' महिलांनो उन्हात बाहेर जाताय? मग या गोष्टी पर्समध्ये ठेवाच!

महिलांनो उन्हात बाहेर जाताय? मग या गोष्टी पर्समध्ये ठेवाच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मार्च महिना नुकताच सुरु झाल्याने, ऊन्हाचे चटके आपल्याकडे जाणवू लागले आहेत. सकाळी गुलाबी थंडी, दुपारी उन्हाचे चटके असे काहीसे वातावरण सध्या आपण सगळेच अनुभवत आहोत.

मागच्या वर्षी तसे कोणी जास्त उन्हात फिरलेले नाहीतच, कारण मागचा अख्खा उन्हाळा आपण घरीच काढला, त्यामुळे उन्हाशी तसा फार संबंध आला नाही.

आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येत आहे. लोक घराबाहेर पडत आहेत, लॉकडाऊनचे संकट जरी असले तरी कामासाठी, उद्योगधंदयासाठी आज घराबाहेर पडावेच लागत आहे.

विशेतः महिला वर्गाला सुद्धा रोज प्रवास करावाच लागतो. त्यात हळूहळू उन्हाळा सुरु होत असल्याने त्यांनी आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी. 

 

summer inmarathi

 

जर तुम्ही कामानिमित्त अथवा फिरायला जरी जात असाल तर खालील वस्तू आपल्या पर्स मध्ये आवश्य ठेवा:

१. सनस्क्रिन :

उन्हात बाहेर पडायच्या १५ मिनिटे आधीच घरातून सनस्क्रीन लावून बाहेर पडा, तसेच सोबत पर्स मध्ये सुद्धा ठेवून द्या, दर दोन तीन तासांनी एकदा लावा.

तसेच सनस्क्रीन वापरताना ते चांगल्या दर्जाचे व आपल्या चेहऱ्याला योग्य असे निवडूनच घ्या.

सनस्क्रीन नियमित लावण्याचे फायदे आहेत जसे की, तुमचा चेहरा कायम फ्रेश दिसतो, तसेच चेहरा निरोगी राहतो.

 

sunsscreen inmarathi

 

२. सॅनिटायजर :

सॅनिटायजर आता आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. त्यामुळे  सॅनिटायजरची छोटी बाटली पर्समध्ये ठेवाच, अनेक ठिकाणी आपले हात लागू शकतात, त्यामुळे विषाणूंशी संपर्क होऊ शकतो,आणि सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपणच आपली काळजी घेतलेली बरी.

 

sanitizer inmarathi 1

हे ही वाचा – उन्हाळ्यात फळांचा रस पिताय ? मग या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत !

 

३. स्कार्फ :

उन्हापासून चेहऱ्याचे, डोक्याचे रक्षण करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे, तसेच आज कोरोनाची परिस्थिती असल्याने नाकाचे सुद्धा सरंक्षण होते.

 

summer inmarathi

 

४. सनग्लासेस 

उन्हात फिरताना अथवा गाडीने प्रवास करत असाल तर शक्यतो sunglasses वापराचं, त्यामुळे  तुमचे डोळे सूर्याच्या अतिनील किरणांनपासून  वाचतील.

 

indian-summer-too hot Inamrathi

 

५. वेट टिशू :

उन्हात बाहेर फिरताना अनेकदा धूळ, माती आपल्या चेहऱ्यावर उडते,धूलिकण चेहऱ्या वर चिकटून बसतात त्यामुळे चेहरा खराब होतो.

wet inmarathi

 

अशा वेळी वेटटिशू  वापरल्यास चेहरा स्वच्छ होतो व आपल्याला ताजेतवाने वाटते.

६. पाण्याची बाटली :

एखादी छोटी पाण्याची  बाटली कायम आपल्या पर्स मध्ये ठेवा. उन्हातान्हात फिरताना अनेकदा शरीरातील पाणी कमी होत असते, त्यामुळे आपल्यासोबत कायम पाणी ठेवा. उन्हात फिरल्याने अनेकदा डिहायड्रेशन होऊ शकते, म्हणूनच पाण्याची बाटली सोबत घ्यायला विसरू नका.

 

summer inmarathi

हे ही वाचा – उन्हाळ्यात माठातले पाणी पिण्याचे हे आहेत १० उत्तम फायदे!

७. एक छोटासा स्प्रे सोबत ठेवा :

अनेकदा उन्हात फिरताना घाम येत असतो. त्यामुळे साहजिकच शरीराला घामाचा वास येतो अशा वेळी एक छोटा स्प्रे तुम्ही वापरू शकता जेणेकरून शरीराला घामाचा वास येणार नाही.

 

alia 1 inmarathi

 

८. एखादे चॉकलेट :

अनेकांना उन्हात फिरल्याने चक्कर आल्यासारखे जाणवत असते, अशावेळी एखादे चॉकलेटे सोबत ठेवत चला. जेणेकरून चक्कर आल्यासारखे वाटल्यास, चॉकलेट खा म्हणजे तुम्हाला energy मिळेल.

 

ravalgaon chocolate inmarathi2

 

९. लिप बाम 

इतर सीजन प्रमाणे या सिझन मध्ये सुद्धा लीप बाम वापर फक्त लीप बाम वापरतं तो खास sun  protection वालाचं वापरा. जेणेकरून तुमचे ओठ उन्हामुळे कोरडे पडणार नाहीत.

 

lip balm inmarathi

 

आज महिला कामानिमित्त अनेक ठिकाणी प्रवास करत असतात त्यामुळे प्रवासात सुद्धा आपली काळजी घ्या जास्त करून केसांची काळजी घ्या. उन्हात बाहेर पडताना श्यकतो कमी मेकअप करूनच बाहेर पडा. उन्हात शक्यतो उघड्यावरचे अन्नपदार्थ,सरबते घेण्याचे टाळा.

===

हे ही वाचा – उन्हाळ्यात डोकं आणि शरीर थंड ठेवण्याकरता ह्या ७ ‘आयुर्वेदिक’ टिप्स फॉलो कराच!

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?