असणं हे दाखवणं हे तर त्याहून हास्यास्पद होतं!

लिली ही वेश्या आहे, तिचं आयुष्यात फक्त एकाच ध्येय आहे की आपल्या मुलाला मुंबईचा अंबानी बनवायचा मग त्यासाठी कोणत्याही थराला जावं लागलं तरी चालेल, या संपूर्ण सिरिजमध्ये हेच एकमेव पात्र थोडंफार ठीक वाटतं पण नंतर तीचीसुद्धा गत या इतर पात्रांसारखीच होते!

बरं ही सिरिज अलंकृता श्रीवास्तवची, म्हणजे यातल्या प्रत्येक महिलेचं बाहेर काहीतरी सॉलिड अफेअर असणार हे तर विधिलिखितच आहे! 

शिवाय यातल्या प्रत्येक पुरुषपात्राला निगेटिव्ह दाखवणं, वासनांध दाखवणं, डोमेस्टिक हिंसा करणारा दाखवणं हे सगळं ओघाने आलंच त्याशिवाय या सो कोल्ड लिबरल लोकांना शांत झोप कशी लागणार?

फेमीनीजमच्या नावाखाली दारू, सिगरेट, ड्रग्स, शिव्या, ओंगळवाणे सेक्स सीन्स, Multiple fuck buddies, हे सगळं दाखवलं नाही तर यांची पितरं स्वर्गात कशी जाणार?

 

anakrita shrivastav inmarathi

 

कधी सुधारणार हे ओटीटी प्लॅटफॉर्म आणि खासकरून नेटफ्लिक्स इंडियाची मानसिकता. तुम्ही काय दाखवताय याचं तुम्हाला तरी भान आहे का? जेंव्हा ओटीटी प्लॅटफॉर्म नवीन नवीन होते तेंव्हा ही सगळं चालून जात होतं पण आता लोकांना तुमचा अजेंडा कळून चुकला आहे.

अभिव्यक्तिच्या नावाखाली, sexual liberation च्या नावाखाली, ही लोकं मनाला येईल ते दाखवत चालले आहेत याचा लोकांना अंदाज नाहीये असं जर यांना वाटत असेल तर यांच्यासारखे मूर्ख हेच!

फॅमिली वॅल्यूज, नीतीमूल्य, भारतीय सभ्यता, समाज यांना जितकं शक्य होईल तितकं निगेटिव्हली दाखवायचं हीच या लोकांची विकृत मानसिकता आहे. साऊथ बॉम्बे कल्चरच्या नावाखाली संपूर्ण शहराला एकाच तराजूत तोलायचं हे आपण कित्येक वर्षांपासून बघत आलो आहोत.

वर्कप्लेस मध्ये होणारी haraasment, घरून होणरा छळ, समाजात आजही स्त्रीला दुय्यम स्थान देणं हे प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत घडतं ते कुणीच नाकारत नाही! पण केवळ तुमचा हेतु सिद्ध करण्यासाठी अशा गोष्टींची कुबडी घेणं हे किती लाजिरवाणं आहे!

मला म्हणून या अशा फिल्ममेकर्सची आणि त्यात काम करणाऱ्या लोकांच्या मानसिकतेची कीव करावीशी वाटते, फक्त आर्थिक फायद्यासाठी ही लोकं कोणत्याही थराला जाऊ शकता!

===

हे ही वाचा उपद्रवी बाबांची पोलखोल का आणखीन काही – ह्या “आश्रम” मध्ये नेमकं आहे तरी काय?

===

यातल्या मुख्य पात्राविषयी आपण बोललोच, तसं बघायला गेलं तर प्रत्येक कलाकाराने अभिनय उत्तमच केला आहे, त्यांच्या अभिनयावरून नक्कीच ही सिरिज जज करू नका अशी माझी विनंती आहे.

पण यातही आणखीन एक गोष्ट खटकणारी अशी की आपल्या मराठी कलाकारांना स्टीरियोटाइप करणं. अमृता सुभाषला बारबाला म्हणून दाखवणं आणि लोकेश गुप्तेला एक वासनांध भ्रष्ट राजकारणी दाखवणं हे खटकत.

 

amruta subhash inmarathi

 

अमृता सुभाष ही इतकी तगडी अभिनेत्री आहे, यातलं मुख्य पात्र साकारायची क्षमता फक्त तिच्यात आहे, पण आपल्या मराठी कलाकारांनीसुद्धा हे असे रोल स्वीकारण्याआधी आपल्यातल्या टॅलेंटचा विचार नक्कीच करायला हवा!

बारबालेचा रोल करण्याबद्दल आक्षेप नसून चांगल्या अभिनेत्रीने केवळ नेटफ्लिक्ससारखं मोठ्या प्लॅटफॉर्मचं नाव मिळतंय म्हणून आपल्या capablity च्या खालचा रोल करणं ही गोष्ट प्रचंड खटकणारी आहे!

मुळात महिला या पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढेच होत्या आणि आहेत असंच मला वाटतं. पण सध्याच्या फिल्म्स आणि वेबसिरीजमधून महिलांचा ज्याप्रकारे चित्रण होतं ते पाहून खरंच डोक्यात तीडिक जाते!

नुकताच महिलादिनाच्या आधीच स्मिता पाटील यांचा मिर्च मसाला हा सिनेमा पाहण्यात आला होता, आणि ते पाहिल्यावर याची प्रकर्षाने जाणीव झाली की हेच खरं महिला सशक्तीकरण!

 

mirch masala inmarathi

 

ज्यांना फोर मोर शॉट्स प्लीज, विरे दी वेड्डिंग किंवा बॉम्बे बेगम्स सारख्या कलाकृति आवडतात त्या लोकांनी आणि खासकरून या असल्या बीभत्स कलाकृति सादर करणाऱ्या कलाकारांनी मिर्च मसाला या सिनेमाची पारायणं करायला हवीत!

महिला सशक्तीकरण म्हणजे पुरुषांना व्हिलन दाखवणे किंवा पुरुषाच्या प्रत्येक कृत्याच अनुकरण करणे, किंवा त्याच्या पावलावर पाऊल टाकणे हे नसून स्वतःचा स्वतंत्र असा मार्ग तयार करणे आणि त्यावरूनच आपली प्रगती करणे म्हणजेच women empowerment हे तुम्हाला मिर्च मसाला सारखा सिनेमा बघितल्यावर जाणवेल!

असो तरी काही सो कॉल्ड बुद्धिजीवी लोकं यावर प्रश्न करतीलच की जर तुम्हाला ३५० पेक्षा जास्त बायकांसोबत झोपणारा माणूस फिल्मचा नायक म्हणून चालू शकतो तर त्याच्यासारखी वागणारी नायिका का नाही चालू शकत?

 

sanju inmarathi

 

माझ्यासाठी दोन्ही गोष्टी अत्यंत चुकीच्याच आहेत आणि त्या गोष्टीचं उदात्तीकरण तर आणखीनच निंदनीय आहे.

असो तरीही तुम्हाला हा मनस्ताप सहन करायची इच्छा असेल तर ६ तासांचं बलिदान द्यायला तयार रहा, नेटफ्लिक्सवर सिरिज उपलब्ध आहे!

===

हे ही वाचा ठाकरे ते अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : राजकारण आणि चित्रपटांचं अदृश्य परंतु भेदक वास्तव

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?