' गल्लोगल्ली पाहायला मिळणाऱ्या ‘अमृततुल्य’ चहाचं मूळ महाराष्ट्रातील नाहीच! – InMarathi

गल्लोगल्ली पाहायला मिळणाऱ्या ‘अमृततुल्य’ चहाचं मूळ महाराष्ट्रातील नाहीच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – ईशान घमंडे 

===

‘चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवाच’ हे वाक्य तुम्ही ऐकलं असेलच. भारतात तशी चहाबाज मंडळी कमी नाहीत. चहा आवडत नाही, किंवा चहा पितच नाही असे लोक सापडणं तर जवळपास अशक्यच! कारण आपण मंडळी ‘चहाटळ’ आहोत.

नाही नाही, चहाटळ शब्दाचा मूळ अर्थ बाजूला ठेवा; हा समास थोडा वेगळ्या पद्धतीने सोडवूयात आपण. ‘चहाटळ म्हणजे ज्याला चहा अटळ आहे असा’ हा अर्थ बघा किती चपखल बसतोय.

आपण एवढे चहाबाज आहोत म्हणूनच दर दहा फुटांवर एक तरी चहाची टपरी उभी असलेली आपण पाहतो.

 

tea stall inmarathi

 

राजस्थानातून इथे येऊन ‘महाराज’ लोकांनी त्यांचे चहाचे धंदे टाकले आणि ते मालामाल होत चालले आहेत. जगातील कुठलाही चहा प्यायला तरी त्याला टपरीवरच्या चहाची सर नाही, असं म्हणणारेही अनेक आहेत. गेली कित्येक वर्षं याबाबतीत माझंही दुमत नव्हतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मागच्या काही वर्षात मात्र एका चहाने या मतावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. तो चहा म्हणजे ‘अमृततुल्य’! अगदी योग्य नाव आणि तितकीच गोड चव. खरोखरंच या सुमधुर चहाची तुलना अमृताशीच होऊ शकते.

या प्रकारचा चहा पिऊन अमृत कसं असेल, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो असं कुणी म्हणालं तरी मी ते मान्य करायला तयार आहे.

चहाला टपरीवरून उचलून एका सुंदर आणि झकास रूपात आणलं गेलं आणि मग अमृततुल्य असं नाव मिरवणाऱ्या दुकानांची संख्या आणि चहाच्या टपऱ्यांची संख्या सारखीच होत गेली. चहाला अमृततुल्य हे रूप पुण्याने दिलं, असं तुम्हाला वाटत असेल, तर जरा थांबा…

 

amruttulya tea inmarathi

 

मग जन्म नेमका कुठला?

मध्यंतरी मला मिळालेली माहिती तुम्हालाही देतो. आपल्या अमृततुल्य चहाचा जन्म झालाय, तो राजस्थानात!

सध्या भिनमाल नावाने ओळखलं जाणारं, पुर्वाश्रमीचं नरता गाव म्हणजे अमृततुल्यचं जन्मस्थान. जन्म साल म्हणाल तर साधारणपणे १८८०, म्हणजे फार पूर्वी १९व्या शतकातलं आहे.

हे ही वाचा – भारतातील शेवटचे “अमृततुल्य”आहे, ११ हजार फुट उंचावर!

राजस्थानातील दुष्काळाला कंटाळून विश्वनाथ पन्नालाल ओझा हे सपत्नीक, ९०० किलोमीटर दूर असलेल्या पुण्यात आले. भाऊ भवानीशंकर याच्यासोबतीने त्यांनी रविवार पेठेत ‘भांग’ विकायला सुरुवात केली. असं म्हणतात, की ‘अमृततुल्य’ हे नाव तेव्हाच अस्तित्वात आलं.

 

bhaang inmarathi

 

ब्रिटिशांच्या राज्यात नियम बदलत गेले आणि ‘नर्तेकरांनी’ चहा आणि मिठाई विकायला सुरुवात केली. गोंधळलात ना? नर्तेकर म्हणजेच ओझा कुटुंब. आपल्या पुण्यात आल्यावर त्यांनी आडनाव बदलून घेतलं हो! तेही अगदी आपल्या पद्धतीनं. नरता गावचे म्हणून नर्तेकर!

१९२४ सालच्या जुलै महिन्यात अमृततुल्य नावाचं पहिलं दुकान सुरु झालं आणि मग हे अमृत पुण्यात सगळीकडे पसरत गेलं. याचं कारण होतं अनेक राजस्थानी कुटुंबांचा पुण्यात होत गेलेला प्रवेश.

‘एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ ही उक्ती लक्षात ठेऊन ही मारवाडची मंडळी चहाच्या नवनवीन टपऱ्या उघडण्यासाठी मदतीला धावून आली. एकेक करत अमृताचा वर्षाव होऊ लागला आणि अमृततुल्य ही पुण्याची ओळख बनली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

म्हणजे आपल्या पुण्याचा ‘गोडवा’ (?) चहात उतरला हे खरंय, पण हा चहा सुद्धा आलाय तो महाराजकडूनच! म्हणजे शेवटी राजस्थानी चहा तो राजस्थानी चहाच…

टपरीवरच्या रूपातून चहा थोडा चकाचक रूपात गेला एवढंच! तो या चकाचक रूपात येण्यामध्ये येवलेंचा फार मोठा हात आहे, हे वेगळे सांगणे न लगे!

 

yewale inmarathi

 

येवलेंनी अमृततुल्यला मोठी ओळख निर्माण करून दिली आणि मग गल्लोगल्ली, नवनवीन नावं धारण करून अमृततुल्य हातपाय पसरू लागला.

येवलेची सर बाकीच्यांना आहे की नाही हा जरी चर्चेचा वादाचा वगैरे मुद्दा असला, तरी तो बाजूला ठेऊया. राजस्थानचा महाराज आणि पुण्याचा स्वाद यांचं मिश्रण असलेल्या अमृततुल्यचा आनंद घेत राहूया.

===

हे ही वाचा – कामाला कधी लाजू नका, हेच खरं “सिक्रेट”- दरमहा १२ लाख कमावणारा हा चहावाला…

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?