' व्हॅक्सिनमॅन मानल्या जाणाऱ्या आदर पुनावाला यांच्या पत्नीचं कर्तृत्व तुम्हाला ठाऊक नसेल!

व्हॅक्सिनमॅन मानल्या जाणाऱ्या आदर पुनावाला यांच्या पत्नीचं कर्तृत्व तुम्हाला ठाऊक नसेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतातसोबतच संपूर्ण जगात मागच्यावर्षी कोरोनाची एन्ट्री झाली आणि संपूर्ण जग थांबले.

कोरोना आल्यापासूनच या आजारावरील लसीवर शास्त्रज्ञांनी शोध सुरु केला. या लसीच्या शोध मोहिमेमध्ये भारताने यश मिळवले आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटची लस बाजारात दाखल झाली.

 

covid vaccine inmarathi

 

या लसीमुळे ‘सिरम’ आणि ‘आदर पुनावाला’ ही दोन्ही नाव मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत आली आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला पुनावाला यांच्या कुटुंबातील एका वेगळीच आणि महत्वाच्या सदस्यांबद्दल सांगणार आहोत.

नताशा पुनावाला या आदर पुनावाला यांची पत्नी. नताशा जरी जास्त लाइमलाईट्मधे नसल्या तरी त्या बऱ्याचदा अनेक मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात.

 

natasha inmarathi

 

नताशा यांनी दुसऱ्या टप्प्यात सुरु झालेल्या कोरोनाच्या लसीकरणामध्ये स्वतः लस घेतली आणि याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती देखील दिली.

नताशा या जरी आदर पूनावाला यांच्या पत्नी असल्या तरी, त्यांची वेगळी एक ओळख सुद्धा आहे. त्या स्वतः एक बिजनेसवूमन असून, विल्लो पुनावाला फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालक आहेत.

सोबतच त्या ब्रिटिश अशियनट्र्स्ट्स चिल्ड्रन्स प्रोटेक्शन फाउंड फॉर इंडियाच्या सुद्धा त्या कार्यकारी संचालक आहेत. या पदावर त्यांना प्रिन्स चार्ल्सने नियुक्त केले होते.

 

natasha 1 inmarathi

हे हे वाचा – जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला टोचली जाणारी लस तयार करण्याची जबाबदारी पेलणारा भारतीय!!

नताशा यांची एक वेगळी ओळख म्हणजे त्या एक प्रसिद्ध फॅशन आयकॉन आहेत. त्या अनेक मोठ्या मासिकांच्या मुखपृष्ठावर झळकल्या आहेत.

बॉलिवूडपासून अगदी हॉलिवूडपर्यंत अनेक मोठे कलाकार आणि ब्रिटिश रॉयल्टीसोबत त्यांचे जवळचे नाते आहे. त्यांनी एकदा त्यांच्या मुखातीमध्ये सांगितले की, प्रसिद्ध सिंगर केटी पैरी नताशा यांच्याकडून फॅशन टिप्स घेते.

नताशा हे ग्लॅमर दुनियेतले मोठे नाव आहे. शिवाय नताशा बॉलिवूडच्या प्रसिद्ध गर्ल गँगचा हिस्सा असून, त्या अनेकदा करीना कपूर, मलाईका अरोरा, करिष्मा कपूर आदींसोबत पार्टी करताना दिसतात. शिवाय त्या बॉलिवूडच्या अनेक मोठया कार्यक्रमांना आणि पार्ट्याना देखील हजेरी लावतात.

 

natasha bollywood inmarathi

 

नताशाचे बालपण पुण्यातच गेले. त्या लहान असतानाच तिच्या आईने दुसरे लग्न केले होते. त्यांचे सावत्र वडिल नटेश्वर यांनी त्यांच्यावर खूप प्रेम केले. त्या नेहमी सांगतात की मला तीन वडील आहेत. एक सख्खे वडील, सावत्र वडील आणि एक आत्याचा नवरा. नताशा यांनी पुण्यात शिक्षण घेऊन लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी संपादन केली.

विजय मल्ल्या यांच्या एका पार्टी दरम्यान त्यांची आणि आदर पुनावाला यांची पहिली भेट झाली. त्यानंतर काही काळाने त्यांनी लग्न केले.

 

poonawala family inmarathi

 

या जोडीला दोन मुलं असून, कोट्यवधींची संपत्ती त्यांच्या नावावर आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?