' जेव्हा खुद्द जेम्स बॉण्ड 'कॅडबरी इंडियावर' चोरीची केस ठोकतो...!

जेव्हा खुद्द जेम्स बॉण्ड ‘कॅडबरी इंडियावर’ चोरीची केस ठोकतो…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जाहिरात क्षेत्रात काम करणे हे सर्वात कठीण कामापैकी एक मानलं जातं. लोकांच्या सतत बदलणाऱ्या आवडीनिवडी, एखाद्या वस्तू किंवा सेवेची कमीत कमी सेकंदात माहिती आणि गुण सांगणे, नेहमीच ‘काही तरी वेगळं’ असावं ही निर्मात्यांची अपेक्षा, तीव्र स्पर्धा हे या क्षेत्रातील प्रमुख दृश्य आव्हानं मानली जातात.

“यावेळी बजेट कमी आहे, पण काम चांगलं झालं पाहिजे” या मागणीचा नेहमीच मान ठेवणे ही जाहिरात क्षेत्रातील लोकांना अडचणीत टाकणारी गोष्ट आहे.

काही वेळेस जाहिरात ही एखादा सण किंवा विशिष्ट दिवसाला डोळ्यासमोर ठेवून तयार केली जाते. तर काही जाहिराती या फक्त कंपनीचं नाव म्हणजेच ब्रँड तयार करण्यासाठी केल्या जातात.

अश्या वेळी जाहिरात तयार करणाऱ्या कंपनी या सध्या चर्चेत असलेल्या व्यक्तिरेखेचा आधार घेऊन आपल्या वस्तूबद्दल माहिती लोकांसमोर ठेवतात.

उदाहरण सांगायचं तर, ‘अमूल’च्या जाहिराती ज्यामध्ये नेहमीच सध्या चर्चेत असलेल्या विषयांवर भाष्य केलं जातं आणि लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

 

amul ads inmarathi

 

१९८० च्या दशकात मात्र ‘कॅडबरी इंडिया’ या चॉकलेटच्या ब्रँडने ‘जेम्स बॉण्ड’ हे पात्र आपल्या जाहिरातीत वापरून एकच गोंधळ उडवला होता.

===

हे ही वाचा आपल्या आवडत्या ‘कॅडबरी- डेअरी मिल्क’ विषयीच्या या खास गोष्टी वाचून तुम्ही थक्क व्हाल

===

भारताबाहेरील एखाद्या कंपनीने भारतीय जाहिरातींवर आक्षेप घेण्याची ती पहिलीच वेळ होती.

काय होतं हे प्रकरण?

कॅडबरी जेम्सच्या गोळ्या आपण सर्वांनाच कमी जास्त प्रमाणात आवडतात. वेगवेगळ्या रंगाचं आवरण असलेल्या या गोळ्या आणि आतल्या चॉकलेटने आपलं बालपण हे नेहमीच रंगीत केलं होतं.

जेम्सच्या एका जाहिरातीमधील नायक हा एक बाईक चालवत असतो. “माय नेम इज बॉण्ड, जेम्स बॉण्ड” हे वाक्य तो उच्चारतो, जेम्सची गोळी खातो आणि पुन्हा बाईक चालवायला लागतो.

थोड्या वेळात बाजूने एक लहान मुलांची बस जात असते ज्याला काही चोर अपहरण करायचा प्रयत्न करत असतात. जाहिरातीचा नायक हा जेम्स बॉण्डच्या स्टाईलमध्ये बसच्या समोरुन येतो आणि बाईक वरून अपहरण कर्त्यांवर जेम्सच्या गोळ्यांचा हल्ला करतो.

विविध रंगातील गोळ्या बसमध्ये जातात. त्यामुळे बसमधील मुलं खुश होतात आणि बसचालक हा गोळ्यांच्या हल्ल्यामुळे बस थांबवतो. जेम्स बॉण्डला बाईकच्या विडिओ कॉल वर आलेला ‘टास्क’ त्याने यशस्वीपणे पूर्ण केलेला असतो.

 

gems inmarathi

 

१९८० च्या दशकातील कल्पनाशक्तीला लोक ही जाहिरात बघतांना नक्कीच दाद देतील.

‘जेम्स बॉण्ड’ हे पात्र त्या काळात जाहिरात, कॉमिक्स या सर्वच क्षेत्रात लोकप्रिय झालेलं होतं. हे पात्र लोकप्रिय करण्यामागे इंग्लंडच्या ‘ब्रोकोली फॅमिली’ या कंपनीची कल्पकता आणि मेहनत होती.

आपण मोठ्या पडद्यावर ‘जन्म’ दिलेल्या जेम्स बॉण्ड या पात्राचा असा वापर ब्रोकोली फॅमिलीला पटला नाही. ब्रोकोली फॅमिली ही जेम्स बॉण्ड सिरीजच्या सर्व सिनेमांचे हक्क विकत घेतलेली कंपनी आहे.

जेम्स बॉण्डचा फोटो, संवाद कुठे वापरायचं असेल तर या कंपनीची आधी रीतसर परवानगी घेणं हे कायद्याने बंधनकारक आहे.

कॅडबरी जेम्सची जाहिरात बघितल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया अशी नोंदवली की, “जेम्स बॉण्ड या पात्राचा हा अपमान आहे. इतकी मोठी जाहिरात या पात्राला घेऊन तयार करणं हा योगायोग असू शकत नाही. आमच्या पात्राची इमेज खराब करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही.”

===

हे ही वाचा जेम्स बॉण्डने स्टीव्ह जॉब्सला लिहिलेल्या व्हायरल पत्रामागचं सत्य तुम्ही वाचायलाच हवं!

===

broccoli family inmarathi

 

१९९२ मध्ये आजच्या इतकी ट्विटरची टीव टीव चालायची नाही. अन्यथा, कॅडबरी कंपनीच्या या जाहिराती विरुद्ध एखादं हॅशटॅग हे काही मिनिटांतच जगभरात पसरलं असतं.

ब्रोकोली फॅमिलीने एक कायदेशीर नोटीस कॅडबरीच्या मार्केटिंग डिपार्टमेंटला पाठवली होती. हे मार्केटिंग कॅम्पेन पियुष पांडे यांनी तयार केलं होतं. त्यांनी या नोटिसबद्दल अशी प्रतिक्रिया दिली होती की,

“ही नोटीस आम्हाला खूप उशिरा मिळाली आहे. आम्ही जेम्स बॉण्डच्या थीमवर तयार केलेल्या जाहिराती दाखवणं खूप आधीच बंद केलं आहे. त्यांचा संग्रह आमच्याकडे आहे आणि तो तसाच राहील. जर का बॉण्ड हे नाव वापरण्यावर इतके निर्बंध असतील तर लवकरच अशी नोटीस ब्रुक बॉण्ड या चहाच्या कंपनीने सुद्धा जेम्स बॉण्डला पाठवली पाहिजे कारण ‘ब्रुक बॉण्ड’ हा ब्रँड जेम्स बॉण्डपेक्षा खूप आधीचा आहे. “

 

brooke bond inmarathi

 

कॅडबरी इंडियाचे तत्कालीन कायदा सल्लागार चंदर एम लाल यांनी या नोटीसला या शब्दात उत्तर दिलं होतं की, ” इंडियन पिनल कोडच्या नियमानुसार, कोणतीही जाहिरात ही टीव्हीवर दाखवण्यापासून ३ वर्षांच्या आत जर कोणी विरोधी याचिका दाखल केली तर ती ग्राह्य धरली जाते.

आम्हाला ही नोटीस मिळाली तेव्हा ही जाहिरात टीव्हीवर दाखवणं बंद होऊन पाच वर्ष कधीच पूर्ण झाली आहेत. अजूनही विरोध असेल तर, आम्ही जाहिरातीच्या शेवटी ‘जेम्स बॉण्डला समर्पित’ ही ओळ लिहायला तयार आहोत.”

इतकं स्पष्ट उत्तर दिल्यानंतर हा वाद तिथेच संपुष्टात आला होता. पण, त्यानंतर एक वाद भारतातच उभा राहिला होता. नॅशनल फूड प्रॉडक्ट्स (NFP) ने कॅडबरी जेम्सची कॉपी केली होती.

तेव्हा कॅडबरीने हा अनुभव हाताशी असल्याने त्वरित नॅशनल फूड प्रॉडक्ट्सचा विरोध करून त्या चॉकलेटचं उत्पादन आणि जाहिरात बंद पाडली होती.

हे बघून देंजॅक एल एल सी या ब्रोकोली फॅमिलीच्या कंपनीने कॅडबरीबद्दल ही प्रतिक्रिया दिली होती की, “ज्यांनी स्वतः आमची कॉपी केली आहे, ते इतरांना कॉपी करणं चुकीचं आहे हे सांगत आहेत.” यावर कॅडबरीने काहीच प्रतिक्रिया न देण्याचं ठरवलं.

हे सगळं होत असतांना कॅडबरीची विक्री कित्येक पटीने वाढली होती. कारण, कॅडबरीचं नाव तेव्हा सतत वर्तमानपत्रात झळकत होतं. या वादामुळे त्यांची मार्केटिंग आपोआप होत होती. लहान मुलांना तर यातील काहीच कळत नव्हतं. ते आपल्या आवडत्या जेम्सच्या गोळ्यांचा आस्वाद घेण्यात मग्न होते.

 

cadbury inmarathi

 

कंपनीची जाहिरात, ब्रँडिंग कसं असावं हे ती प्रत्येक कंपनी ठरवत असते. काही नियमांचं पालन केलं तर सर्वांनाच व्यवसाय करता येईल आणि आपला वेळ हा अश्या कायदेशीर गोष्टींमध्ये वाया जाणार नाही,

हे कॅडबरी इंडिया लिमिटेडच्या वेळीच लक्षात आलं. यानंतर आजपर्यंत कॅडबरीची कोणतीही जाहिरात कॉपीराईटच्या वादात अडकली नाहीये आणि सध्या ही कंपनी उत्कृष्ट दर्जाचे चॉकलेट आणि “कुछ मीठा हो जाये” या टॅगलाईनने लोकांचं मन जिंकत आहे.

===

हे ही वाचा दोघांचं भांडण – सगळ्यांचा लाभ! भावांच्या भांडणातून स्थापन झाले जगप्रसिद्ध शूज ब्रँड्स

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?