'गॉगल्स हे खास न्यायाधीशांसाठी तयार केले जात असत - एका अत्यंत गंभीर कारणासाठी!

गॉगल्स हे खास न्यायाधीशांसाठी तयार केले जात असत – एका अत्यंत गंभीर कारणासाठी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गॉगल ही एक अशी वस्तू आहे, जी उन्हापासून संरक्षक आहे आणि त्याचवेळी एक ‘स्टाईल स्टेटमेंट’ सुद्धा आहे. सोशल मीडियावर मध्यंतरी ‘गॉगल चॅलेंज’मध्ये किती तरी वेगवेगळ्या प्रकारच्या गॉगलचे फोटो आपण बघितले आहेतच.

ज्या शहरात ऊन जास्त असतं त्या शहरात गाडी चालवताना, पायी चालतांना उन्हापासून संरक्षण आणि त्याचसोबत ‘रुबाबदार’ दिसण्यासाठी गॉगल हा रोज सोबतच ठेवण्याच्या वस्तूंपैकी एक असतो.

गॉगल किती तरी पद्धतीने लावला आणि खिशात परत ठेवला जाऊ शकतो हे आपल्याला बॉलीवूड, टॉलीवूडच्या सिनेमांनी चांगलंच शिकवलं आहे. ऊन असो वा नसो, आपल्या सिनेमातील हिरो हे नेहमीच गॉगल सोबत घेऊनच फिरत असतात. गॉगल वापरण्याच्या लक्षात राहणाऱ्या पद्धती म्हणजे दबंग मधील सलमान खानची कॉलरला अडकवण्याची पद्धत, जी लोकांना आवडली होती.

 

salman khan dabang goggle inmarathi

 

गॉगल हाताळण्याची सर्वात वेगळी पद्धत आपण बघितली असेल तर ती रजनीकांत सरांची. ‘शिवाजी – द बॉस’ हा सिनेमा लोकांच्या लक्षात राहतो ते केवळ रजनी सरांच्या गॉगल अगदी सहजपणे डोळ्यांना लावण्यामुळे आणि त्या एक रुपयाच्या नाण्यामुळे.

‘शिवाजी – द बॉस’ बघितल्यावर कित्येक जणांचे गॉगल हे ‘त्या’ पद्धतीने हाताळण्याच्या नादात खाली पडून तुटले असतील हे नक्की. असो.

आपला विषय हा आहे की सर्वात पहिला गॉगल कोणी घातला असेल ?

‘गरज ही शोधाची जननी असते’ असं म्हणतात. १२ व्या शतकात १२६८ साली एका रोमन राजाला उन्हात बसून ‘ग्लॅडीएटर’चं युद्ध बघायचं होतं. त्याच्या डोळ्यांना थोड्या वेळाने त्रास होत होता. त्याने डोळ्यांना थंड वाटण्यासाठी एका काचेला हिरव्या रंगाचे पॉलीश करून आणून देण्यास सांगितलं. शिपायांनी तसं करून दिलं आणि रोमन राजाला तो सामना बघतांना आल्हाददायक वाटायला लागलं अशी एक नोंद आहे.

१३५२ मध्ये ‘टोमॅसो दा मॉडर्न’ या एका चित्रकाराने एका राजाचं चित्र तयार केलं होतं ज्यामध्ये तो राजा गॉगल घालून उभा होता, असं सुद्धा एका इतिहासकाराच्या अभ्यासात समोर आलं आहे. या चित्रात बघितलेल्या गॉगलमुळे लोकांमध्ये याबद्दल एक कुतूहल निर्माण झालं. कालांतराने गॉगलकडे एक श्रीमंतीचं, समृद्धीचं लक्षण म्हणून बघितलं जाऊ लागलं.

 

rajnikant inmarathi

 

१४३० मध्ये तयार करण्यात आलेल्या काही चित्रांमध्ये हे समोर आलं आहे, की गॉगल हे त्या काळात फक्त चीनमधल्या कोर्टाचे न्यायाधीश उन्हापासून बचाव करण्यासाठी वापरायचे.

कोणताही निर्णय जाहीर करतांना आरोपी व्यक्तीला किंवा जनतेला आपल्या डोळ्यातील भाव टिपता येऊ नयेत हा सुद्धा त्यामागचा उद्देश होता हे नंतर समोर आलं होतं.

वाढती मागणी लक्षात घेऊन हे काम इटलीमधील काही कारागीरांना दिलं जाऊ लागलं. ही पहिलीच वेळ असावी जेव्हा एखादी वस्तू बनवण्यासाठी चीनने इतर देशातील लोकांना काम दिलं. चीनमधून सुरू झालेली ही गॉगलची पद्धत इतर देशांमध्ये सुद्धा बघण्यात येत होती.

आपल्या डोळ्याच्या आकारानुसार, गरजेनुसार चष्मा, गॉगल तयार करून घेण्याचा प्रकार सुरू होण्यासाठी १६ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत वाट बघावी लागली होती. वयस्कर व्यक्तींना व्यवस्थित दिसण्यासाठी चष्मा तयार करून घेण्याची पद्धत तेव्हापासून सुरू झाली होती.

१६२९ मध्ये चष्मा तयार करणाऱ्या एका इंग्रजी कंपनीने ही टॅगलाईन ठेवली होती, की “चष्मा म्हणजे वृद्धांना दिलेला आशीर्वाद.” ही टॅगलाईन तेव्हा जगभरात प्रचंड लोकप्रिय झाली आणि ‘ऑप्टिकल्स’ हा एक नवीन सेवा सुरू झाली.

हे ही वाचा – गॉगलचा वापर कशासाठी करावा? कोणता वापरावा? वाचा गॉगलबद्दल बरंच काही…

१८ व्या शतकात ‘जेम्स एस्कोव्ह’ या ऑप्टिकल कंपनी सुरू करणाऱ्या व्यक्तीने निळ्या आणि हिरव्या रंगाचं मिश्रण करून एक गॉगल तयार केला, ज्यामुळे ‘डोळ्यात असलेल्या कमजोरी वर मात करता येईल’ अशी जाहिरात करण्यात आली होती. यानंतर लोकांनी गॉगलकडे एक उपयुक्त वस्तू म्हणून बघण्यास सुरुवात केली.

 

sunglasses inmarathi

 

गॉगलमध्ये सुधारणा या कित्येक वर्ष सुरूच होत्या. गॉगलच्या आकारावरून बरीच वर्ष विचारमंथन सुरू होतं. सध्या जसं ‘फेसशिल्ड’ आहे तसा गॉगल असावा किंवा फक्त नाकाच्या हाडावर आणि कानांवर ठेवता येईल अशी रचना असावी यावर एकमत होत नव्हतं.

नाकावर ठेवण्यात येणाऱ्या रचनेला जास्त लोकांनी पसंती दिली आणि वेगवेगळ्या रचनेची चष्म्याची ‘फ्रेम’ तयार करण्याची सुरुवात झाली. चष्म्याची फ्रेम ही चामडी, हाडाचे तुकडे आणि धातू यांचं मिश्रण करून तयार करण्यात येऊ लागली.

चष्मा कुठे ठेवावा ? हा एक प्रश्न तेव्हापासूनच लोकांना पडायचा. चष्म्याला दोरी बांधण्याची सुरुवात त्यामुळेच झाली.

काही वर्षात चष्म्याच्या फ्रेममध्ये ‘सिरॅमिक’ मिसळण्याची पद्धत सुरू करण्यात आली. जाड चष्म्याची पद्धत ही ‘एडवर्ड स्कार्लेट’ने १७३० पासून सुरुवात केली. चष्म्यात दोन लेन्स वापरण्याची सुरुवात ही १७८० मध्ये बेंजमीन फ्रँकलिन यांच्या शोधामुळे आमलात आणली जाऊ लागली.

२० व्या शतकात पोहोचेपर्यंत गॉगल म्हणजे केवळ सूर्यापासून संरक्षण, इतकाच फायदा लोकांसमोर ठेवण्यात आला. सगळीकडेच वाढत्या औद्योगिकरणाचा हा काळ होता. झाडंही कमी होत होती.

१९२९ मध्ये अमेरिकेतील न्यू जर्सी इथून सॅम फॉस्टर याने “समुद्रावर जातांना कडक उन्हापासून स्वतःच्या डोळ्यांचा बचाव करा, गॉगल वापरा” अशी जाहिरात केली आणि जगप्रसिद्ध ‘फॉस्टर’ या गॉगलच्या ब्रँडची सुरुवात झाली.

‘फॉस्टर ग्रॅंट्स’ या ब्रँडने बाजारात आणलेले हे गॉगल सर्वात जास्त प्रमाणात बनू लागले. काही दिवसांत ‘फॉस्टर ग्रँट्स’ सर्वाधिक गॉगल तयार करणारी कंपनी झाली. गॉगलला तुम्ही फॅशन म्हणून सुद्धा वापरू शकता हे या लोकांनी जगाला पटवून दिलं.

 

sonam kapoor sunglasses inmarathi

 

१९३० मध्ये हवाई आर्मीच्या जवानांना उंचीवर विमान चालवताना सुर्यकिरणांचा त्रास होऊ नये म्हणून गॉगल असावेत अशी मागणी करण्यात आली. बॉश अँड लॉम्ब या कंपनीला हे गॉगल तयार करण्याचं काम देण्यात आलं. बॉश अँड लॉम्ब या कंपनीने ही गरज लक्षात घेऊन गडद हिरव्या रंगाचे गॉगल तयार केले जे की पिवळसर उजेडातील प्रकाश शोषून घेतील.

१९३७ मध्ये हॉलीवूड चित्रपटांमध्ये गॉगलचा वाढता वापर दिसू लागला. ‘एव्हीएटर’ या प्रकारात तयार झालेले गॉगल वापरणे हे त्या काळातील सर्व हॉलीवूडचे स्टार्स पसंत करायचे.

त्याच वर्षी ‘रे बॅन’ या महाग गॉगलच्या ब्रँडचा जन्म झाला. सोनेरी रंगाच्या काड्या, काळ्या रंगाची काच आणि त्यावर पांढऱ्या रंगात एका विशिष्ठ लिपीत इंग्रजीत लिहिलेलं ‘रे बॅन’ लोकांना पाहता क्षणीच पसंत पडलं.

मोठी लेन्स असलेले, चमक नसलेले हे गॉगल सर्व वैमानिक वापरू लागले. सुरुवातीला अति उच्च किमतीत विकले जाणारे हे गॉगल मागणी वाढल्यानंतर सामान्य माणसाच्या आवाक्यात येऊ लागला.

१९७० मध्ये असा ट्रेंड आला, की ड्रेसच्या रंगाला गॉगलचा रंग मॅचिंग असावा. या दशकातील हॉलीवूड किंवा बॉलीवूड सिनेमा बघतांना हे लक्षात येईल. गॉगलवर आपल्या लाडक्या अभिनेता किंवा अभिनेत्रीचं नाव लिहिलेलं असावं हा सुद्धा ट्रेंड काही वर्षांसाठी आला होता.

२१ व्या शतकात तर ‘लेन्सकार्ट’सारख्या अप्लिकेशनमुळे घरबसल्या चष्मा ऑर्डर केला जाऊ शकतो. चष्म्याचा कोणता प्रकार तुमच्या चेहऱ्याला चांगला दिसेल हे आज लोक सोशल मीडियावर फोटो अपलोड करून मग आपला निर्णय घेतात. अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून सुरक्षा करणारे गॉगल हे सध्याची गरज आहे आणि ती सर्व गॉगल बनवणाऱ्या कंपन्यांनी योग्यरित्या हेरली आहे.

 

lenskart inmarathi

 

बदलत्या तंत्रज्ञानासोबत गॉगल तयार करण्याचे प्रकार सुद्धा बदलू लागले आहेत. Oakley’s या एका गॉगलच्या ब्रँडमध्ये आता सूर्यापासून संरक्षणासोबतच डिजिटल ऑडिओ प्लेअर सुद्धा उपलब्ध होणार आहे.

‘ग्लॅडीएटर’चा सामना बघताना रोमन राजाने हातात धरलेल्या हिरव्या रंगाच्या काचा ते आजचे हाय-टेक गॉगल या आपल्या प्रगतीचं आपण कौतुक केलं पाहिजे.

पुढच्या वेळी गॉगल लावल्यावर आरशात बघतांना गॉगलच्या या प्रवासातील काही बारकावे तुम्हाला आठवतील हे नक्की.

===

हे ही वाचा – सिक्युरिटी गार्ड्स नेहमी काळा गॉगल का परिधान करतात?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?