' जेव्हा अनुपम खेर बच्चनजींना AC रिपेअर करण्यास सांगतात...

जेव्हा अनुपम खेर बच्चनजींना AC रिपेअर करण्यास सांगतात…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज बॉलीवूडमध्ये अनेक दिग्गज नटांनी आपल्या कामामुळे आपली ओळख निर्माण केली आहे. एकीकडे घराणेशाही तर दुसरीकडे आऊट साइडर्स ने बॉलीवूड मध्ये येऊन आपल्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावले.

बॉलीवूड ही अशी दुनिया आहे जिथे तुम्ही रातोरात स्टार होता, तितक्याच एका चुकीमुळे या दुनियेच्या बाहेर सुद्धा जाऊ शकता. त्यामुळे इथे आपले अस्तित्व टिकवून ठेवणे आव्हानात्मक असते.

 

bollywood inmarathi

हे ही वाचा –मराठी रंगभूमीवरील ८ अजरामर नाटकं, ५ व्या आणि ८ व्या नाटकाने रचलाय इतिहास!

जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा सिनेमासृष्टी मध्ये अगदी नंतरसुद्धा कपूर, खन्ना मंडळी बॉलीवूड मध्ये येऊन स्थिरावली. स्टार्समध्ये साहजिकच चढाओढ सुरु झाली तेव्हा त्यांना टक्कर देण्यासाठी अनेक ‘ऍक्टर्स’ सुद्धा होते. अगदी प्राण साहेबांपासून ते अमरीश पुरी साहेबांपर्यंत.

साठच्या दशकात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) ही संस्था उदयास आली. ज्या संस्थने आजवर अनेक दिग्गज लोकांना घडवले. ओम पुरी, नसरुद्दीन शहा ते दिवंगत इरफान खान सारखी मंडळी.

 

 

बॉलीवूड मध्ये सहजासहजी कोणालाच काम मिळत नाही, मग तो अगदी  NSD, FTI सारख्या  संस्थेतून जरी आल्यास, काम  मिळेल अशी शाश्वती नाही. अगदीच कोणी ओळखीचे असेल तर मिळू शकते अन्यथा struggle कोणालाच चुकले नाही.

असाच एक हिमाचल मधला मुलगा NSD मधून पास आऊट होऊन मुंबईत येतो, खेरवाडीसारख्या एरिया मध्ये एका खोलीत ७,८ लोकांसोबत राहून स्टार बनतो, तो अभिनेता म्हणजे अनुपम खेर.

सारांश मधला हताश, करारी असा बाप, i love you shreedevi असे म्हणणारा एक खडूस तितकाच विनोदी आर्मी ऑफिसर, कहो ना प्यार है मधला व्हिलन, अनुपम खेर यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाचे दर्शन आपल्या सर्वानांच घडवले आहे.

 

anupam 1 inmarathi

हे ही वाचा – तुमच्या आवडत्या बॉलीवूड स्टार्सची आवडती हॉलिडे डेस्टिनेशन्स तुम्हाला माहित आहेत का?

सारांश चित्रपट हा त्यांचा पहिला सिनेमा. तो मिळण्यासाठी सुद्धा त्यांनी अतोनात मेहनत घेतली. सिनेमा मिळण्यासाठीचा struggle ही खूप मोठा आहे. सारांश हिट ठरला, अनुपमजींच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले, कारकिर्दीतला पहिलाच चित्रपट हिट झाल्याने त्यांना प्रसिद्धी तर मिळालीच.

खेरवाडीत एका खोलीत राहणार हा मुलगा थेट आलिशान घरात जाऊन राहायला लागला, लोक त्याच्यासोबत फोटो काढून घेत होते, हाताशी स्वतःची गाडी सुद्धा आली अजून काय हवय? एका रात्रीत दुनिया बदलली त्यामुळे साहजिकच या गोष्टींची हवा त्यांच्या डोक्यात गेली.

झालं असं की त्यांच्या करियरची गाडी नुकतीच धावू लागली होती. त्यातच त्यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली होती. तो चित्रपट म्हणजे आखरी रास्ता. चित्रपटाचे शूटिंग चेन्नई येथे होणार होते.

 

aakhari inmarathi

 

अनुपम खेर चेन्नई येथे शूटिंगच्या ठिकाणी पोहचले, चेन्नई मुळातच प्रचंड तापमानाचे शहर, त्यात अनुपम खेर यांच्या मेकअप रूममध्ये AC चालू नव्हता, बाहेर प्रचंड गरमी त्यात AC चालत नसेल तर चिडचिड होणारच, त्यात नुकताच दिलेल्या हिट चित्रपटाने त्यांनी star tantrum दाखवण्यास सुरवात केली.

अनुपम खेर यांनी शेवटी संतापून production manger ला बोलावून घेतलले  व त्याला चांगलाच दम भरला. manger ने सुद्धा त्यांना सुनावले, की ‘तुमचा सीन ९ चा होता, तुम्ही १० ला आलात!! तसेच पहिला सीन बच्चनजींबरोबर आहे , ते ९ वाजताच आले आहेत’ .

अनुपम खेर थोडे गडबडले तरी सुद्धा त्यांनी AC दुरुस्त करण्यास सांगितले व तिथून निघाले, शूटिंगच्या ठिकाणी पोहचले व अमिताभ बच्चन यांना बघूनच थक्क झाले. आखरी रास्ता ज्यांनी बघितला असेल त्यांना माहिती असेल त्यात अमितजींचा एक लुक आहे ज्यात त्यांनी मोठी दाढी ठेवली आहे व अंगावर शाल घेतली आहे.

अमिताभ बच्चन आपल्या गेटअप मध्येच  पुस्तक वाचत बसले होते. इतका मोठा स्टार जेव्हा एवढ्या गरम वातावरणात अशा गेटअप मध्ये शांतपणाने पुस्तक वाचत बसलेला दिसल्यावर अनुपमजींची बोबडीच वळली. त्यांच्या जवळ गेल्यावर अनुपजी फक्त एवढेच म्हणाले,

गुड मॉर्निंग सर AC काम नही कर रहा, साहजिक आहे इतक्या मोठ्या अभिनेत्याला बघितल्यावर सगळ्यांचे असेच होणार,अनुपमजींनी शेवटी कुतुहलानेच त्यांना विचारले तुम्हाला गरम होत नाही का? त्यावर बच्चनजींनी नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत एक डायलॉग फेकला ‘ गरम होण्याविषयी आपण विचार करत बसलो तर गरम होणारच’ ,नाही केला तर नाही होणार!!!

 

ami aakhari inmarathi.

हा डायलॉग अनुपम खेर यांनी आयुष्यभर लक्षात ठेवला, या किस्स्याची माहिती  खुद्द अनुपम खेर यानींच एका मुलाखतीत दिली आहे.

अनुपम खेर यांनी आजवर अनेक भूमिका केल्या, जवळजवळ चारशेच्या वर चित्रपटांमध्ये काम सुद्धा केले. वेगवेगळ्या पठडीतल्या भूमिका उत्तमरीत्या केल्या आहेत . आज त्यांनी actor prepare या नावाने अभिनयाची शाळा सुद्धा सुरु केली आहे जिथे अभिनयाचे शिक्षण दिले जाते.

अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी  वेळोवेळी आपल्या वैचारिक भूमिकासुद्धा स्पष्टपणे  मांडल्या आहेत.

 

anupam 3 inmarathi

 

आज अनेक नवनवीन अभिनेते येत असतात, लवकर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे हुरळून जातात व कधी पडद्याआड निघून जातात त्यांचे त्यांनाच कळत नाही. अनुपम खेर यांनीसुद्धा तेव्हा धडा घेतल्याने आज जवळजवळ चार दशके ते उत्तम काम करत आहेत. याला ग्लॅमर म्हणू शकतो.

शेवटी तुम्ही काय अभिनय करता, भूमिकेसाठी किती मेहनत घेता हे महत्वाचे असते. आजूबाजूच्या परिस्थतीचा, वातावरणाचा  तुमच्या अभिनयाशी काहीही संबंध नसतो.

===

हे ही वाचा – प्रसिद्धीच्या झोतात वावरणाऱ्या ह्या बॉलीवूड स्टार्सनी कसलंही मानधन न घेता केलेत हे सिनेमे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?