'जळगावच्या महिला वसतिगृहातला बीभत्स प्रकार: पोलिस डिपार्टमेंटची मान शरमेने खाली

जळगावच्या महिला वसतिगृहातला बीभत्स प्रकार: पोलिस डिपार्टमेंटची मान शरमेने खाली

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज संपूर्ण देशाची आणि खासकरून पोलिस डिपार्टमेंटची मान शरमेने खाली जाईल असं एक कृती उघडकीस आलं आहे. दृश्यम मधला एक डायलॉग आठवतोय का “पोलिसांना इतकं घाबरायचं का पाहिजे, ते आपल्यासाठी आहेत आपण त्यांच्यासाठी नाही!”

पण आज खाकीतल्या या पोलिसाची भीती वाटावी असा प्रकार लोकांसमोर आला आहे! या अशा काही लोकांमुळे लोकांचा पोलिस यंत्रणेवरचा विश्वास हळू हळू उडत चालला आहे!

 

police beating theif inmarathi

 

जळगाव इथल्या महिला वसतिगृहात काही पोलिस अधिकाऱ्यांनी आणि बाहेरून आलेल्या लोकांनी महिलांना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे!

हो हो कानावर विश्वास बसत नसला तरी हे सत्य आहे काही पोलिस अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून हा संतापजनक प्रकार घडण्याचं उघडकीस आलं आहे!

===

हे ही वाचा पांढरपेशा मनाला झटका देणारं, वासनांध दुनियेचं विकृत वास्तव!

===

काही सामाजिक संघटनांनी पुढकार घेऊन हे प्रकरण बाहेर आणलं आहे शिवाय या संदर्भात एक व्हिडिओ हा पुरावा म्हणूनसुद्धा सादर केला गेला आहे!

जळगावमधील या वसतिगृहात निराधार, अत्याचार झालेल्या किंवा पिडीत महिलांच्या राहण्याची खाण्याची सोय केली जाते. या वसतिगृहात काही विचित्र प्रकार घडत असल्याची कुणकुण आधीच लागलेली होती!

त्यांनंतर जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंपरी आणि त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी मंगळवारी त्या वसतिगृहाला भेट दिली तर त्यांना या बीभत्स प्रकाराची माहिती झाली!

१ मार्च सोमवारी आशादीप वसतिगृहातल्या काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने काही पोलिस अधिकारी आणि बाहेरील पुरुष चौकशीसाठी हॉस्टेलमध्ये शिरले आणि तिथल्या महिलांना कपडे काढून नृत्य करण्यास सांगितले!

 

ashadip inmaratbi

 

कोणत्याही समाजिक कार्यकर्त्याला आतमध्ये प्रवेश दिला जात होता, आत अत्यंत भयावह अशी अनैतिक कृत्य सुरू होती, ज्या महिला किंवा मुली ऐकत नाहीत त्यांना बेदम मारहाण करण्यात येत होती!

तिथल्या मुलींना हा सगळा प्रकार सांगायचा होता पण त्या संस्थेकडून त्यांना मज्जाव केला जात होता!

अखेर बुधवारी काही मुली आणि महिलांच्या धाडसामुळे हे कृत्य उघडकीस आलेच, आणि याबरोबरच आता संपूर्ण पोलिसखात्यावरच प्रश्न उभं राहणार आहे यात दुमत नाही!

आज देशात कित्येक रेप, खून होत आहेत, महिलांवरचे अत्याचार तर विचारुच नका. अशा परिस्थितीत सामान्य लोकांकडे दोनच पर्याय उपलब्ध असतात एक म्हणजे न्यायालय आणि पोलिस!

 

rape 3 inmarathi

 

पण त्यापैकी पोलिसांकडूनच हे असे निंदनीय कृत्य घडत असेल तर महिला या देशात सुरक्षित कशा राहणार? हा प्रश्न उभा राहणारच, खाकीच्याआड दडलेल्या या नराधमांना काठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच हवी!

===

हे ही वाचा – “मी हाथरसची पीडित कन्या बोलतीये… पण तुम्ही ऐकताय का…?”

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?