' नर्सने हात लावताच पोलिसाला फुटलं हसू : गमतीशीर व्हिडिओ नक्की बघा – InMarathi

नर्सने हात लावताच पोलिसाला फुटलं हसू : गमतीशीर व्हिडिओ नक्की बघा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या भारतात कोरोनाच्या लसीकरणाची मोहीम जोरदार सुरु आहे. अनेक सामान्य नागरिकांपासून ते फ्रंटलाईन वर्कर्सपर्यंत सर्वच लोकांना ही लस देण्यात येत आहे. लस देण्याचे अनेक व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

अनेक जणं त्यांनी लस घेतल्यानंतर त्यांचे फोटो सोशल मेडियावरून शेयर करत लस घेतल्याची माहिती देतात. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आता इंजेक्शन म्हटल्यावर भल्या भल्या लोकांना भीती वाटते. अनेकांना तर खूपच रडायला येते. इंजेक्शन द्यायच्या वेळी घडणाऱ्या अनेक मजेदार गोष्टींचे अनेक आपण पाहिले असतील आज आम्ही तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ दाखवणार आहोत.

 

vaa inmarathi

 

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच खूप हसायला येईल. या व्हिडिओ मध्ये एका पोलिसाला लस देण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र हा पोलीस त्याला नर्सने हात लावताच जोरजोरात हसायला लागतो. सुरुवातील लस घेण्यासाठी एकदम तयारीत दिसणारा हा पोलीस नर्सने हात लावताच वेड्यासारखा हसताना दिसत आहे.

स्वतः खूप कंट्रोल करूनही तो नर्सने हात लावला की पोट धरून हसतो. त्याला असे वेड्यासारखे हसताना पाहून त्या सेंटरवर असलेले इतर लोकही हसत आहे. दुसरी एक नर्स त्याचे लक्ष विचलित करण्याचा देखील असफल प्रयत्न करते.

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेयर केला आहे. ते म्हणतात, ” माझ्यामते हा व्हिडिओ नागालँडचा आहे. माहीत नाही, अखेर त्या व्यक्तीने लस घेतली की नाही… असे वाटत आहे की, त्याला नर्सने हात लावताच खूप गुदगुल्या होत होत्या. तो सुईपेक्षाही जास्त त्या गुदगुल्यांना घाबरत असावा.’

हे ही वाचा – १ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार, पण कुणाला आणि कशी? ही माहिती वाचा

===

कोरोना लस येतीये, त्याचं नियोजन करणारं ॲप कोणतं? ते कसं वापरायचंय? जाणून घ्या

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?