' सातत्याने गर्भनिरोधक गोळ्या घेणे कितपत योग्य? समजून घ्या साईड इफेक्ट्स

सातत्याने गर्भनिरोधक गोळ्या घेणे कितपत योग्य? समजून घ्या साईड इफेक्ट्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

बाल्य, तारुण्य आणि वृद्धावस्था ही जशी माणसाच्या आयुष्याची वहिवाट आहे त्याचप्रमाणे शिक्षण, विवाह आणि वानप्रस्थ हे पण टप्पे आहेत.

विवाह झाला की चार सहा महिने किंवा वर्षभराने मोठी माणसं, मित्र मैत्रिणी आडून आडून, तर कधी स्पष्टपणे आता गुड न्यूज द्या ..कधी देता गोड बातमी.. वेळच्या वेळी पटकन् एखादं मूल होऊ द्या वगैरे वगैरे सुचवतात. पण कधी कधी एखाद्या जोडप्याला मूल होऊ देण्यासाठी काही अडचणी असतात.

कधी घर नसतं..कधी पुरेसा पैसा वेळ नसतो. कधी कधी लगेचच मुलाची जबाबदारी घेण्यापूर्वी एंजॉय करायचे आहे म्हणून मूल नको असतं. त्यासाठी गर्भधारणा होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. त्यासाठी बरेच उपाय आहेत.

जसं शारीरिक संबंध ठेवताना निरोध वापरणं, गर्भनिरोधक गोळ्या घेणं, किंवा ओव्हूलेशनचा काळ टाळून शरीर संबंध ठेवणं. काॅपर टी बसवणं, आॅपरेशन करणं. यापैकी काॅपर टी एक मूल झालं की मग बसवली जाते. तर आॅपरेशन करणं हा कायमचं गर्भनिरोधक उपाय आहे. परंतू लग्नानंतर काही काळ मूल नको असेल तर तात्पुरती उपाययोजना म्हणजे निरोध, आणि गर्भनिरोधक गोळ्या.

 

ranveer inmarathi

हे ही वाचा – कंडोमचा शोध लागला नव्हता तेव्हा गर्भधारणा रोखण्यासाठी वापरल्या गेल्यात या विचित्र पद्धती !

कधी कधी निरोध वापरताना जोडीदाराला त्याची अॅलर्जी होणं, गडबडीत विसरलं जाणं, नावड या शक्यता असतात. म्हणजे गर्भधारणेची शक्यता वाढते. सेफ्टी पिरीयड पाळताना कधी कधी दिवस मोजायला चुकू शकतात..किंवा ओव्हूलेशनचा काळ मागे पुढे झाला तरी गर्भधारणा होऊ शकते म्हणून तोही मार्ग सुरक्षित नसतो.

याशिवाय अशीही एक पर्याय म्हणून गोळी मिळते जी समागमाच्या वेळी स्त्रीने योनिमार्गात ठेवली की शारिरीक संबंध घडताना त्या गोळीचा विरघळून फेस होतो व शुक्रजंतू आत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे गर्भधारणेच्या शक्यता कमी होतात. पण त्यातही अडचण की ऐनवेळी जर गोळीचा वापर करायचं लक्षात नाही आलं तर पुन्हा नको असलेली गर्भधारणा होऊ शकते. म्हणून सर्वसाधारणपणे सोपा उपाय म्हणून स्त्रीया गर्भनिरोधक गोळ्या घेणं पसंत करतात.

 

piles inmarathi

 

वेगवेगळ्या जाहिरातींमधून या गर्भनिरोधक गोळ्या आपल्याला ठाऊक होतात. बहुतेक बऱ्याच स्त्रीयांचा कल त्या गोळ्या घेण्याकडं असतो. परंतू, त्यातील काही साईड इफेक्ट बघितले तर याबाबत परत एकदा विचार करा.. गर्भनिरोधक गोळ्या घ्याव्यात का?

काय असतात या गर्भनिरोधक गोळ्या?

गर्भनिरोधक गोळ्या या मासिक पाळी नंतर स्त्रीच्या शरीरात तयार होणारे बिजांड निरुपयोगी बनवतात. म्हणजे शुक्रजंतूंशी त्यांचा संयोग झाला तरीही गर्भधारणा होऊ शकत नाही.

या गोळ्या दोन प्रकारच्या असतात. एक गोळी प्रोजेस्टेराॅन आणि इस्ट्रोजेन या हार्मोन्सचं काँबिनेशन असतं. तर दुसऱ्या प्रकारात असणारी गोळी ही फक्त प्रोजेस्टीनयुक्त असते. दीर्घकाळ या गोळ्यांचे सेवन करत राहिल्यास काही दुष्परिणामही संभवतात. हे दुष्परिणाम गोष्टींची सवय होईपर्यंत दिसतात. पण नंतर कमी होतात. कधी कधी पुन्हा उद्भवतात. काय आहेत हे दुष्परिणाम?

१. रक्तस्त्राव-

दोन पाळीच्या दरम्यान मध्येच थोडासा रक्तस्त्राव होणे. हे अगदी सर्वसामान्य लक्षण आहे. कारण शरीर त्या हार्मोन्सच्या बदलाला सामोरे जात असते. आणि गर्भाशयाच्या आतील बाजूस असलेल्या अस्तराला याची सवय नसते म्हणून हा रक्तस्त्राव होतो. न चुकता ठरलेल्या वेळीच ती गोळी घेणं गरजेचं आहे. नंतर हा मधून मधून होणारा रक्तस्त्राव थांबतो.

 

 

bleeding inmarathi

 

२. मळमळ

काही जणींना गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे मळमळण्याचा त्रास होऊ शकतो. जेवण झाल्यावर किंवा झोपताना या गोळ्या घ्याव्यात म्हणजे हा त्रास होत नाही. दोन तीन महिन्यांत हा त्रास कमी होतो. पण जर तो तसाच सतत होत आहे असं निदर्शनास आलं तर डाॅक्टरांशी संपर्क साधावा.

 

nausea inmarathi

 

३. स्तन ओघळणे-

गोळ्या घेत राहील्याने काही स्त्रीयांना स्तन फारच ओघळल्याचा त्रास उद्भवू शकतो, स्तन दुखतात. कधी कधी स्तनांचा आकार वाढूही शकतो. हे त्रास जास्त प्रमाणात होत आहेत असं वाटलं तर आपल्या डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

breast tb inmarathi

 

४. डोकेदुखी-

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. गोळ्यांमधील इजेस्ट्राॅन, प्रोजेस्टेराॅन या लैंगिक संप्रेरकांमुळे ही समस्या निर्माण होऊ शकते.

 

head inmarathi

 

५. वजन वाढणे-

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे वजन वाढीची समस्या निर्माण होऊ शकते. पण काहीजणींना वजन घटण्याचीही समस्या निर्माण झाली आहे.

अजून ही गोष्ट सिद्ध झाली नाही की याचमुळे वजन वाढते पण यावर संशोधन चालू आहे.

 

weight gain inmarathi

 

६. मूड स्विंग-

ही एक वेगळीच समस्या.. गोळ्या घेतल्यामुळे होणारे हार्मोन्स मधील बदल हे मूड स्विंगचे कारण ठरतात. क्षणाक्षणाला बदलत जाणारे मूड हा फार त्रासदायक ठरणारा भाग आहे.

 

mood inmarathi

हे ही वाचा – आईच्या गर्भात असताना बाळ काय काय अनुभवते ? जाणून घ्या..

७. अनियमित मासिक पाळी-

गोळ्या व्यवस्थित न घेतल्यास ही समस्या निर्माण होऊ शकते. सहसा गर्भधारणेची शक्यता नसते पण जर पाळी चुकली असं वाटलं तर प्रेगन्सी टेस्ट करावी. गोळी नियमितपणे न घेतल्यास ही समस्या निर्माण होते.

त्याचबरोबरीने पुढील काही गोष्टी पाळी अनियमित होण्याची कारणे आहेत-

मानसिक ताण,आजारपण, प्रवास, हार्मोन्सच्या समस्या, थायरॉईड.

 

irregular mc inmarathi

 

८. कामवासना कमी होणे

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे काहीवेळा कामवासना कमी होण्याची तक्रार केली जाते. गोळ्यांमधील असलेल्या संप्रेरकांच्या डोसाने हार्मोन्सची पातळी कमी जास्त होऊन काही जणींची कामवासना कमी होते..तर काहीजणींची वाढल्याचीही उदाहरणे आहेत.

 

loss intrest inmarathi

 

९. कोरडेपणा-

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे कधी कधी योनिमार्गात कोरडेपणा येतो. शरीरसंबधाच्या दरम्यान त्याचा त्रास होतो. जर होणारा स्त्राव दुर्गंधी युक्त असेल तर मात्र डाॅक्टरांशी संपर्क साधावा हे उत्तम.

 

dry inmarathi

 

१०. दृष्टीदोष-

कधी कधी गोळ्या सतत घेत राहील्यास त्याचा परिणाम डोळ्यांवर होऊ शकतो. नजर कमजोर झाली तर काँटॅक्ट लेन्सेस वापरता येतात. पण ही समस्या खूप कमी प्रमाणात आली आहे.

 

 

eye inmarathi

 

याशिवाय या गर्भनिरोधक गोळ्या घेत राहील्याने कांही वेळा स्त्रीयांना रक्ताच्या गाठी जाण्याचा त्रास, हायपर टेन्शन, उच्च रक्तदाब या तक्रारी उद्भवू शकतात.

म्हणून या गोळ्या खालील व्यक्तींनी टाळाव्यात.

१. हायपर टेन्शन रुग्ण

२. ३५ वर्षांवरील स्त्रिया.

३. हृदयविकार असलेल्या स्त्रिया.

४. अर्धशिशी असलेल्या स्त्रिया.

५. स्तनाचा कर्करोग असलेल्या स्त्रिया.

सतत या गोळ्या घेत राहील्यास हृदयविकार, कर्करोग, या समस्या निर्माण होऊ शकतात.

थोडक्यात सांगायचं तर, गर्भनिरोधक गोळ्या सतत घेणं ही फार मोठी चूक ठरु शकते. त्या घेताना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घ्याव्यात. आपले आपण डाॅक्टर होऊन आपलं आरोग्य धोक्यात टाकू नका.

===

हे ही वाचा – स्त्रियांना “तिथे” स्पर्श कसा करणार, यावर उपाय म्हणजे हे यंत्र, एक रोचक कहाणी!


महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?