' इंग्रजांच्या अपमानामुळे 'खुन्नस' खात जगाने तोंडात बोट घालावं असे "ताज"महाल बांधले!

इंग्रजांच्या अपमानामुळे ‘खुन्नस’ खात जगाने तोंडात बोट घालावं असे “ताज”महाल बांधले!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

“टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज” भारतीय व्यवसायिकांमध्ये अत्यंत विश्वस्त नाव. क्षमता असूनही फक्त नफा कामावणाच्या मागे न लागता, देश सेवेला प्रथम प्राधान्य देणारा, अतोनात समाज सेवा आणि देश सेवा करणारा ब्रँड. ज्याचा पाया जमशेदजी टाटा यांनी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी, वडिलांसोबत व्यावसायिक ज्ञानार्जन सुरु करून रचला होता.

जमशेदजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी गुजरात येथील नावसारी जिल्ह्यात झाला. लहान पणापासूनच ते आपल्या वडिलांसोबत त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी रमू लागले व तिथून आपले व्यवसायाचे धडे गिरवू लागले.

 

jamshedji inmarathi

 

२१ व्या वर्षी व्यवसायाची सुरुवात गुजरात येथील दिवाळं निघालेली ऑइल मिल विकत घेऊन, तिचे परिवर्तन अत्यंत यशस्वी कापसाच्या फॅक्टरीत करून केली.

त्या त्यांच्या पहिल्या फॅक्टरीचं नाव, ” एलेक्जेंड्रा मिल” होतं. हळू हळू करत त्यांनी आपला व्यवसाय विस्तृत केला व नागपूर, पुद्दुचेरी, अहमदाबाद येथे कॉटन आणि कपड्याचे कारखाने स्थापित केले.

त्यांची ४ स्वप्न होती – भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण संस्था उभारणे, वर्ल्ड क्लास हॉटेल, सर्वात मोठी लोह आणि स्टील उत्पादन करणारी कंपनी आणि एक हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट.

त्यांचं हे हॉटेल बांधण्याचं स्वप्न तर साकार होणार होतच पण त्यामागचं कारण असं असेल हे त्यांना कधीच वाटलं नव्हतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

“इतका मोठा व्यावसायिक, बिजनेस टायकून, एकदा भारतातीलच वॉटसन नामक मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला असताना त्याला निव्वळ भारतीय असल्याने प्रवेश नाकारण्यात आला.” हा भारतीय व्यावसायिक दुसरं कोणी नसून खुद्द जमशेदजी टाटा होते.

त्यांनाच ह्या हॉटेल मध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. तेव्हा त्यांच्या मनाला हि गोष्ट खूप लागली. भारतात असून भारतीयांना चांगल्या हॉटेल, दवाखाने, शाळा येथे प्रवेश नव्हता.

तेव्हा भारतात सुद्धा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं, वर्ल्ड क्लास सोयी सुविधांनी परिपूर्ण हॉटेल असावं असं त्यांना वाटलं आणि  ताज महाल पॅलेस हॉटेलची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली.

 

taj mahal palace inmarathi

 

१९०३ साली १०००० स्क्वेयर फूट जागेवर टाटांनी जगाने तोंडात बोटं घालावी असं ताज हॉटेल बांधलं. हॉटेल व्यवसायातील कुठलाही अनुभव नसताना टाटा यात शिरले व यशस्वी सुद्धा झाले.

मुंबई पुढे पर्यटनस्थळ होईल म्हणून इथे एखादे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉटेल असावे ही दूरदृष्टी घेऊन टाटा या क्षेत्रात उतरले होते. पण ते अजिबात वावगे ठरले नाही.

ताज हॉटेलच वौशिष्ट्य असं आहे की त्याचं बांधकाम कोण्या ब्रिटिश किंवा परदेशी अभियांत्रिकाने केलेलं नसून, वास्तूविशारद रावसाहेब सिताराम खंडेराव वैद्य या मराठी माणसाने केलं आहे.

ताज पूर्ण होण्याच्या आधीच त्यांचं निधन झाल्या कारणाने, ताजच्या बांधकामाचं उर्वरीत काम डब्लू. ए. चेंबर्स ह्या इंग्रजी अभियांत्रिकाने पूर्ण केलं. त्या काळात ताजमध्ये बाथरूम मटेरियल पासून पंखे, लाईट, सगळं सगळं साहित्य अमेरिका, जर्मनी, तुर्कस्तान इथून आयात करण्यात आलं होतं.

आज ताज मुंबईची ओळख बनलं आहे. त्याकाळीदेखील ताज वर उभारलेले २४० फूट उंचीचे घुमट हे आकर्षणाचा विषय बनले होते. आजही भारतीय नौदलासाठी हे घुमट, दिशा बघण्याचे व भारत जवळ आहे हे ओळखण्याचे एक मुख्य केंद्र आहे.

 

taj 2 inmarathi

ताजच्या बांधकामाच्या २० वर्षांनी गेट वे ऑफ इंडियाची निर्मिती झाली पण तो पर्यंत ताज एकमेव आकर्षणाचं केंद्र बनून राहिलं होतं. भारतात एखाद्या वास्तूत एस्कलेटर म्हणजेच “सरकता जिना” असलेली पहिली वास्तू म्हणजे ताज महाल पॅलेस हॉटेल.

ताजचं बांधकाम पूर्ण होण्याआधीच, १६ डिसेंम्बर १९०३ साली हे हॉटेल ग्राहकांसाठी खुलं करण्यात आलं होतं. आणि त्यावेळी साध्या खोल्यांचं शुल्क १० रुपये आणि पंखा, लाईट, स्नानघर, अशा सोयी सुविधांयुक्त खोल्यांचं शुल्क ३० रुपये असं आकारण्यात येत होतं.

हॉटेलच्या बांधकामात वापरलं गेलेलं लोह आणि स्टील हे टाटांचच होत. त्यावेळी हे स्टील फ्रांसमध्ये आयफेल टॉवरसाठी निर्यात करण्यात येई.

हॉटेल मधले स्वयंपाकी म्हणजेच शेफ हे स्पेशल फ्रांस मधून बोलावून घेतले होते. तेव्हापासूनच ताज हे फक्त श्रीमंतांसाठी व परदेशी पर्यटकांसाठीच असलेलं हॉटेल आहे.

 

taj dinner inmarathi

 

सामान्य माणसं ताज मध्ये एक कप कॉफी घेण्याचं फक्त स्वप्नच बघू शकतो असं म्हणायला हरकत नाही. पण ताज हॉटेलची निर्मिती करणे काही सोपे नव्हते.

टाटांना बऱ्याच लोकांनी विरोध केला होता. त्यात सगळ्यात अग्रेसर होत्या त्यांच्या बहिणी. कारण एका इतक्या मोठ्या उद्योगपतीने एक “भटारखाना” (म्हणजे खाण्याचे ठिकाण किंवा खानावळ) बांधावा हे त्यांच्यासाठी नापसंतीचे होते.

पण टाटांना आपल्या दुरदृष्टीवर अतोनात विश्वास होता. त्यांनी आपलं स्वप्न आपल्या उराशी घट्ट धरून ठेवलं होतं व त्यांच्या ह्या ध्येयाचा शेवटपर्यंत पाठपुरावा सुद्धा केला होता.

हे हॉटेल समस्त राजघराण्यातील व बड्या उद्योगपतींचे फार आवडीचे हॉटेल झाले होते. भारतातील पहिली बॉल रुम (म्हणजे इंग्रज स्त्री पुरुष पार्टी दरम्यान जे बॉल नृत्य करतात ती जागा) ताजमध्ये होती.

 

taj ballroom inmarathi

 

ताजच्या विस्तारासाठी जमशेदजींनी ताजच्या शेजारी असलेली “ग्रीन मेन्शन” इमारत तेव्हाच्या ३.०६ लाखांत विकत घेतली. पण फक्त हॉटेलची निर्मिती करणे हेच टाटांचं स्वप्न होतं.

हे हॉटेल पुढे चालवण्याचा त्यांचा कुठलाही विचार नव्हता. बांधकामात झालेल्या एका चूकीमुळे, म्हणजे हॉटेलचे स्वयंपाकघर हे सगळ्यात वरच्या मजल्यावर असल्याने ह्या हॉटेलला चांगलं गिऱ्हाईक येत नव्हतं.

पण टाटांनी पुढे हे हॉटेल सुधारण्याचे ठरवले व त्यात लिफ्ट, इलेक्ट्रिक दिवे, आणि AC बसवण्याचे ठरवले. पण ताजची इतकी प्रगती होताना टाटा ते क्षण अनुभवू शकले नाही.

ज्यावेळी ताजच्या पहिल्या इलेक्ट्रिक लाईटची चाचणी होणार होती, त्याच वेळी, म्हणजे १९ मे १९०४ रोजी जर्मनी दौऱ्यावर असताना जमशेदजी टाटांनी जगाचा निरोप घेतला.

 

jamshedji tata inmarathi

 

पुढे अनेक सुधारणा होऊन एक २५ मजली अत्यंत सुदंर आणि डोळे दीपवणाऱ्या वास्तूच्या रुपात ताज महाल पॅलेस हॉटेल जगासमोर आलं, आणि आज ते टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा अत्यंत महत्वाचा आणि नफा मिळवून देणारा घटक ठरलेलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?