' आबालवृद्धांना सहज मोहात पाडणारी साहिर यांची ही ९ गाणी आजही अजरामर आहेत! – InMarathi

आबालवृद्धांना सहज मोहात पाडणारी साहिर यांची ही ९ गाणी आजही अजरामर आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मनुष्य किती जगतो यापेक्षा तो मिळालेले जीवन कसे जगतो याला जास्त महत्व आहे. तुम्ही या जगातून गेल्यानंतरही जर तुमचे नाव हे जग आठवणीने काढत असेल तरच तुम्ही नाव कमवले असे म्हणता येईल.

बॉलिवूडसारख्या उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये जर तुमचे नाव अनेक वर्षांनी निघत असेल तर ती व्यक्ती आणि तिचे काम किती मोठे असेल याचा अंदाज आपण लावू शकतो.

याच हिंदी चित्रपटांना एक से बढकर एक अविस्मरणीय गाण्यांनी साज चढवणाऱ्या गीतकार साहिर लुधियानवी यांची आज १०० वी जयंती.

 

sahir-ludhianvi-featured-inmarathi

 

साहिर यांनी अनेक दर्जेदार आणि अर्थपूर्ण गाणी हिंदी सिनेमांना दिली. शायर असणाऱ्या साहिर यांनी १९४९ साली आलेल्या ‘आजादी की राह पार’ सिनेमात पहिल्यांदा गाणी लिहिली.

===

हे ही वाचा सरकारी धोरणांवर सडकून टीका करणारा, बनला बॉलिवूडमधला ‘शब्दांचा जादूगार’!

===

मात्र त्यांना यात फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी १९५१ साली आलेल्या ‘नौजवान’ सिनेमात गाणी लिहिली आणि त्यांना या सिनेमाने, या सिनेमातील गाण्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही.

त्यांची अनेक गाणी आजही लोकांच्या तोंडावर रेंगाळतात. त्यांच्या हिंदी सिनेमातील भरीव योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने १९७१ साली ‘पद्मश्री’ पुरस्कारने सन्मानित केले.

शिवाय २०१३ साली त्यांच्या ९२ व्या जयंतीचे औचित्य साधत त्यांच्या नावाने एक टपाल तिकीटदेखील काढले गेले. आज साहिर लुधियानवी यांच्या जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या काही खास गाण्यांबद्दल.

 

ए मेरी जोहरजबी :

 

१९६५ साली आलेल्या यश चोप्रा यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘वक्त’ या सिनेमातील हे गाणे आजही सर्वांना लक्ख आठवते. सुनील दत्त , राज कुमार, साधना, बलराज साहनी, शशि कपूर, शर्मिला टैगोर यांच्या प्रमुख भूमिका असलेला वक्त हा सिनेमा त्याकाळी खूप गाजला.

मन्ना डे यांच्या जादुई आवाजातील हे गाणे साहिर यांनी लिहिले होते. या गाण्यातून त्यांनी अगदी सोप्या शब्दात, ‘सौंदर्य कधीच कायम राहत नाही, मात्र प्रेम चिरंतन टिकते’ हा संदेश दिला होता.

 

तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा :

 

 

१९५९ साली आलेल्या ‘धूल के फुल’ या सिनेमातील हे गाणे आज इतक्या वर्षांनी देखील चालू परिस्थितीला अगदी योग्य शब्दात दाखवते. धर्मापेक्षा जास्त एक उत्तम माणूस असणे कधीही महत्वाचे असे या गाण्यातून सांगितले आहे.

साहिर यांच्या सुंदर शब्दांना मोहम्मद रफी यांनी त्यांच्या सुरेल आवाजात अतिशय सुरेल गायले आहे.

 

आगे भी जाने ना तू :

 

 

१९६५ साली आलेल्या ‘वक्त’ सिनेमातील हे गाणे आजचे महत्व दर्शवते. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांपेक्षा अधिक वर्तमानकाळाला महत्व द्या असे त्यांनी या गाण्यातून सांगितले आहे. आशा भोंसले यांच्या आवाजातील हे गाणे आजही सर्वांच्या लक्षात आहे.

 

आजा तुझको पुकारे :

 

 

१९७० साली आलेल्या ‘गीत’ या सिनेमातील हे गाणे आजही अनेकांचे आवडीचे गाणे आहे. राजेंद्र कुमार, माला सिन्हा, सुजीत कुमार, मनमोहन कृष्ण यांच्या भूमिका असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन रामानंद सागर यांनी केले होते.

साहिर यांच्या खऱ्या प्रेमाची व्याख्या सांगणाऱ्या या सुंदर गाण्याला कल्याणजी-आनंदजी यांनी संगीत दिले असून, मोहम्मद रफी यांनी त्यांच्या सुरेल आवाजात गाण्याला स्वरबद्ध केले आहे.

===

हे ही वाचा ‘सम्पूर्ण सिंह कालरा’ ते ‘गुलज़ार’ वाचा या अवलियाचा प्रवास!

===

जीवन के सफर मैं राही :

 

 

१९५५ मुनीमजी या सिनेमातील हे गाणे विनोदी पद्धतीने आयुष्य आणि आयुष्याचे गणित सांगते. देव आनंद, नलिनी जयवंत, प्राण आदी कलाकारांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाला एस.डी.बर्मन यांचे संगीत लाभले असून याचे वैशिट्य म्हणजे किशोर कुमार यांच्या खट्याळ आवाजात हे गाणे रेकॉर्ड झाले आहे.

 

निले गगन के तले :

 

 

१९६७ साली आलेल्या हमराज या सिनेमातील हे गाणे आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. सुनील दत्त, राज कुमार, विमी, मुमताज़, बलराज साहनी यांची मुख्य भूमिका असलेला हा सस्पेन्स सिनेमा खूप हिट झाला, सोबतच हे गाणे सुद्धा तुफान गाजले.

या रोमँटिक गाण्याला महेंद्र कपूरयांच्या आवाजाने चार चाँद लागले आहेत.

 

सर जो तेरा चकराये :

 

 

१९५७ साली आलेल्या गुरुदत्त यांच्या ‘प्यासा’ सिनेमातील हे गाणे आजही अनेकदा आपण गुणगुणतो. रोमँटिक नसलेल्या या गाण्याला तुफान लोकप्रियता मिळाली.

एस.डी. बर्मन यांनी संगीत दिलेल्या या गाण्याला मोहंम्मद रफी यांनी स्वरबद्ध केले आहे.

 

मैं पल दो पल का शायर हूं :

 

 

१९७६ साली आलेल्या ‘कभी कभी’ सिनेमातील गाण्यांनी तर इतिहास रचला. या सिनेमातील सर्वच गाणी प्रचंड लोकप्रिय झाली.

यश चोप्रा यांच्या या सिनेमात अमिताभ बच्चन, शशि कपूर, राखी, ऋषि कपूर,वहीदा रहमान, नीतू सिंह यांची भूमिका असणाऱ्या या सिनेमाला खय्याम यांनी संगीत दिले होते. मुकेश यांनी या गाण्याला त्यांचा आवाज दिला आहे.

 

मैं जिंदगीका साथ निभता चला गया :

 

 

१९६१ साली आलेल्या ‘हम दोनो’ सिनेमातील हे गाणे आजही खूप लोकप्रिय आहे. या गाण्यातून साहिर यांनी आनंदी जीवनाचे रहस्य सांगितले आहे.

जयदेव यांच्या सांगितला मोहम्मद रफी यांच्या आवाजाने एक उंची प्राप्त करून दिली आहे. देव साब, साधना, नंदा यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा खूप गाजला.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?