' कोकण रेल्वे बांधणाऱ्या ‘हातांनी’ जगातील सर्वात उंच अशा रेल्वे मार्गावरचा पूल बांधला – InMarathi

कोकण रेल्वे बांधणाऱ्या ‘हातांनी’ जगातील सर्वात उंच अशा रेल्वे मार्गावरचा पूल बांधला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काश्मीर म्हंटल की समोर नुसते बर्फाचे डोंगर दिसून येतात, ये हसीना वादीया ये खुला आसमा म्हणणारे अनेक प्रेमीयुगले तिकडे फिरताना दिसून येतात. जितके डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्ग सौंदर्य तितकेच खडतर तिकडचं मानवी जीवन.

वातावरणातील बदल, सहा महिने जवळपास संपूर्ण बर्फाच्छादित असलेल्या, अशा या वातावरणात कोणतेच पीक घेता येत नाही,उद्योगधंदे येऊ शकत नाहीत. त्यामुळे पर्यटन हेच एकमेव उत्पन्नाचे साधन आज त्यांच्याकडे आहे.

 

highway inmarathi

हे ही वाचा – मेघालयाच्या किर्र जंगलातील नैसर्गिक पूल जपण्यासाठी हा तरुण जीवाचे रान करतोय

जितके खडतर आयुष्य तितकेच काश्मीर सारख्या भागात रस्त्याने पोहचणे तितकेच कठीण आहे, जम्मू वरून श्रीनगरला निघाल्यावर वाटेत विना अडथळा प्रवास झाल्यास तुम्ही नशीबवान ठरता. कारण वाटेत अनेक दऱ्याखोऱ्यातून प्रवास करत तुम्ही येता, त्यात landslide सारखे प्रकार झाल्यास वाहतूक पूर्णपणे ठप्प होते.

जिथे रस्त्याने पोहचणे खडतर आहे तिथे आपल्या सरकारने थेट रेल्वे पोहचवण्याचा घाट घातला आहे. आणि हळू हळू तो यशवीरित्या पार पाड आहेत याची एक पोचपावती नुकतीच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केली.

piyush inmarathi

 

एकूण प्रकल्प :

२००२ साली जम्मू ते बारमुला रेल्वे मार्गाची घोषणा तयार करण्यात आली. जम्मू ते बारमुला असा तब्बल ३५० किमीचा रेल्वे प्रकल्प आहे.

rail route inmarathi

हे ही वाचा – चीनच्या नाकावर टिच्चून भारतीय सैन्याने बांधलाय गलवान नदीवर ६० मीटर लांब पूल

ज्यात एकूण छोटे आणि मोठे  मिळून एकूण ३७ पूल व ३५ बोगदे आहेत. ज्याचे काम अनेक वर्ष सुरु आहे, मुळातच अशा खडतर ठिकाणी रेल्वे सारखी यंत्रणा चालवणे हे कसोटीचे काम आहे. निसर्गाची देखील उत्तम सतत तुम्हाला लागते परंतु काश्मीर  खोऱ्यात अनेकदा विविध आव्हाने येत असतात.

भूगोल आणि विज्ञानाची उत्तम सांगड घालावी लागते, त्याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे या रेल्वे मार्गावर जो पूल बांधण्यात आला आहे तो जगातील सर्वात उंचीचा पूल मनाला जात आहे.

पूल नक्की आहे कुठे ?

जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातून चीनबद नदी वाहते. त्याच नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल कुरी गावात येतो जे गाव कटरा ते बनिहाल या मार्गावर येते.

 

chinab bridge 1 inmarathi

 

पुलाची उंची :

पुलाची उंची चिनाब नदीपासून ३५९मि. आहे, त्यावर असे ही म्हंटलं जातंय की हा पूल पॅरिस मधील आयफेल टॉवरपेक्षा उंच मनाला जातोय. याआधी चीनमध्ये सर्वात जास्त उंचीचा रेल्वे मार्ग होता. पण या बाबतीत देखील आपण चीन ला मागे टाकत आहोत, ही अभिमानाची बाब आहे आणि त्यात महत्वाचे म्हणजे संपूर्ण स्वदेशी लोकांनी हा पूल बांधला आहे.

chinab 3 inmarathi

 

पुलाचा खर्च:

पूल जवळजवळ १.३ किमी लांब असल्याने त्यांचा खर्च १,२५० कोटी इतका आहे. २००४ सालापासून या पुलाचे बांधकाम करण्यास सुरवात झाली. १३०० कामगार आणि ३०० इंजिनिअर असा मोठा फौजफाटा या कामासाठी तैनात केला होता.

chinab 2 inmarathi

 

२००८-९ च्या दरम्यान काम थांबविण्यात आले होते. कारण या खोऱ्यात वारे जास्तच वेगाने वाहत होते,म्हणून रेल्वे ने दुसरीकडे पूल बांधाण्याचा विचार केला होता, मात्र पुन्हा त्याच जागेवर बांधण्याचे ठरवले.

पूल बांधताय कोण?

 

kokan inmarathi

 

आज कोकणात जाताना प्रत्येक चाकरमानी कोकण रेल्वे बांधणाऱ्यांचे आभार मानतो. त्याच कोकण रेल्वे बांधणाऱ्या हातांनी आज काश्मीर सारख्या दुर्गम भागातील  रेल्वे मार्गाची बांधणी केली आहे. 

फायदा कोणाला?

आज कोरोनसारख्या व्हायरसमुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. पर्यटन व्यवसाय हळू हळू पूर्वपदावर येत आहे. त्यात काश्मीर सारखे ठिकाण फक्त आणि फक्त पर्यटनवर अवलंबून आहे तिथे मोठ्या प्रमाणवर नुकसान होत आहे.

आज अनेक जण प्रवास करत असतात, काश्मीरला लवकर पोहचण्यासाठीचा मार्ग म्हणजे थेट विमानाने श्रीनगर इथे जात येते परंतु विमान प्रवास सर्वाना परवडेलच असे नाही.

लवकरात लवकर या रेल्वे मार्गाचे संपूर्ण काम होऊन प्रवाशांसाठी खुला व्हायला हवा. एकीकडे पुण्याला जाताना खंडाळ्याच्या घाटाची मजा घेत जाणारे आपण, अशा मार्गवरुन जाताना हमखास हे गाणे म्हणू

ये हसीन वादीया ये खुला आसंमा आगये हम कहा….

===

हे ही वाचा – भारतीय सेनेने केवळ ४० दिवसात बांधलेला पूल – या अचाट मोहिमेविषयी…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?