' बिल गेट्स यांना काय आवडतं- ‘अँड्रॉइड की आयफोन?’ त्यांचं उत्तर वाचण्यासारखं आहे – InMarathi

बिल गेट्स यांना काय आवडतं- ‘अँड्रॉइड की आयफोन?’ त्यांचं उत्तर वाचण्यासारखं आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज जगभरात एकाच गोष्टीवरून दोन वेगवेगळे गट पडलेले आहेत. ती वस्तू म्हणजे आजच्या आपल्या सगळ्यांच्या गरजेची आहे ती म्हणजे मोबाइल. आणि त्यावरून जो अख्या विश्वात होणार वाद म्हणजे त्यातील वापरायची सिस्टिम.

 

mobile-in-hand-inmarathi

 

अँड्रॉइड * अॅपल :

आज उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपल्या वापरात येणारी वस्तू  म्हणजे मोबाइल फोन. सकाळी उठल्यावर हातात ब्रश न घेता आपण मोबाइल घेतो, इतकी सवय आपल्याला आता मोबाईलची झाली आहे. त्यातूनही या मोबाइलमध्ये वापरात येणारी अँड्रॉइड व अँपल  सिस्टिम. दोन्ही सिस्टिमच्या वापरण्यावरून सर्वत्र वाद होत असतात. वादाचे मूळ कारण म्हणजे  कोणती सिस्टिम जास्त चांगली आहे.

मुळात या दोन्ही सिस्टिमचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. अँड्रॉइड ही सिस्टिम वापरण्यास सोपी, सर्वांना समजेल अशी असते, तसेच सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो किंमतीचा आज अगदी ४ हजारांपासून अँड्रॉइड फोन बाजारात मिळतात.

 

aaple vs and inmarathi

 

हे ही वाचा – गुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट मधील कर्मचाऱ्यांचा “उठाव” देतोय टेक इंडस्ट्रीला वेगळं वळण

याउलट अँपल ह्या सिस्टिममध्ये सर्वात महत्वाचा भाग येतो तो म्हणजे सुरक्षा! आज cyber crime सारखे प्रकार वाढत आहेत, त्यामुळे आपला मोबाइलला सुरक्षित ठेवणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. अँपल फोनमध्ये आपल्याला अनेक वेगळे फीचर्स पाहायला मिळतात.

अँपल सिस्टिमच्या यंत्रणेत काम करणारे घटक हे अँड्रॉइडच्या तुलनेत उच्च दर्जाचे वापरलेले असतात म्हणूनच अँपलची किंमत सुद्धा महाग असते.

बिल गेट्स :

आज आपल्याकडे एखादा सेलिब्रिटी कोणत्या कंपनीची वस्तू वापरतो यावरून सुद्धा आपण पण ती वस्तू वापरली पाहिजे असे म्हणणारा सुद्धा एक गट आपल्याकडे आहे.

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी नुकत्याच दिलेला एका मुलाखतीत असे सांगितले, की ते अँड्रॉइड ही सिस्टिम वापरण्यास पसंत करतात.

 

bill inmarathi

 

हे ही वाचा – चायनीज “नसलेला” फोन हवाय? ही आहे बेस्ट नॉन-चायनीज स्मार्टफोन्सची यादी…

नक्की काय म्हणाले?

पत्रकार अँड्रू रॉस सरकीन यांनी clubhouse chat या अँपवर बिल गेट्स यांची मुलाखत घेतली. ज्यात त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. त्यातच त्यांनी आपण अँड्रॉइड सिस्टिमला प्राधान्य देत असतो, ते पुढे असे म्हणाले की मी प्रत्यक्षात अँड्रॉइड फोनच वापरतो, जरी मी अँपल वर खेळत असलो तरीसुद्धा आजूबाजूला एक तरी अँड्रॉइड चे उपकरण असतेच.

अँड्रॉइड फोन का वापरतो या वर ही त्यांनी उत्तर दिले की ‘अँड्रॉइडमध्ये अनेक गोष्टींचा track ठेवता येतो. तसेच अँडॉईड सिस्टिम वापरण्यास सोपी व सहज असल्याने त्यावर माझी सर्व कामे होतात’, असे ही त्यांनी आवर्जून सांगितले.

एकीकडे जरी अँड्रॉइडचे कौतुक करत असले तरी ते अँपल सुद्धा वापरतात हे सांगायला विसरले नाहीत. तसेच त्यांनी मायक्रोसॉफ्ट ही सिस्टिम फेल गेल्याचे दुःख ही त्यांना आहे. त्यांची ही सर्वात मोठी चूक झाली आहे हे  ते मान्यदेखील करतात.

 

club inmarathi

 

काही दिवसांपूर्वी एलोन मस्क यांनी सुद्धा जेव्हा whatsapp च्या  सुरक्षेच्या कारणांवरून सिग्नल हे नवीन अॅप्लिकेशन वापरा असा एक छुपा सल्ला दिला होता, त्या सल्ल्यावरून अनेकजणांनी लगेच सिग्नल डाउनलोड केले होते. व्हाट्सअॅपला कळून चुकले, की आपण आपले ग्राहक घालवत आहोत त्यावरून त्यांनी आपली ती अट मागे घेतली.

 

musk inmarathi

 

व्हाट्सअॅप पुन्हा तीच अट आणत आहे अशा बातम्या येताना दिसून येत आहेत.

अमेरिकेसारख्या देशात आज अनेकांच्या हातात अॅपलचे फोन व त्याचीच उपकरणे सर्रास वापरताना दिसून येतात, त्यातच बलाढ्य मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स यांनी अँड्रॉइडला पसंती दर्शवल्याने पुन्हा एकदा अँड्रॉइड विरुद्ध अॅपल असा वाद पुन्हा सुरु होईल अशी शक्यता आहे.

आजकाल मार्केटिंग ब्रॅण्डिंग या संकल्पनांचे नवनवीन फंडे अनेकजण वापरताना दिसून येतात त्यातलीच ही एक खेळी आहे का अशी सुद्धा शंका निर्माण होते किंवा ते त्याचे वैक्तीतक मत सुद्धा शकते.

आपला ग्राहक कोण आहे हे प्रत्येक कंपनीला माहित असते. त्यांच्या गरजा ओळखूनच ते नवनवीन वस्तू बाजारात आणत असतातच.

कट्टर आयफोनवादी असो किंवा अँड्रॉइडवादी. किती महाग असला तरी आयफोन घेणारे ग्राहक आहेतच. आपले बजेट बघून घेणारे अँडॉईड वाले सुद्धा आहेतच.

जगाच्या पाठीवर आज सीमावाद, वंशवाद, वैचारिक वाद आहेतच त्यातच अँडॉईड विरुद्ध अँपल या वादाची पुन्हा एकदा भर पडेल. 

===

हे ही वाचा – मायक्रोसॉफ्टच्या बिल्डींग नंबर ८७ मधील भयानक शांतता भल्याभल्यांची झोप उडवेल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?