' च्युईंगगम, आईस्क्रीमप्रमाणेच या १२ लोकप्रिय गोष्टींच्या जन्माच्या कथा खूप विचित्र आहेत! – InMarathi

च्युईंगगम, आईस्क्रीमप्रमाणेच या १२ लोकप्रिय गोष्टींच्या जन्माच्या कथा खूप विचित्र आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

घरी यायला उशीर झाल्यावर घरी तयार असलेले अन्न आपण मायक्रोवेव्हमध्ये गरम करतो. रिकाम्या वेळेत चघळायला म्हणून वेफर्स, चॉकोचीप कुकीज घेतो. आता या गोष्टी आपल्या नित्याच्या सवयीच्या झाल्या आहेत.

या सगळ्या गोष्टींचा शोध चुकून लागला आहे. म्हणजे आपण काहीतरी करायचं ठरवतो आणि त्यातून वेगळंच काहीतरी तयार होतं, तशाच या गोष्टी.

फक्त या गोष्टी आपल्या उपयोगाच्या झाल्या आहेत. त्यामुळे मानवी जीवनात बदल झाला. आज अशाच काही वस्तूंची माहिती करून घेऊयात.

१. मायक्रोवेव्ह ओव्हन

 

microwave inmarathi

 

पर्सी स्पेन्सर हे मॅग्नेट्रान्सवर संशोधन करत होते. हाय प्रेशरच्या व्हॅक्युम ट्यूबमधून ज्या रेडिओ लहरी (Radio Waves) तयार होतात त्यांना मायक्रोव्हेवज असं म्हणतात. त्या लहरी ते शोधत होते.

त्यावेळेस एक इंजिनियर तिथे काम करत होता आणि ते करताना त्याच्या खिशातील कँडीबार वितळला. ते पाहून स्पेन्सर यांना लगेच लक्षात आलं, की याच मॅग्नेट्रान्स आहेत, ज्यामुळे कॅंडी बार वितळला.

१९४५ मध्ये त्यांनी या गोष्टीचं पेटंट मिळवलं आणि एक धातूचा बॉक्स तयार केला ज्यात या मायक्रोवेव्हज तयार होतात आणि अन्न गरम होते, पदार्थ तयार करता येतात तेव्हापासून मायक्रोवेव्ह अस्तित्वात आले.

 

२. आर्टिफिशियल स्वीटनर

 

sweetner inmarathi

 

रशियन शास्त्रज्ञ कॉन्स्टँटिन फहलबर्ग हे १८७८ मध्ये एकदा आपल्या रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत प्रयोग करत होते. प्रयोग करता करता त्यांनी ती रसायनं थोडी चाखून पाहिली. तेव्हा त्यांना कळलं की ती किती गोड आहेत.

मग थोड्या प्रयोगानंतर त्यांच्या लक्षात आलं की, सेल्फोबेन्झोईक अॅसिडबरोबर फॉस्फरस क्लोराईड आणि अमोनिया यांच्या रासायनिक प्रक्रियेमुळे सॅकरीन तयार होते. तिथूनच स्वीटनर वापरात आलं.

 

३. पेनिसिलीन

 

penicillin inmarathi

 

१९२८ मध्ये डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलीन हे जगातलं पहिलं अँटिबायोटिक शोधलं. पेनिसिलीन नॉट्याटम ही बुरशी वाढवण्यासाठी त्यांनी ती एका द्रवामध्ये ठेवली आणि त्यांच्या लक्षात आलं की त्या द्रवामधले बॅक्टरिया नष्ट झाले आहेत.

माणसाला ज्या अनेक बॅक्टेरियामुळे आजार होतात ते बॅक्टरीया त्या द्रवामध्ये होते. ते बॅक्टेरिया नष्ट झाले. आणि तिथूनच माणसाला वरदायी ठरणारं अँटिबायोटिक शोधलं गेलं.

===

हे ही वाचा जगप्रसिद्ध पेनिसिलीनच्या शोधाची कहाणी-करायला गेले गणपती, झाला मारुती

===

 

४. चॉकलेट चिप कुकीज

 

chocolate chip inmarathi

 

आता लोकप्रिय असलेल्या चॉकलेट चिप कुकीज १९३० पर्यंत जगाला माहीत देखील नव्हत्या. रूथ ग्रेव्हज वॉकफिल्ड या एकदा चॉकलेट कुकीज बनवत होत्या.

पण त्यांच्या जवळील कोकोपावडर संपली होती म्हणून मग त्यांनी घरात असलेल्या चॉकलेटचे तुकडे केले आणि ते बेकिंग करण्यासाठी ठेवले. जेणेकरून ते चॉकलेट वितळेल आणि कुकीज बनतील.

पण झालं उलटच ते चॉकलेटचे तुकडे तसेच राहिले आणि लज्जतदार कुकीज बाहेर आल्या. त्यातूनच मग चॉकलेट चिप कुकीज जगभर फेमस झाल्या.

 

५. एक्स-रे मशीन

 

x ray machine inmarathi

 

८ नोव्हेंबर १८९५ रोजी भौतिकशास्त्रज्ञ विल्हेल्म कॉनराड रोंटजेन हे जर्मनीच्या वुर्झबर्ग येथील आपल्या प्रयोगशाळेत प्रयोग करत होते. केमिकल लेप दिलेल्या एका स्क्रीनमधून वेगळ्या प्रकारचे किरण बाहेर येतात हे त्यांच्या लक्षात आलं.

त्यांनी त्या किरणांना एक्सरे असं नाव दिलं. एकदा असंच त्या एक्सरे किरणांच्या समोर त्यांनी आपला हात धरला तर त्यांना हाताच्या कातडीच्या आतील हाडे दिसली. त्यातूनच एक्स-रे मशीन शोधलं गेलं.

 

६. पोटॅटो चिप्स

 

potato chips inmarathi

 

१९५३ मध्ये अमेरिकेतल्या एका रिसॉर्टमधल्या जॉर्ज क्रम या शेफला तिथल्या एका ग्राहकाने तक्रार केली, की तिथे मिळणारे फ्रेंच फ्राईज हे अत्यंत जाड आणि कच्चे आहेत.

मग जॉर्जने बटाट्यांचे पातळ स्लाईस केले आणि ते थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळले. त्यानंतर त्या स्लाईसवर थोडं मीठ भरभरून त्याने ग्राहकांना दिले.

हा प्रयोग भलताच यशस्वी ठरला, आणि पोट्याटो चीप्सचा जन्म झाला. आज सगळ्या पार्ट्यांमधला आवश्यक पदार्थ म्हणजेच बटाटा चिप्स.

===

हे ही वाचा जगाला वेड लावलेल्या एका चटपटीत पदार्थाचा शोध “अशा” घटनेमुळे लागलाय हे वाचून हसूच येतं

===

७. टेफ्लॉन

 

teflon inmarathi

 

आज-काल मिळणारी नॉनस्टिक भांडी देखील अपघातानेच बनलेली गोष्ट आहे. १९३८ मध्ये रॉय जे. प्लंकेट हे प्रयोगशाळेत रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर यातील रेफ्रिजरंटवर काम सुरू होते. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की यातून एक पांढऱ्या रंगाचा शक्तिशाली वायू बाहेर पडतोय.

त्याच्या काही चाचण्या केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा जो पदार्थ आहे तो कमी पृष्ठभागावर देखील उष्णता प्रतिरोधक आहे. हा खरंतर सिंथेटिक पॉलिमरचाच प्रकार. त्याला त्यांनी टेफ्लॉन हे नाव दिले.

त्यातूनच टेफ्लॉनची भांडी तयार झाली. त्या टेफ्लॉनच्या गुणधर्मामुळे भांड्याला कोणताही पदार्थ चिकटत नसल्यामुळे त्यांना नॉनस्टिकची भांडी म्हणून मान्यता मिळाली.

 

८. शॅम्पेन

 

champagne inmarathi

 

युरोपात चांगल्या प्रतीच्या द्राक्षांपासून उत्तम वाईन बनवली जात होती. परंतु उंच पर्वतांवरील ठिकाणांमध्ये वाईन बनवताना सगळ्यात अडथळा यायचा तो थंडीच्या चार महिन्यांचा.

थंडीमुळे वाईन आंबण्याची प्रक्रिया थांबायची. आणि वसंत ऋतूत वाइनच्या बॉटल्स मध्ये जास्तीचा कार्बन-डाय-ऑक्‍साईड तयार व्हायचा, जो लोकांना फारसा नको होता.

शेवटी १६६८ मध्ये कॅथलिक चर्च ने या वाइनच्या जास्तीच्या कार्बनेशनचे काही तरी करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी एक माणूस नेमला ज्याचं नाव डोम पियरे पेरिगनॉन. त्याला फ्रान्स मधल्या शॅम्पेन भागात पाठवलं.

याने सगळ्या प्रक्रियेचा आढावा घेईपर्यंत १७०० साल उजाडलं. तोपर्यंत लोकांना ती कार्बोनेटेड वाईन आवडायला लागली होती. त्या भागातल्या या वाईनला शॅम्पेन असं म्हटलं गेलं.

अखेरीस, पेरिगनॉनने शॅम्पेन बनवण्याची अधिकृत फ्रेंच प्रक्रिया विकसित केली. तेंव्हापासून शॅम्पेन अस्तित्वात आली.

 

९. चुईंगम

 

chewing gum inmarathi

 

केवळ चघळण्यासाठी चुईंगम हा पदार्थ ग्रीस मध्ये पूर्वीपासून वापरला जात होता. पण आता जो पदार्थ चुईंगम म्हणून मिळतो तो बनवला गेला १८००  मध्ये.

थॉमस ॲडम्स नावाचा माणूस हिरड्याच्या झाडापासून रबर बनवू पाहत होता, तो प्रयोग काही यशस्वी झाला नाही. पण त्यातूनच पुढे प्रक्रिया करून चुईंगम मात्र तयार झालं.

 

१०. कोका कोला

 

coca-cola InMarathi

 

कोका कोला तयार करणारा माणूस शेफ नव्हता किंवा अन्न उद्योगातही नव्हता. ज्याने याचा शोध लावला तो डॉ. जॉन स्टिथ पेम्बर्टन नावाचा एक फार्मसिस्ट होता. त्याला कोकेन आणि कॉफी पासून दारुसारखे एक उत्तेजक पेय तयार करायचे होते.

लोकांचे ड्रग्स घेण्याचे व्यसन सुटावे म्हणून त्याला असे पेय बनवायचे होते. तो स्वतः एक मोर्फिन घेणारा व्यसनी होता. त्याला त्यापासून मुक्तीता हवी होती.

पण त्याला त्या पेयामध्ये दारू वापरण्यास बंदी करण्यात आली. तरीही कोकेन बरीच वर्ष वापरलं जायचं. शेवटी त्याने त्याच्या पेयातील अल्कोहोल आणि कोकेन बाजूला काढले आणि 1886 मध्ये कोका कोलाची पहिली बाटली तयार झाली.

 

११. सेफ्टी ग्लासेस

 

safety glass inmarathi

 

१९०३ मध्ये एडवर्ड बेनेडिक्टस आपल्या प्रयोगशाळेत काम करत होता. त्याच्या हातून चुकून एक काचेचा फ्लास्क खाली पडला. पण त्याचे बारीक तुकडे झाले नाहीत तर त्या फ्लास्कला फक्त एक तडा गेला होता.

त्या काचेतील सेल्युलोज नायट्रेट कोटिंगमुळे बाकीची काच एकसंध होती. त्यातूनच सेफ्टी ग्लासेसचा शोध लगला.

 

१२. आईस्क्रीम कोन

 

cone inmarathi

 

सध्या कुठंही, कधीही खाल्ला जाणारा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे आईस्क्रीम. परंतु १९०४ मध्ये अशी परिस्थिती नव्हती. त्यावेळी आईस्क्रीम प्लेट्समध्ये दिलं जायचं. पण गर्दीच्या वेळी त्या प्लेट्स धुणे अवघड व्हायचे.

मग अर्नेस्ट ए. हम्वी या एका आईस्क्रीम व्हेंडरने वेफल्सला कोनाचा आकार दिला आणि त्यात आईस्क्रीम देण्याची शक्कल लढवली. त्यानंतर आईस्क्रीम कोन अस्तित्वात आला.

अशा या निराळ्या संकल्पनेतून, फसलेल्या प्रयोगातून तयार झालेल्या गोष्टींनी मानवी जीवन रंगतदार केलं आहे.

===

हे ही वाचा डॉक्टरांच्या ‘स्टेथोस्कोप’च्या शोधमागची अफलातून गोष्ट!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?