' रामायण, महाभारतापुर्वी इतिहासातील हे पहिलं महायुद्ध भारतभूमीवर लढलं गेलं होतं! – InMarathi

रामायण, महाभारतापुर्वी इतिहासातील हे पहिलं महायुद्ध भारतभूमीवर लढलं गेलं होतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतातील प्राचीन व अभिजात वाङमय कुठले? हा प्रश्न विचारला तर बहुतेक सगळे जण रामायण व महाभारताचे नाव घेतील. पण ह्या दोन महाकाव्यांसारखेच आणखी एक प्राचीन वाङमय आहे पण ते फारसे कोणाला माहित नाही. त्या प्राचीन कथेचे नाव आहे ‘दाशराज्ञ’ म्हणजेच दहा राजांचे युद्ध!

हे युद्ध महाभारत युद्धाच्या जवळजवळ अडीच हजार वर्षांपूर्वी लढले गेले. हे युद्ध रामायण-पूर्व काळात झाले म्हणजेच सत्य-युगात झाले असे म्हणतात.

 

dasarajna-marathipizza01

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – दुसरं महायुद्ध आणि पॉपाय कार्टूनचं आहे एक वेगळंच कनेक्शन; वाचा काय ते!

ह्या युद्धाबद्दल ऋग्वेदाच्या सातव्या मंडलातल्या ईशस्तोत्रामध्ये उल्लेख केलेला आढळतो. ह्या युद्धामध्ये भारतातील ऋग्वेदाच्या काळातील सर्व लोक सहभागी होते. भारताच्या आर्यावर्त क्षेत्रात आर्यांमध्ये हे युद्ध झाले.

असे म्हणतात की हे युद्ध परुष्णि नदीच्या किनारी लढले गेले. ही नदी म्हणजेच आजची पाकिस्तान मध्ये असलेली रावी नदी होय.

 

dasarajna-marathipizza02

 

ज्या ठिकाणी हे युद्ध लढले गेले तिथेच हडप्पा नगर वसले.

हे हडप्पा प्राचीन भारतातील त्या काळचे प्रगत शहर म्हणून ओळखले जात असे. हे युद्ध अतिशय महत्वाचे मानले जाते कारण ह्या युद्धामुळे आर्य व वेदांची इतर जगाला ओळख झाली.

हे युद्ध लढले गेले कारण काही राजे व त्यांच्या प्रजेला आर्यवर्ताबाहेर पडण्यास भाग पाडले गेले. त्यांना ज्या ठिकाणी जाऊन राज्य स्थापन करावे लागले तो भाग आज इराण, इजिप्त व इराक ह्या नावाने ओळखला जातो.

असे म्हणतात की पुरू व तृत्सू नामक आर्य समुदायाच्या लोकांमध्ये हे युद्ध झाले. ह्या दोन्हीचे हिंद-आर्याच्या भरत नामक आर्य समुदायाशी संबंध होते.

अर्थात काही आर्य दुसऱ्या समुदायातील आर्यांना ‘आर्य’ मानीत नव्हते. काही लोक असेही म्हणतात की शक्तिशाली अशा पुरू समुदायाने भारत आणि पर्शिया मधील इतर काही समुदायांशी युती केली आणि त्यांचे गुरु ऋषी विश्वामित्र ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भरत राजा सुदास ह्याच्याशी युद्ध केले.

हा सुदास राजा सुद्धा पुरू वंशातीलच होता. ह्या सुदास राजाने हे युद्ध जिंकले व ह्या सर्व समुदायाला पकडले. हा सुदास राजा दिवोदास ह्याचा पुत्र होता तर दिवोदास हा सृंजय ह्याचा पुत्र होता. सृंजयच्या पित्याचे नाव देवव्रत होते. ह्या युद्धामध्ये सुदास ह्याला वशिष्ठ ऋषींनी मार्गदर्शन केले.

 

dasarajna-marathipizza

हे ही वाचा – होय! या युद्धात एवढ्या कोटी माणसांचा बळी गेला होता. कोणतं युद्ध होतं ते?

ह्या सुदास विरुद्ध जे दहा राजे लढले त्यांचे नेतृत्व पुरू समुदायाच्या राजा संवरणने केले होते. ह्यात बाकी ज्या समुदायांनी भाग घेतला होता त्यांची नावे पख्त, अत्मीन, शिव, भत्मान, सिम्यु, विशानिन, पृथु, भृगु व परशु अशी आहेत.

ह्यातही काही विवाद आहेत. अनेक लोक ह्या राज्यांची नावे अलिना, अनु, भृगु, भलना, द्रुह्यु, मत्स्य, परशु, पुरू व पणी आहेत असेही मानतात.

ह्या युद्धात जो द्रुह्यु राजा पराजित झाला त्याचे नाव गंधार होते. त्याने नंतर भारताच्या वायव्य दिशेस जाऊन त्याचे राज्य स्थापन केले. ह्या राज्यास नंतर गांधार प्रदेश म्हणून नाव दिले.गांधारचाच अपभ्रंश पुढे कंधार असा झाला जे आज अफगाणिस्तान म्हणून ओळखले जाते.

राजा सुदास ह्याचे वडील राजा दिवोदास ह्याचे राज्य पंजाब प्रदेशात होते. तो एक प्रसिद्ध योद्धा म्हणून ओळखला जात असे. त्याने अनार्य (जो आर्य नाही तो) राजा संबर ह्याचाशी युद्ध करून त्यास संपवले.

सुदास ह्याच्या राज्याची राजधानी सरस्वती नदीच्या किनारी होती. ह्याने त्याच्या पूर्वजांकडून मिळालेल्या राज्याचा मोठा विस्तार केला. त्याला वेळोवेळी त्याचे गुरु ऋषी वशिष्ठ ह्यांनी मार्गदर्शन केले.

राज्याचा विस्तार करताना त्याने त्याच्या आजूबाजूच्या राज्यांवर अंकुश मिळवण्याचा प्रयत्न केला. सुदास राजाच्या अधीन राहणे नको असल्याने ह्या दहा राजांनी एकत्र येऊन युद्ध करून सुदास राजाला कायमचे पराजित करण्याचे ठरवले.

ह्या राज्यांना काही लोक आर्य समजतात पण ते खरे तर अध:पतन झालेले आर्य आहेत असे म्हणतात. कारण त्यांनी अध्यात्म सोडून भौतिक सुखाला प्रमाण मानले. ह्या राजांचा राजा सुदास ह्याने पाडाव केला.

 

dasarajna-marathipizza04

 

इतिहासात असे बऱ्याच वेळा घडले कि लोकांनी आध्यात्मिक मार्ग सोडून भौतिक सुखाची निवड केली अशा वेळी युद्ध होऊन तिथे परत आर्यांनी अध्यात्माचे महत्व प्रस्थापित केले.

तर हे दाशराज्ञ युद्ध परुष्णि नदीच्या किनारी झाले आणि भरत व पुरू ह्यांच्यात अनेक वर्षांपर्यंत चालले.

ऋग्वेदात लिहिल्याप्रमाणे सुदास व त्याच्या सैन्याला माघार घ्यावी लागली पण त्यांनी सुरक्षितपणे परुष्णि नदी ओलांडली पण त्याच्या शत्रूंचे नदीला आलेल्या पुरामुळे खूप नुकसान झाले आणि उरलेल्या सैन्याला सुदास राजाच्या सैन्याने ठार मारले.

त्यानंतर त्याने अज, यक्ष व शिग्रू ह्यांच्याशी यमुना नदीजवळ युद्ध केले आणि त्यांनाही पराजित केले. राजा सुदास ने त्याच्या सर्व शत्रूंचा पाडाव केला.  दहा राजांचाही पूर्ण पराभव केला व तो अजिंक्य राहिला.पण ह्या सगळ्यात हजारो लोक ठार झाले.

हे युद्ध नेमके कधी झाले ह्याबद्दल अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत.

काही लोक म्हणतात की इ.स.पूर्वी ३००० ते ४००० मध्ये हे युद्ध झाले तर काही लोकांचे असे मत आहे की इसवी सन पूर्व २३५० मध्ये हे युद्ध झाले.

पण विशेष गोष्ट ही की, हे इतिहासातील “पहिले नोंद झालेले महायुद्ध” समजले जाते.

ह्या महायुद्धात घोडदळ, पायदळ व तिरंदाज, हत्ती ह्या सर्वांचा वापर करण्यात आला. ह्या युद्धानंतर पराभूत झालेले राजे भीतीने पश्चिमेला इराण व त्या पुढील जागेस गेले.

काही लोक ह्याला मूलनिवास्यांवर हल्ला व आर्यांचे आक्रमण असे मानतात पण हे चूक आहे. खरं तर हे युद्ध आर्य लोकांचे दुसऱ्या आर्य लोकांशी झाले व जो बलाढ्य होता तो जिंकला. त्याने भारतात परत आध्यात्मिक मार्गाचे महत्व लोकांपर्यंत पोचवले.

पुरू हे सरस्वती नदीच्या किनारी राहत असत. व भरत हे त्यांचेच वंशज आहेत.

dasarajna-marathipizza03

त्यांच्याच वंशातल्या म्हणजेच पुरू वंशातला राजा भरत (दुष्यंताचा मुलगा) ह्याच्यावरून आपल्या देशाला भारत असे नाव आहे. राजा सुदास हा भरत राजाचाच वंशज होता. पुरू –भरत वंशातील राजांनी भारतावर अनेक काळ राज्य केले.

हे अनेक ठिकाणी आणि ऋग्वेदामध्ये सुद्धा लिहिलेले आहे. असे म्हणतात पोरस राजाने अलेक्झांडर चा पराभव केला होता तो पुरू वंशातील राजा होता आणि त्याचे पूर्वज महाभारतातील पांडव होते.

तर अशी आहे दाशराज्ञ ची कथा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – प्राचीन भारतीयांनी या दहा जबरदस्त प्रभावी आणि आश्चर्यकारक युद्धनीती वापरल्या होत्या.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?