' ‘नटसम्राटवर सिनेमा केलात तर डॉ. लागूंनाच घेऊन करा’ असं कुसुमाग्रज का म्हणाले?! – InMarathi

‘नटसम्राटवर सिनेमा केलात तर डॉ. लागूंनाच घेऊन करा’ असं कुसुमाग्रज का म्हणाले?!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – सोहम गोडबोले 

===

कोणी घर देता का घर? या तुफानाला कोणी घर देता का? नटसम्राट नाटकातील अजरामर संवाद, त्यातील स्वगते आज अनेकांच्या तोंडी ऐकू येतात. अशा अजरामर संवादांना जन्म देणारे कवी, लेखक, साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस. शिरवाडकरांनी अनेक कविता, कथासंग्रह, नाटके लिहीली आहेत. त्यातलेच एक गाजलेली कलाकृती म्हणजे ‘नटसम्राट’.

 

viva inmarathi

हे ही वाचा – अभिनयाच्या परीक्षेत नापास झालेला हा विद्यार्थी बनला ‘झक्कास’ अभिनेता!

नटसम्राटचे आजवर अनेक प्रयोग, वेगवेगळ्या दिग्गज नटांनी आपापल्या पद्धतीने उत्तमरीत्या वठवले आहेत. आजही ही भूमिका करायला अनेक नट उत्सुक आहेत.

अशाच एका नटाला घेऊन नटसम्राट करायचा घाट दिगर्शक राजदत्त यांनी पूर्वी घातला होता. तो नट म्हणजे नटसम्राट मोहन जोशी.

झालं असं, की नव्वदच्या दशकात जेंव्हा मोहन जोशी हिंदी मध्ये अनेक सिनेमे येत होते. त्याआधी त्यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले होते. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा हिंदी कडे वळवला. हिंदीमध्ये त्यांनी चांगलेच नाव कमावले. हिंदीत  प्रामुख्याने खलनायकच्या भूमिकेत ते दिसायचे.

 

mohan inmarathi

 

एकीकडे हिंदीमध्ये यशस्वी घोडदौड सुरु असतानाच, दिग्दर्शक राजदत्त यांना नटसम्राट या नाटकावर सिनेमा त्या काळात काढायचा होता, त्यासाठी त्यांनी मोहन जोशींना विचारले. त्यांनी त्वरित होकार देखील कळवला.

कोणत्याही साहित्यकाच्या कलाकृतीवर सिनेमा काढायचा असेल तर त्या साहित्यकाची परवानगी घ्यावीच लागते, कारण मुद्दा येतो कॉपीराईटचा, त्यासाठी दिग्दर्शक राजदत्त आणि मोहन जोशी वि. वा. शिरवाडकरांकडे त्यांची परवानगी घ्यायला त्यांच्या घरी नाशिकला गेले.

शिरवाडकरांनी त्यांचे स्वागत केले, राजदत्त नी मोहन जोशींना घेऊन नटसम्राटवर सिनेमा बनवण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला.

 

nat inmarathi

हे ही वाचा – मराठी रंगभूमीवरील ८ अजरामर नाटकं, ५ व्या आणि ८ व्या नाटकाने रचलाय इतिहास!

शिरवाडकरांनी तो प्रस्ताव मान्य  देखील केला, परंतु एक बदल करण्यास सांगितलं तो म्हणजे मुख्य भूमिका मोहन जोशींनी करण्याऐवजी, डॉ.श्रीराम लागूंनी ती भूमिका करावी. राजदत्त यांनी त्यांना समजावले की, मोहन जोशी सुद्धा एक उत्तम नट आहेत. त्या भूमिकेसाठी त्यांची निवड योग्य आहे आणि ते न्याय देऊ शकतात. त्यांचे आताचे वय त्या भूमिकेसाठी योग्य आहे.

शिरवाडकरांना काही केल्या ते पटत नव्हते, लागूंनी इतक्या उंचीवर त्या भूमिकेला नेऊन ठेवले असल्याने, त्यांच्यासमोर त्या भूमिकेसाठी दुसरे कोणीच दिसून येत नव्हते. बराच काळ चर्चा झाल्यावर शिरवाडकर त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी अटच राजदत्त यांच्यसमोर ठेवली की सिनेमा करायचाच असेल तर तो  डॉ.लागूंना घेऊन करा. मोहन जोशींना दुसरी भूमिका द्या.

 

lagu inmarathi

 

राजदत्त आणि मोहन जोशी तिथून बाहेर पडले. मोहन जोशी यांनी गाडीतच त्यांना सांगितले की त्यांच्या मनात नसेल तर मी नाही करणार पण तुम्ही डॉ.लागूंनाच घेऊन सिनेमा करा.पण पुढे काही कारणांमुळे तो सिनेमा बनू शकला नाही. हा किस्सा खुद्द मोहन जोशी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात मंडला आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी हे शिवधनुष्य पेलेले, त्यांनी नाना पाटेकरांना घेऊन नटसम्राटवर सिनेमा बनवला. मुळात नाना पाटेकरांसारख्या  दिग्गज अभिनेत्यांना अशा भूमिकांमध्ये बघणे थोडे वेगळे वाटते, कारण त्यांची एक वेगळी छाप त्यांच्या सिनेमामधून आपल्याला दिसली आहे.

नटसम्राट सिनेमामध्ये काही सीन्स मध्ये ते ‘नाना पाटेकरच’ वाटतात. त्यावर अनेक जणांनी टीका ही केली. बहुदा कुसुमाग्रजांचे जे म्हणणे होते तेच प्रेक्षकांचे सुद्धा होते असे दिसून येते. आज ही डॉ. लागूंनी अभिनय केलेलं नटसम्राट नाटक youtube सारख्या माध्यमांवर उपलब्ध आहे.

तुमच्या नशिबात एखादी भूमिका करायची त्यावेळी राहून गेली असेल ती कधी ना कधी पुढे भूमिका करायला मिळतेच. आज अनेक वर्षांनंतर नटसम्राट हे नाटक पुन्हा रंगमंचावर आले आणि दस्तुरखुद्द मोहन जोशींचं अप्पा बेलवलकर अर्थात नटसम्राटाची भूमिका करत आहेत.

 

natsamrat inmarathi

 

नटसम्राट ही भूमिका मोहन जोशी तितक्याच ताकदीने, स्वतःच्या शैलीत रंगवली. आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळेला असं होतं की, एखाद्या वेळी ती गोष्ट करायला मिळत नाही किंवा करायची राहून जाते मात्र तीच गोष्ट पुन्हा आयुष्यात मिळतेच. आपल्याकडे म्हणतातच की, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, तेव्हा सिनेमात काम करताना आले नाही पण नाटकात नक्कीच भूमिका करता आली आहे.

===

हे ही वाचा – मान नक्की कुणाचा? देवी सरस्वतीचा की ‘यशवंत’ साहित्यिकांचा?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?