' डान्सबार मध्ये ९० लाख खर्च, २०० कोटी दंड: कुख्यात स्कॅमस्टरची पडद्यामागील गोष्ट! – InMarathi

डान्सबार मध्ये ९० लाख खर्च, २०० कोटी दंड: कुख्यात स्कॅमस्टरची पडद्यामागील गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“रिस्क है तो इश्क है” हा डायलॉग म्हणणारा स्कॅम १९९२ मधला हर्षद मेहता अजूनही सगळ्यांना आठवत असेल. “मै सिगरेट नहीं पिता लेकिन जेब में लायटर हमेशा रखता हूं, धमाका करने के लिए!” असं म्हणत त्याने ओटीटी क्षेत्रात केलेला धमाका आजही सगळ्यांच्या आठवणीत आहे!

 दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या स्कॅम १९९२ या सिरिजने वेबविश्वातले सगळे रेकॉर्ड तोडले, बहुतेक सगळे अवॉर्ड याच शोला मिळाले. हर्षद मेहताचं पात्र साकारणाऱ्या गुजराती थेटर अॅक्टर प्रतीक गांधी रातोरात स्टार झाला!

 

scam 1992 2 inamarathi

 

स्टॉक मार्केटमधल्या एका ब्रोकर ने केलेला आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आपल्यासमोर ज्याप्रकारे सादर केला गेला त्यामुळेच लोकांना ही सिरिज पसंत पडली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा शेअर मार्केटचा “बच्चन” की लुटारू ब्रोकर? भारतात सर्वाधिक गाजलेल्या स्कॅमची कहाणी

===

शेयर मार्केटमधलं काहीही ज्ञान नसतानासुद्धा प्रत्येकाला खिळवून ठेवणाऱ्या या सिरिजचे मेकर हंसल मेहता आणखीन एक धमाका करायला तयार आहेत!

नुकतंच त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून एक मोठी घोषणा केली आहे. स्कॅम १९९२ च्या यशानंतर ते आता ‘स्कॅम २००३: क्युरियस केस ऑफ अब्दुल करीम तेलगि’ ही सिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत!

नावावरून तुम्हाला समजलं असेल की २००३ च्या तेलगि स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर ही सिरीज बेतलेली असेल. स्कॅम १९९२ मध्ये ज्या बारकाईने प्रत्येक गोष्ट हंसल यांनी उलगडून सांगितली तशीच अपेक्षा या नवीन सिरिजकडूनसुद्धा आहे!

 

scam 2003 inmarathi

 

अजूनतरी या सिरिज मध्ये कोण कोण दिसणार आहेत याची माहिती मिळालेली नाही, पण स्कॅम १९९२ च्या गुडविलवर या सिरिजलासुद्धा चांगलाच प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे!

पण हा तेलगि स्कॅम नेमका काय होता? कशा संदर्भात होता? यामागचा सूत्रधार कोण होता? याविषयी आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत!

कर्नाटकमधल्या खानापूर या गावात जन्मलेला अब्दुल करीम तेलगि हा या स्कॅमचा मास्टरमाइंड! वडील रेल्वेमध्ये नोकरीला होते आणि त्यांचे लवकर निधन झाल्याने अब्दुलने कसंबसं भाज्या फळं विकून आईला मदत करून शिक्षण घेतलं आणि त्यानंतर तो सौदीला कामासाठी गेला!

७ वर्षांनी जेंव्हा तो परत आला तेंव्हा बनावटीच्या (Counterfeit) च्या धंद्यात त्याने आपलं बस्तान मांडल. सुरुवातीला त्याचा फोकस हा बनावटी पासपोर्ट काढून देण्यावर होता!

===

हे ही वाचा भारतीय उद्योग विश्वातील “चांडाळ चौकडी”ची विस्फोटक माहिती प्रत्येक भारतीयाने वाचायलाच हवी

===

मुंबईत त्याचा ट्रॅव्हल एजन्सीचासुद्धा उद्योग होता त्याच्याआड तो अनेक अवैध धंदे करत असे, नकली कागदपत्रांची पूर्तता करणे, त्या कागदपत्रांच्या आधारावर सौदीमध्ये कामगारांना काम मिळवून देणे असे बरेच उद्योग तो करत होता!

 

abdul telgi inmarathi

 

१९९१ साली सर्वप्रथम अब्दुल करीमला अटक करण्यात आली! जेलमध्ये त्याची भेट रतन सोनी या माणसाशी झाली. रतन सोनी हा सुद्धा अशा अवैध कामांसाठी कुप्रसिद्ध होता!

त्याने तेलगिला सांगितले की स्टॅम्प पेपर ऑफिस हे सरकारच्या लेखी एक दुर्लक्षित डिपार्टमेंट आहे. हे ऐकताच तुरुंगातून बाहेर आल्यावर १९९४ मध्ये तेलगिने आपल्याकडच्या पोलिटिकल कनेक्शनच्या सहाय्याने स्टॅम्प पेपर लायसन्स काढून घेतले,  आणि एक मशीनरीसुद्धा विकत घेतली!

आणि या पद्धतीने त्याने बनावट स्टॅम्प पेपर बनवायला सुरुवात केली. हेच स्टॅम्प पेपर त्याने ३५० लोकांच्या सहाय्याने कित्येक मोठमोठ्या बँका, विमा कंपन्या, स्टॉक ब्रोकर फर्म यांना विकले! जवळ जवळ कित्येक करोडो रुपयांचा घोळ अखेरीस उघडकीस आलाच!

 

fake stamp paper inmarathi

 

जून २००७ मध्ये तेलगि आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांवर खटला दाखल करून ३० वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली गेली, याबरोबरच तब्बल २०० करोडचा फाईनसुद्धा तेलगिकडून वसूल केला गेला, त्याची प्रॉपर्टी आणि इतर गोष्टी सरकारने सील करून त्यातूनही बराचशी नुकसान भरपाई करून घेतली!

मुंबईच्या ग्रँट रोडवरच्या एका डान्सबारमधल्या डान्सरवर तेलगिने एका रात्रीत ९० लाख उधळले असं बाहेर बोललं जायचं, यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की या स्कॅममधून त्याने कीती कोटीचा चुना देशाला लावला!

१३ वर्ष तरुंगवास भोगल्यानंतर २३ ऑक्टोबर २०१७ रोजी बेंगलूर इथल्या एका हॉस्पिटलमध्ये त्याचं निधन झालं!

 

telgi 2 inmarathi

 

हर्षद मेहताप्रमाणेच सिस्टिमचा गैरवापर करणाऱ्या, सरकारला करोडो रुपयांना गंडवणाऱ्या तेलगिवर येणाऱ्या सिरिजमध्ये या स्कॅमविषयी आणखीन कीती डिटेलमध्ये माहिती मिळतीये हे तर सिरिज रिलीज झाल्यावरच कळेल!

===

हे ही वाचा शिक्षण क्षेत्रातल्या मोठ्या घोटाळ्यामागचं सत्य उघडकीस आणणारा हा सिनेमा चुकवू नका!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?