' १ वर्षाच्या मुलाला जवळ घेऊन ‘कोरोना काळात’ ही झाशीची राणी लढतेय ट्रॅफिकचे युद्ध! – InMarathi

१ वर्षाच्या मुलाला जवळ घेऊन ‘कोरोना काळात’ ही झाशीची राणी लढतेय ट्रॅफिकचे युद्ध!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज जागतिक महिला दिन आपल्या आयुष्यातील सर्व महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. एक स्त्री तिच्या आयुष्यात अनेक भूमिका निभावत असते. या भूमिका निभावत असताना ती तिच्या जबाबदाऱ्या देखील योग्य पद्धतीने पार पाडत असते.

आजच्या या २१ व्या शतकात तर महिलांना पुरुषांच्या तोडीसतोड उभे राहून आपल्या पात्रतेचा नवा झेंडा मिरवला आहे. अगदी घर, विमान, रेल्वे चालवण्यापासून ते रिक्षा चालवण्यापर्यंत आदी सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत.

 

women empowerment inmarathi

 

आज आपण कितीही म्हटले, की स्त्री पुरुष एक समान आहेत, तरी एक गोष्ट अशी आहे जी फक्त आणि फक्त महिलाच करू शकतात. तिथे कधीच समानता होऊ शकत नाही. पुरुषांच्या तुलनेत असंख्य पटीने सहनशील असणाऱ्या या स्त्रीला देवाने दिलेले सर्वात मोठे वरदान म्हणजे मातृत्व. एक स्त्री तिच्या सारख्याच दुसऱ्या जीवाला जन्म देऊ शकते, हा स्त्रीला देवाने दिलेला एक आशीर्वादच आहे.

===

हे ही वाचा परदेशी पसार झालेल्या बलात्काऱ्याला पकडून आणलंय या धाडसी महिला IPS ऑफिसरने!

===

आपल्या शरीरातील सर्व हाडे मोडल्यावर जेवढा त्रास होईल त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने स्त्रीला वेदना होतात आणि या वेदनांमधून एक जीव जन्म घेतो. नऊ महिने रक्ताचे पाणी करून स्त्रिया आपल्यातल्या त्या छोट्या जीवाला स्वतः पेक्षाही जास्त सांभाळतात.

आपल्याकडे एक वाक्य हमखास म्हटले जाते, की आपल्या बाळावर कोणाचे कितीही प्रेम असले तरी या सर्वांमध्ये आईचे प्रेम नऊ महिने जास्तच असेल. एक आई तिच्या बाळासाठी संपूर्ण जगाशी लढू शकते इतकी ताकद तिच्यात आहे.

 

indian mother inmarathi

 

आजच्या काळात अनेकदा महिला कर्तव्य आणि ममता या दोन गोष्टींमध्ये अडकताना दिसतात. त्यातून कसा मार्ग काढावा हे कधी कधी त्यांना सुचत नाही.

मात्र याच दोन गोष्टींचा सुवर्णमध्य साधून आपल्या दोन्ही जबाबदाऱ्या उत्तम पद्धतीने संभाळणाऱ्या एका स्त्रीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एक कॉन्स्टेबल महिला तिच्या बाळाला कडेवर घेऊन ट्रॅफिक कंट्रोल करताना दिसत आहे.

चंढीगढ मधल्या या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचे नाव प्रियांका असून, ती भर उन्हात तिच्या एक वर्षाच्या बाळाला कडेवर घेऊन तिचे काम करत आहे.

 

chandigadh traffic constable inmarathi

 

हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहून त्यावर त्या महिलेच्या कामाप्रती असणाऱ्या निष्ठेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सामान्य लोकांसोबतच अनेक कलाकारांनी देखील हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत कामाप्रती असणाऱ्या समर्पणामुळे कॉन्स्टेबल प्रियांकाचे कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by India Today (@indiatoday)

===

हे ही वाचा चाळीशी गाठलेल्या, या दोन मुलांच्या आईने वेटलिफ्टिंगमध्ये, चक्क ४ सुवर्णपदक जिंकले आहेत!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?