' ...म्हणूनच मैदानावर आणि मैदानाबाहेरही तो जंटलमन होता. राहुल... नाम तो सुना होगा!

…म्हणूनच मैदानावर आणि मैदानाबाहेरही तो जंटलमन होता. राहुल… नाम तो सुना होगा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – ईशान घमंडे 

===

राहुल द्रविड म्हटलं, की एक शांत चेहरा डोळ्यांसमोर येतो. अगदी सहजपणे आणि शांत राहून आपलं काम चोख पार पाडणारा खेळाडू होता राहुल! कुणाच्या अध्यात ना मध्यात. ‘मी बरा नी माझं काम बरं’ या उक्तीचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका असलेला राहुल द्रविड.

 

rahul dravid inmarathi

 

अनेक वर्षं त्याला खेळताना पाहिलं, इतरांच्या यशामध्ये त्याचं यश झाकोळलं जातानाही पाहिलं. हे पाहताना मलाही वाईट वाटायचं, मग त्याला किती वाटलं असेल याचा कदाचित आपण विचारही करू शकणार नाही. इतकं असूनही, त्याला कधीही चुकीचं वागताना पाहिलेलं आठवत नाही. मैदानावर तर नाहीच, पण मैदानाबाहेरही नाही.

मैदानावर तो कधी चिडलाय, त्याने स्लेजिंगला (बॅटव्यतिरिक्त इतर गोष्टींमधून) प्रत्युत्तर दिलंय, असं फारसं घडलेलं कधी आठवत नाही. क्वचित प्रसंगी झालंही असेल, पण तोही एक माणूसच आहे की मंडळी! तेवढं कधीतरी व्हायचंच.

हे असं घडत नव्हतं, म्हणूनच त्याला ‘जंटलमन्स गेम’चा खरा जंटलमन म्हणून ओळखलं जातं.

 

rahul dravid gentleman inmarathi

 

मैदानाबाहेरही तो जंटलमनच नाही, तर अगदी गुणी बाळ कसा होता, हे अनेक प्रसंगांमधून पाहायला मिळतं. त्यातलाच एक, मला भावलेला आणि महत्त्वाचा वाटणारा एक प्रसंग शेअर करतोय. मध्यंतरी हा विडिओ पुन्हा एकदा फारच व्हायरल झाला होता. त्याचवेळी तो बघितला आणि द्रविडबद्दल मनात असेलला आदर आणखी वाढला.

झालं असं होतं, की एका नामवंत वाहिनीने त्यांच्या खास शैलीत त्याची थोडी मस्करी केली होती. या मस्करीत ‘बकरा’ बनलेल्या द्रविडने एकूणच, उत्तम वागणूक आणि खिलाडूवृत्तीचं जे प्रदर्शन केलं, ते त्याचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी पुरेसं ठरतं. आमच्यासारख्या अनेक तरुणांचा तो आदर्श ठरलाय तो त्यामुळेच!

हे ही वाचा – “अज्ञात द्रविड”- हा राहुल द्रविडसुद्धा तुमच्या-आमच्या मनात बसायला हवा..!

द्रविड शांतपणे त्याच्या खोलीत काहीतरी खात बसलेला असताना, स्वतःला रिपोर्टर म्हणवणारी एक मुलगी त्या खोलीत आली. आपलं नाव तिने सायली असं सांगितलं आणि सिंगापूरच्या एका चॅनेलसाठी तिला द्रविडची मुलाखत घ्यायची होती.

द्रविडची संमती मिळाल्यानंतर, साधारणपणे १० मिनिटं तिने त्याची मुलाखत घेतली. मुलखत संपवून तिने कॅमेरा बंद करण्याची खूण केल्यानंतर जे घडलं ते मात्र अगदीच अविश्वसनीय आणि विचित्र होतं.

तिने चक्क द्रविडला लग्नाची मागणी घातली. एवढंच नाही, तर हे सगळं करत असताना तिने द्रविडशी जवळीक साधण्याचा फार प्रयत्न केला.

हे सगळं घडत असताना, तिने लग्नाची मागणी घातलेली ऐकून द्रविड तिथून उठला. त्याने हा विषय टाळून थेट तिच्यापासून अंतर राखायचा प्रयत्न केला.

तेवढ्यात तिच्या वडिलांनी खोलीत प्रवेश केला आणि आणखी एक गंमत घडली. राहुल द्रविडला त्यांनी चक्क सचिन म्हणून हाक मारली. सचिन हा क्रिकेटचा देव आहे, यात शंकाच नाही. पण, द्रविड सुद्धा एक जबरदस्त खेळाडू आणि अनेकांचा आदर्श आहे, हे आमच्यासारखे फॅन्स नक्की सांगतील.

 

sachin tendulkar rahul dravid inmarathi

 

अशावेळी, मुळात ती मुलगी वेड्यासारखं वागत असताना, तिच्या वडिलांनी त्याला चुकीच्या नावाने हाक मारावी, राहुलला ओळखूही नये, हा त्याचा अपमान होता हे नक्की!

हे असं सगळं घडत असताना, एकदाही त्याने ना अपशब्द उच्चारला, ना त्याचा आवाज चढला. शांतपणे तो त्या बापलेकीच्या जोडीला समजावत होता.

आजच्या काळातील विराट, रिषभ वगैरे मंडळींनी या द्रविडच्या आदर्श का घ्यावा हे यातून नकीच कळतं. ही सगळी एक मस्करी होती आणि त्याचा ‘बकरा’ करण्यात आलाय, हे कळल्यावर सुद्धा त्याने सगळ्या गोष्टी खिलाडूवृत्तीने स्वीकारल्या.

एक खराखुरा जंटलमन असल्याची वागणूक त्याच्या प्रत्येक हालचालीत दिसून आली. नेमकं काय घडलं, ते पाहण्यासाठी हा विडिओ बघाच.

 

 

राहुल द्रविड या खेळाडूप्रमाणेच राहुल द्रविड या माणसावरही आम्हा चाहत्यांचं आजही प्रेम आहे, ते या एकाच कारणासाठी!

===

हे ही वाचा – “कॉट कुंबळे, बोल्ड द्रविड” ही नेमकी काय ‘भानगड’ आहे, तुम्हाला ठाऊक आहे का?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?