' १ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार, पण कुणाला आणि कशी? ही माहिती वाचा – InMarathi

१ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार, पण कुणाला आणि कशी? ही माहिती वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जानेवारी – फेब्रुवारीत लसीकरणाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पाडला असून आता दुसऱ्या टप्प्याची वेळ आली आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकरांनी ह्याबाबत माहिती दिली आहे.

 

covid vaccine inmarathi

 

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना लस दिली गेली असल्याने आता दुसऱ्या टप्प्यात मात्र प्रत्यक्ष सामान्य नागरिकांचा सहभाग या मोहिमेत होईल. त्यामुळे एकंदरितच या प्रक्रियबद्दल उत्सुकता, संभ्रम, भिती अशा मिश्र भावना आहेत. 

कोणासाठी लस उपलब्ध असेल आणि लसीकरणाची नेमकी प्रक्रिया काय असेल आज हे जाणून घेऊया.

लसीकरण मोहीम –

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात, आत्ता पर्यंत १ करोड ५२ लाखाच्या आसपास आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सना लसीचे २ डोस देण्यात आले आहेत.

आता १ मार्चपासून सुरु होत असलेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात वय वर्ष ६० नंतरच्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच ४५ वर्षे वय असलेल्या पण गंभीर आजार ग्रस्त नागरिकांनाच फक्त प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.

 

vaccine inmarathi

 

इतर नागरिक हे तिसऱ्या टप्प्यात कव्हर होतील.

हे ही वाचा – कोरोना लस येतीये, त्याचं नियोजन करणारं ॲप कोणतं? ते कसं वापरायचंय? जाणून घ्या

खालील आजार असलेले नागरिक या दुसऱ्या टप्प्यात लासीकरणास पात्र ठरतील –

१) दीर्घकालिन श्वसन आजार, chronic obstructive pulmonary disease (COPD), अस्थमा, सिस्टिक फॅब्रीओसिस.

 

ashthama inmarathi

 

२) दीर्घकालीन हृदय, किडनी विकार, लिव्हर आणि मेंदू संबंधीचे विकार.

३) एपिलेप्सी

४) मधुमेह

 

diabetes inmarathi

 

५) बोन मॅरो, स्टेम सेल ट्रान्सप्लांट

६) कॅन्सर्स

 

cancer-inmarathi

 

७) एखाद्या आजारामुळे नष्ट झालेली रोगप्रतिकारकशक्ती.

८) Asplenia and splenic dysfunction

९) लठ्ठपणा

लसीकरण केंद्र 

सध्या भारत सरकारकडे कॉव्ही शिल्ड आणि कोव्हॅकसिन या दोन लसी उपलब्ध असून या लसी १०००० सरकारी तसेच २०००० खासगी दवाखान्यासह लसीकरण केंद्रांतून देण्यात येणार आहेत. त्यापैकी फक्त सिरम इन्स्टिट्युटची कोव्हिशिल्डच खासगी केंद्रांवर उपलब्ध असेल. केंद्रांबाबत यापेक्षा अधिक माहिती व लसीच्या किंमतीबद्दल कोणतेही स्पष्टीकरण अजून सरकार कडून देण्यात आलेली नाही.

लसीकरणाची प्रक्रिया

१. सर्व नागरिकांची मतदान यादी सरकारकडे असून सुद्धा इच्छुक तसेच दिलेल्या अटींमध्ये बसणाऱ्या नागरिकांसाठी सेल्फ रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ठेवण्यात आलेली आहे.

२. आरोग्यसेतु, को-विन, ठराविक रुग्णालय आणि कॉमन सर्व्हिस सेंटरवर लसीकरणासाठी नोंदणी केली जाईल. आणि ह्या नोंदणीकरता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

 

co-win-inmarathi

 

३. को-विन हे लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करून घेण्याचे मुख्य अॅप ठरेल. या अॅपवरून नाव नोंदणी, लसीकरणानंतर मिळणारे सर्टिफिकेट आपल्याला डाऊनलोड करता येईल.

४. ६० वर्षांवरील ज्येष्ठांना आपले नाव नोंदवण्यासाठी ओळख पत्र जसे की – आधार, वोटिंग कार्ड इत्यादींची आवश्यकता असेल. इतर लोकांना आपल्या गंभीर आजाराचे मेडिकल सर्टिफिकेट फॉर्मशी जोडणे गरजेचे असेल.

 

 

Aadhar card Data unsafe.Inmarathi1

 

५. याशिवाय सरकारी यंत्रणेकडून इतर आजारांसाठी एक वेगळा फॉर्म जारी करण्यात येऊ शकतो. नागरिकांनी तो भरून आपले रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असेल. हा फॉर्म सुद्धा को-विन वरच उपलब्ध करून दिला जाईल.

६. लसीकरण संपूर्णतः ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह’ बेसिसवर असणार आहे”. म्हणून स्लॉट बुक करून लसीकरणात सहभागी होणे किंवा ओपन स्लॉट अशा दोन पद्धती ठेवण्यात येणार आहेत.

७. रजिस्ट्रेशन झाल्यावर, आपल्याला एक ठराविक वेळ तसेच ठिकाण सांगितले जाईल. गर्दी टाळण्यासाठी आपण दिलेल्या वेळेचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित असेल.

८. सरकारी केंद्रांवर लसीकरण अगदी मोफत असेल तर खाजगी केंद्रांवर ३०० पर्यंत शुल्क आकारले जाऊ शकते. किंमतीबद्दल ठोस स्पष्टीकरण अजून मिळालेले नाही.

९. एकदा लस घेतल्यावर २८ दिवसांनी पुन्हा एक डोस घ्यावा लागणार आहे. त्यावेळी पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नसेल.

हे ही वाचा – कोरोना लसीचा काळा बाजार – या महत्वाच्या गोष्टींचा शहानिशा करा, यात अडकू नका

लसीकरणानंतर काळजी घ्या

१. लस घेतलेल्या ठिकाणी सूज, आग होणे, खाजवणे, त्वचा थोडीसी लालसर होणे.
२. थकवा किंवा अशक्त पणा येणे.
३. ताप येणे.
४. पायांवर सूज येणे.

या प्रकारची लक्षणं दिसली तरी घाबरण्याचे व पुढचा डोस चुकवण्याचे काहीही कारण नाही. २ दिवस हा त्रास होऊन तिसऱ्या – चौथ्या दिवशी कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. जाणवल्यास, लसीकरण करून घेतलेल्या केंद्रावरील अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधणे नागरिकांकडून अपेक्षित आहे. पण दोन्ही लसी सुरक्षित असल्यामुळे मोठ्या रिऍक्शनची संभावना कमीच आहे.

इतर नागरिकांसाठी लसीकरण कधी?

दुसरा टप्पा पार पडल्यावर इतर नागरिकांसाठी लसीकरण सुरु होईल. त्याला आणखीन २ महिन्यांचा अवधी लागण्याची संभावना आहे.

गरोदर स्त्रिया व लहान मुलांचे लसीकरण कधी होईल ह्याबद्दल अजून ठोस माहिती दिलेली नाही.

 

pregnant lady corona inmarathi

 

आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार “लस जरी सुरक्षित असली तरी लहान मुलांवर, गरोदर स्त्रियांसाठी किती सुरक्षित आहे याची पडताळणी सुरु आहे. लवकरात लवकर त्यांना सुद्धा लस देण्यात येईल.”

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?