' शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाही: इतिहास माहित नसणाऱ्यांसाठी विशेष “धागा” – InMarathi

शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाही: इतिहास माहित नसणाऱ्यांसाठी विशेष “धागा”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

शरद पवार यांना भारतीय राजकारणातले तेल लावलेले पैलवान किंवा राजकरणातले चाणक्य असंही बरीच लोकं म्हणतात. अर्थात या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकं काय तथ्य हे बाजूला ठेवलं तरी काही क्षण आपल्यालाही असंच वाटतं!

खरंतर शरद पवार म्हणजे राजकारण, समाजकारण कोळून प्यायलेलं एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना सत्तेत न राहताही बरंच काही घडवून आणता येतं!

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र निवडणुकांचंच घ्या, कशाप्रकारे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं? कुणाच्या कृपेमुळे आलं हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. किंग सगळ्यांना ठाऊक असतो पण किंगमेकर फार कमी लोकांना माहीत असतो.

===

हे ही वाचा शरद पवारांना लाख शिव्या घाला, पण त्यांच्यासारखी “विद्या”नगरी कुणीच उभारली नाही… हे मान्य करा!

===

 

mahavikas aghadi inmarathi

 

आणि गेली कित्येक वर्ष शरद पवार यांना बऱ्याचदा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे किंगमेकरच्या भूमिकेत आपण पाहिले आहे!

निवडणूक आली की शरद पवार यांच्या समर्थकांमध्ये एकच चर्चा सुरू होते ती म्हणजे साहेब पंतप्रधान होणार, पण गेली कित्येक वर्ष ही चर्चा फक्त चर्चा म्हणूनच होताना पाहिली आहे!

पण आजतागायत शरद पवार यांनी कधीच पंतप्रधान व्हायची इच्छा दर्शवली नाही, किंबहुना महाराष्ट्रात सरकार त्यांचं असूनसुद्धा ते फ्रंटफुटवर नाहीत! कृषिमंत्री, मुख्यमंत्री, क्रिकेट कौन्सिलचे चेअरमन अशी मोठमोठी पदं भूषावल्यानंतरसुद्धा शरद पवार पंतप्रधानपदापासून लांब का राहिले याविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत!

श्रीराज त्रिपुते या राइट विंग समर्थकाने ट्विट-थ्रेड म्हणजेच ट्विटसचा धागा सोशल मीडियावर पब्लिश केला आहे, ज्यात त्यांनी शरद पवार पंतप्रधान का होऊ शकणार नाहीत याची सविस्तर कारणं दिली आहेत. जाणून घेऊया या ट्विटच्या माध्यमातून ते नेमकं काय सांगू पाहतायत!

 

tweet thread 1 inmarathi

 

शरद पवार यांची बाळसाहेबांशी मैत्री होती आणि ते नरेंद्र मोदी यांच्यासाठी गुरु चरणी आहेत, त्यामुळे कार्यकर्ते आणि पत्रकारांकडूनच शरद पवार पंतरप्रधान होणार का? असे वातावरण निर्माण केले जाते पण या भाबड्या आशेवर देशाचा पंतप्रधान ठरत नाही असे त्यांचे म्हणणे या ट्विट मधून दिसते!

 

1 inmarathi

 

या खालील ट्वीट मधून श्रीराज यांनी काही आकडेवारी मांडली आहे त्यावरून भाजपा कसा मोठा होत गेला आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसला बहुमत मिळवणंसुद्धा कसं मुश्किल होत याचा अंदाज या खालील आकडेवारीवरून येतो!

 

3 inmarathi

4 inmarathi

 

या ट्विटमधून त्यांनी शरद पवार आपल्या जनतेला आपले नेते वाटतात का? असा थेट प्रश्न केला आहे!

 

tweet thread 4 inmarathi

 

ममता बॅनर्जी यांच्या राजकीय कारकीर्दीचा दाखला देत त्यांनी इतर राजकीय नेत्यांचीसुद्धा या ट्विट मध्ये प्रशंसा केली आहे!

 

6 inmarathi

7 inmarathi

 

कॉँग्रेस सोडण्यामागे घराणेशाही हे एकमेव कारण देऊन पवारांनी वेगळा पक्ष काढला खरा, पण त्यांच्या एकंदर धोरणांवरून ते सुद्धा घराणेशाहीच करतायत हे नुकत्याच महाराष्ट्र निवडणुकीवरून समजून आलं, जेंव्हा पक्ष फोडून रातोरात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आलं!

असा श्रीराज यांचा रोख या ट्विटरमधून दिसत आहे!

===

हे ही वाचा शरद पवारांनी गळ टाकला आणि छगन भुजबळांनी ठोकला शिवसेनेला रामराम!

===

8 inmarathi

9 inmarathi

10 inmarathi

11 inmarathi

 

एकंदरच पवार यांचं राजकारण आणि त्यांच वाढतं वय बघता ते पंतप्रधान होतील ही शक्यताच कमी आहे हे या ट्विटथ्रेडच्या माध्यमातून श्रीराज सांगू पाहत आहेत!

12 inmarathi

13 inmarathi

14 inmarathi

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?