'फिरस्ती प्रिय महिलांसाठी "जगात भारी" असलेली 'ही' माहिती अतिशय महत्वाची आहे!

फिरस्ती प्रिय महिलांसाठी “जगात भारी” असलेली ‘ही’ माहिती अतिशय महत्वाची आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

नुकताच आपण महिला दिन साजरा केला. महिला दिन असो किंवा इतर सामान्य दिवस, महिलांची सुरक्षा हा संपूर्ण जगासाठी मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. आज महिला त्यांच्या शहरात, राज्यात, देशातच सुरक्षित नाहीत तर इतर देशांबद्दल काय बोलणार?

 

rape victim featured inmarathi

हे ही वाचा – जगातल्या सर्वोत्तम स्विमिंग पूल्सची ही व्हर्च्युअल सफारी तुम्हाला नक्कीच आवडेल!

आजच्या शतकातील महिलांना अनेकदा काही काळापुरते सर्व जबाबदाऱ्या, टेन्शन विसरून स्वतःपुरते स्वछंदी आयुष्य जगायचं, एकटे फिरायची खूप इच्छा असते. मात्र ‘सुरक्षा’ हा सर्वात मोठ्या प्रश्न त्यांच्यासमोर आ विसरून उभा असतो.

त्यामुळेच त्यांना त्यांच्या घरातून परवानगी मिळणे देखील मुश्किल असते. अशा वेळेस स्त्रियांना कोणते शहर, कोणता देश आपल्यासाठी सुरक्षित असेल हे माहिती असते तर किती बरे झाले असते, असे वाटायला लागते.

 

women inmarathi

 

आज आम्ही आमच्या या लेखातून तुमचा हाच प्रश्न सोडवणार आहोत. या जगात महिलांना एकटे फिरण्यासाठी कोणते देश एकदम सुरक्षित आहे, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

फिनलँड

स्वीडिश भाषीय देश असणारा फिनलँड हा युरोप खंडातील हा देश महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप चांगला समजला जातो. याचं कारण म्हणजे तेथिल बळकट सुरक्षा व्यवस्था. पर्यटक म्हणून महिला कधीही, केंव्हाही एकट्या फिरु शकतात.

 

finland

 

या देशातील अनेक घनदाट जंगल, मोठं मोठे धबधबे, लेमेन्जोकी नॅशनल पार्क आदी अनेक गोष्टी पर्यटकांच्या आकर्षणाचा बिंदू असतात.

कॅनडा

उत्तर अमेरिका खंडात असणाऱ्या या देशाला निसर्गाने भरभरून सुंदरतेचे वरदान दिले आहे. अतिशय जुनी जंगले, बर्फाच्छादित डोंगर, अनेक सुंदर आणि मोठे तलाव, सुंदर शहरं आदी अनेक गोष्टी पर्यटकांना खुणावत असतात.

 

canada inmarathi

 

अमेरिकेतील देशांमध्ये कॅनडा हा महिलांसाठी सर्वात सुरक्षित देश मानला जातो.

न्यूझीलँड

जगातला अतिशय सुंदर देश म्हणून या देशाकडे पाहिले जाते. उत्तर बेट आणि दक्षिण बेट या दोन बेटांवर वसलेल्या या देशाचा शोध खूप उशिरा लागला.

 

solo women inmarathi

 

एडव्हेंचर स्पोर्ट्स, अतिशय मनमोहन निसर्ग असणारा हा देश स्त्रियांसाठी जगातला चौथा सुरक्षित देश असल्याचे एका सर्वेक्षणात आढळले आहे.

उरुग्वे

दक्षिण अमेरिकेत स्थित असलेला आणि ब्राझिलच्या शेजारी असणारा हा एक छोटासा देश आहे. या देशात सुंदर आणि स्वच्छ बीच, शांत वातावरण, प्राचीन स्मारक पर्यटकांसाठी लक्षवेधी ठरतात.

 

urugwey inmarathi

 

अमेरिकेतला हा देश देखील महिलांसाठी सुरक्षित समजला जातो. पर्यटक, ट्रेकर्स इथे एकटेही बिन्धास्त फिरू शकतात.

हे ही वाचा – प्रवास करण्याचा कंटाळा येतो? जाणून घ्या, प्रवास करण्याचे १३ फायदे – जे तुम्हाला जीवनात प्रचंड यशस्वी करू शकतात…

स्विझर्लंड

या देशाला पृथ्‍वीवरील स्‍वर्ग म्‍हटले जाते. स्विझर्लंड म्हटले की, डोळ्यासमोर येते प्रचंड हिरवळ आणि उंचच उंच शिखरे. स्विर्त्‍झलँडची सर्वात खास बाब म्‍हणजे जेवढी सौंदर्याची उधळण येथे निसर्गाने केली आहे, तेवढीच काळजी येथील सरकारही घेते. त्यामुळे अनेक सौंदर्यस्‍थळे आपण अगदी जवळून सुद्धा पाहू येतात.

 

alpine villages switzerland 1 InMarathi

 

स्विझर्लंडमध्ये अतिशय उंच हिमशिखरावर पर्यटकांसाठी सर्व सुखसुविधा करण्‍यात आल्‍या आहेत.हा देश देखील महिलांसाठी सुरक्षित देश आहे.

बेल्जियम

बेल्जियम हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. लक्षवेधी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आणि अनेक पर्यटनस्थळांसाठी हा देश ओळखला जातो.

 

belgium inmarathi

 

शिवाय मागील काही वर्षांपासून इथे दुसऱ्या देशातून येऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खुप वाढली आहे. हा देश देखील महिलांसाठी सुरक्षित आहे. मुख्यतः महिला विद्यार्थीनींना हा देश खुणावतोय.

ऑस्ट्रिया

महिलांच्या सहलींसाठी तर ऑस्ट्रिया हा देश चौथ्या स्थानावर आहे. शांत आणि चमकणारे पाणी असलेले तलाव, उंच शिखरे, हिरवीगार जंगले असलेला हा देश देखील महिलांना एकटे फिरण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

 

travel inmarathi

 

आइसलँड

नावाप्रमाणेच असणारा हा देश बर्फाने व्यापलेला आहे. या देशाच्या १५ टक्के भाग बर्फाचडीत आहे. ज्यांना बर्फ आणि बर्फातून फिरायला खूप आवडते त्यांच्यासाठी हा देश उत्तम पर्याय आहे.

 

iceland inmarathi

 

या देशात जगात सर्वात कमी महिलांवर अत्याचार होतात, म्हणूनच हा देश एक सुरक्षित देश आहे.

जपान

अतिशय जुन्या परंपरा आणि नवनवीन तंत्रज्ञान यांचा उत्तम सामील असणारा हा देश देखील महिलांच्या सहलीसाठी चांगला पर्याय आहे.

japan inmarathi

 

स्वच्छ आणि सुंदर मोठं मोठी शहरं असणारा हा देश जगातल्या शांत देशांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा – दीडशे वर्षांपूर्वी एकटीने अडीच लाख किमीचा जगाचा प्रवास करणाऱ्या महिलेची गोष्ट!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?