' अमिताभ आणि माधुरी यांनी एकही चित्रपट एकत्र न करण्यामागे आहे एक विचित्र कारण – InMarathi

अमिताभ आणि माधुरी यांनी एकही चित्रपट एकत्र न करण्यामागे आहे एक विचित्र कारण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण ज्या क्षेत्रात काम करण्यासाठी पदार्पण करतो, त्यावेळी त्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या, नावलौकिक मिळवलेल्या किंवा सध्याच्या भाषेत सांगायचं झालं तर त्या क्षेत्रातील ‘बापमाणुस’ समजल्या जाणा-या व्यक्तीसोबत किमान एकदा तरी आपल्याला काम करता यावं हे स्वप्न हमखास पाहिलं जातं.

मग ते क्षेत्र खेळ असो, बॉलिवूडसारखी झगमगती इंडस्ट्री किंवा कोणत्याही क्षेत्रातील नोकरी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अर्थात यामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीत येणा-या नवोदितांचं लक्ष लागलेलं असतं, ते बिग बी, बॉलिवुडचा किंग खान, इंडस्ट्रीचा दबंग अशा आघाडीच्या कलाकारांसोबत एकदा तरी स्क्रीन शेअर करता यावा याची.

 

heros inmarathi

 

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन अर्थात बिग बी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर… असा केवळ विचारचं अनेकांना प्रेरणा देण्यासाठी पुरेसा ठरतो. अशी संधी मिळाली आणि ती एखाद्या अभिनेत्रीने नाकारली हे कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही, कारण बॉलिवुडच्या या शहनशहा बरोबर काम करण्याची संधी नाकारणं म्हणजे निव्वळ मुर्खपणा असं तुम्हीही म्हणाल.

मात्र नेमका हाच प्रसंग बॉलिवुडच्या धकधक गर्लबरोबर घडलाय. नेमकं असं काय घडलं की अभिनयाचा शहनशहा असलेले बिग बी आणि सौंदर्य, नृत्य यांचं वरदान लाभलेली माधुरी दिक्षीत यांनी कधीही एकत्र काम केलं नाही.

भारतातीलच नव्हे तर जगभरातील अनेक प्रेक्षकांना हा प्रश्न अनेकदा पडला. अमिताभ आणि माधुरी ही जोडी चित्रपटात दिसली असती तर त्या चित्रपटाने यशाचे, प्रसिद्धीचे कितीतरी उच्चांक मोडले असते, मात्र एकाही दिग्दर्शकाने हा प्रयत्न केला नाही आणि याचाच परिणाम म्हणजे प्रेक्षकांचे अतिशय लाडके हे दोघं एका गाण्याव्यतिरिक्त कधीही संपूर्ण चित्रपटात एका स्क्रीनवर दिसले नाहीत.

आता तुम्ही विचार करत असाल की यामागे या दोघांचं काहीतरी भांडण असेल किंवा हेवेदावे असतील.

मात्र प्रत्यक्षात असं काहीही नाही. या दोघांच्या एकत्र न येण्यामागे आहे बॉलिवुडचा एव्हरग्रीन हिरो अनिल कपूर.

झालं असं, की १९८४ साली आबोध या सिनेमातून माधुरीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र हा सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच आपटला. त्यानंतर पाठोपाठ तिने केलेला हरएक चित्रपट ‘फ्लॉप’ ठरत असताना अनेकांनी याचं खापर तिच्यावर फोडलं.

 

madhuri inmarathi

हे ही वाचा – प्रेमळ स्वप्नं दाखवणाऱ्या पडद्यावरील या १० रोमँटिक जोड्यांची खऱ्या जीवनातील कहाणी अधुरीच राहिली

दिग्दर्शकांसाठी अनलकी ठरणा-या माधुरीसोबत काम करण्यासाठी त्यावेळी इंडस्ट्रीतील दिग्गज हिरो तितकेसे उत्सुक नव्हते. मात्र याच परिस्थितीत अनिल कपूरने माधुरीवर विश्वास दाखवत तिच्यासोबत काम करण्यास होकार दिला.

१९८८ साली माधुरी आणि अनिल यांचा तेजाब सुपरहिट झाला आणि मग माधुरीचं करिअरही सुसाट धावू लागलं. मुख्यतः या दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. यामुळेच लाडला, बेटा, राम लखन यांसारख्या अनेक हिट फिल्म्समध्ये हीच जोडी कायम राहिली.

 

anil kapoor inmarathi

 

याचवेळी आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणा-या माधुरीसोबत काम करण्याची इच्छा अनेक हिरोंनी व्यक्त केली. यात अमिताभ बच्चन यांचाही समावेश होता. बिग बी आणि माधुरी यांचा एकत्र चित्रपट काढण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यात चढाओढ लागली होती.

 

madhuri-inmarathi

 

मात्र याचवेळी अनिल कपूरने मात्र अमिताब सोबत काम करण्यास माधुरीला नकार दिला. याचवेळी माधुरी आणि अनिल यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच अमितजींसारख्या दिग्गज कलाकारासोबत माधुरीने काम केलं तर त्यांच्या जोडीची जास्त चर्चा होईल परिणामी माधुरी – अनिल ही जोडी प्रेक्षक विसरतील अशा अनेक कारणांमुळे अनिल कपूरने माधुरीला या संधीला नकार देण्याचा सल्ला दिला.

 

amitab madhuri

 

अनेकांच्या मते अनिल कपूर हे माधुरीबाबत जास्त पझेसिव्ह असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.

 

anil madhuri inmarthi

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

करिअरच्या सुरवातीला केवल अनिल कपूरनेच आपली साथ दिली होती हे लक्षात ठेवून माधुरीनेही त्यांचा निर्णय मान्य केला.

त्यामुळे माधुरी आणि अमितजी या दोघांचा एकही एकत्र चित्रपट पडद्यावर आलेला नाही. बडे मिया, छोटे मिया या चित्रपटातील “मेरे प्यार का रस जरा चखना, ओय मखना” या गाण्यात मात्र अमिताभ बच्चन, गोविंदा या जोडीसह माधुरीच्या लाडीक अदा प्रेक्षकांना पाहता आल्या.

 

 

अर्थात दुधाची तहान ताकावर म्हणत प्रेक्षकांनी हे गाणंही एन्जॉय केलं असलं तरी या दोघांचा चित्रपट पाहता आला नाही याची खंत मात्र अनेकांना वाटते.

हे ही वाचा – अभिनयाच्या परीक्षेत नापास झालेला हा विद्यार्थी बनला ‘झक्कास’ अभिनेता!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?