' लायसन्सचं नुतनीकरण? अतिरिक्त पैसे उकळणाऱ्यांविना ही प्रक्रिया करा एका क्लिकमध्ये – InMarathi

लायसन्सचं नुतनीकरण? अतिरिक्त पैसे उकळणाऱ्यांविना ही प्रक्रिया करा एका क्लिकमध्ये

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

देश बदल रहा है, आगे बढ रहा है… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला दाखवलेलं हे स्वप्न सुरुवातीला अनेकांना भारावून टाकणारं वाटलं, मात्र केवळ कागदी घोषणा उपयोगाच्या नाहीत, प्रत्यक्ष कृतीची गरज असते असं म्हणत अनेकांनी त्यावर टिका केली.

 

narendra modi inmarathi

 

‘सरकारी काम’ ही केवळ कृती नसून आता उपहासात्मक म्हण झाली आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे का? एखादं काम दिरंगाईने करणा-याला किंवा उशीरापर्यंत काम रखडवणा-याला आपण सहज “सरकारी काम झालं का ?” असा टोला हाणतो.

काही अशी सरकारी कामांबाबत होणारी टिका रास्त असली तरी काही विभाग मात्र याला अपवाद ठरत आहेत. विश्वास बसत नाहीये? मग आरटिओ विभागाने दिलेल्या सुविधा तुम्हाला ठाऊकच नाहीत.

‘सरकारी काम, सहा महिने थांब’ या म्हणीला छेद आरटिओ विभागाने आपली ऑनलाईन सुविधांची गाडी सुसाट वेगात धावत आहे. मात्र या सुविधेबाबत नागरिकांना फारशी माहितीच नसल्याने आपुसकच आपले नुकसान होत आहे.

यापूर्वीपर्यंत नव्या वाहनाचं रजिस्ट्रेशन, लायसन्स काढणं, किंवा लायसन्सचं नुतनीकरण, लायसन्समध्ये नाव, पत्ता यामध्ये होणारा बदल या कामांसाठी एजेंट्स अर्थात मध्यस्तांवर अवलंबून रहावं लागत होतं.

एजंट्सची माहिती घेणं, त्याच्याशी वारंवार संपर्क करणं, आपली कागदपत्र त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची खटपट आणि ही सगळी मेहनत केल्यानंतर त्याची फी म्हणून आपल्या खिशाला लागणारी कात्री हा एकंदरित मनस्तापाचा प्रकार होता.

 

tension inmarathi

 

तुमच्यापैकी अनेकांनी अनेकदा या परिस्थितीचा सामना केला असेल. मात्र “अडला हरी…” म्हणत एजंट्सची मदत घेण्याखेरीज पर्याय नाही हीच आपली समजूत असते.

एकंदरित या प्रक्रियेला होणारी दिरंगाई आणि आपल्या बिझी रुटिनमध्ये वेळेची कमतरता यांचं गणित जुळत नसल्यानी एजंट्सची निवड योग्य असली तरी आता हा समज आता मात्र आपण पुसून टाकायला हवा.

लायसन्सचे नुतनीकरण करताना किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकाराचा बदल करण्यासाठी यापूर्वीपर्यंत आरटिओच्या ऑफिसमध्ये अनेकदा खेपा माराव्या लागायच्या. मात्र आत्ताही हीच परिस्थिती कायम असेल असं तुम्हाला वाटतंय? मग हे वाचाच.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं काय करायचं? तर sarathi.parivahan.gov.in या वेबसाईटची मदत घेतली तर आरटिओमधील तुमच्या अनावश्यक खेपा टळतील यात शंका नाही.

 

sarthi inmarathi

हे ही वाचा – अत्यंत महत्त्वाचं असलेलं पॅनकार्ड आता ‘ऑनलाईन’ सुद्धा मिळवता येतं… कसं ते वाचा!

यापूर्वीपर्यंत ज्या कामांसाठी आपण एजंट्सना अतिरिक्त शुल्क द्यायचो ती सगळी प्रक्रिया या वेबसाईटच्या मदतीने तुम्हाला एका क्लिकवर करता येईल.

कशी कराल प्रक्रिया?

१. या वेबसाईट वर जाऊन ‘ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स’ ऑप्शन निवडायचा. त्यात ड्रायव्हिंग लायसन्स नुतनीकरण अथवा ड्रायव्हिंग लायसन्सवरील नाव, पत्ता अथवा मोबाईल नंबर अशी कोणतीही बदलणे या प्रकारे आपल्याला हवी असलेली सर्विसेस निवडाची.

२. नूतनीकरणासाठी आपण आपला जुना ड्रायव्हिंग लायसन्स नंबर आणि जन्म तारीख टाकली की, सिस्टीममध्ये आपोआपच जुन्या लायसन्स वरील सर्व माहिती तपशील दिसून येतो.

३. ती माहिती पूर्णपणे बरोबर असल्याची खात्री करत एका क्लिकवर त्याचे कन्फर्मेशन द्यायचे. कोणत्या राज्यामधून, कोणत्या आरटीओ कार्यालयामध्ये आपले लायसन्स नूतनीकरण करू इच्छितो हे निवडायचे.

 

driving liacance inmarathi

 

४. त्यानंतर फॉर्म १ भरण्याची प्रक्रिया असून त्यामध्ये आपल्या आरोग्याची माहिती नोंदवायची आहे. यामध्ये देखील दोन भाग असून सुरवातीला आपल्याला स्वतःची प्राथमिक माहिती भरायची असून दुस-या टप्प्यात डॉक्टरांकडून मिळालेले फिटनेस सर्टिफिकेट जोडायचे आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत हे सगळे फॉर्म्स लिखीत स्वरुपात भरावे लागत असल्याने आरटिओच्या चकरा माराव्या लागायच्या. मात्र आता एका क्लिकवरच तुम्ही ही माहिती भरू शकता. इतकंच नव्हे तर डॉक्टरांकडून मिळालेलं सर्टिफिकेटचा फोटो काढून ते घरबसल्या ऑनलाईन जोडू शकतो.

५. वेबसाईवर विचारण्यात आलेली सर्व कागदपत्रे दिलेल्या नियमानुसार त्याच फाईल साईज मध्ये अपलोड करून ठेवायची.

६. प्रक्रियेच्या अंतीम टप्प्यात शुल्क भरायचे असून ही प्रक्रिया तर अत्यंत सोपी करण्यात आली आहे. यामध्ये तुमच्या स्क्रीनवर दिसणारे शुल्क तुम्ही ऑनलाईन पेमेंट सर्व्हिसने भरू शकता. शिवाय त्याची पावतीही तुम्हाला तातडीने मिळते.

 

driving liacance 2 inmarathi

हे ही वाचा – जाणून घ्या ड्रायव्हिंग लायसन्सचे प्रकार, फायदे आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा?

६. लायसन्सवरील नाव बदलायचे असल्यास त्याबद्दलचा फॉर्म देखील भरून ठेवा तसेच त्यासाठी लागणारे प्रूफ जसे की वृत्तपत्रातील बातमी अथवा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये छापलेले बदललेले नाव, ही कागदपत्रे जोडू शकता

पुण्यातील डॉ. सुचिता दाभाडकर यांनी नुकतीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. आपला अनुभव मांडताना त्या म्हणतात, ” एकंदरितच ही प्रक्रिया अत्यंत सुकर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पारदर्शी झाली आहे याचा आनंद आहे. सरकारी कामाची व्याख्याच बदलल्याची भावना या प्रक्रियेमुळे निर्माण झाली. कोणत्याही मध्यस्थांविना आणि अतिरिक्त शुल्क न भरता ही प्रक्रिया अवघ्या काही मिनीटांतपूर्ण झाली. घरबसल्या ही प्रक्रिया केल्याने पूर्ण केल्याने प्रत्यक्ष आरिटिओमधील भेटीदरम्यान कोणतीही अडचण आली नाही. किंबहूना सर्व कागदपत्रांची पूर्तता असल्याने जवळच्या आरटिओ कार्यालयातही लवकर कामपूर्ण झाले. 

या चूका टाळा

ही प्रक्रिया पूर्ण करताना काही महत्वाच्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. अन्यथा ही सुविधा मिळूनही त्याचा लाभ घेता येणार नाही.

१. वेबसाईटवर नोंदणी करताना ‘ऑनलाईन’ हाच ऑप्शन निवडणे गरजेचे आहे. तिथे ऑफलाईन हा देखील पर्याय उपलब्ध असल्याने यामध्ये गोंधळ होवू शकतो.

२. वेबसाईटवर कागदपत्र नोंदवलेल्या साईजमध्येच जोडावी लागतात. अर्थात ही साईज आपल्याला आपल्या मोबाईलव्दारे कमी अधिक करता येते.

३. ही प्रक्रिया करण्यापूर्वीच तुमच्या सगळ्या डॉक्युमेंट्सची जमवाजमव करून ठेवा म्हणजे प्रत्यक्ष प्रक्रियेदरम्यान वेळ वाया जाणार नाही.

४. डॉक्टरांकडून मिळणारे फिटनेस सर्टिफिकेट प्रक्रियेपूर्वीच मिळवणे गरजेचे आहे. अन्यथा त्याशिवाय ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

५. शुल्क भरण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. पैसे भरल्यानंतर मिळालेल्या पावतीची प्रिंटआऊट कॉपी जपून ठेवा.

६. सर्व कागदपत्रांच्या प्रिंटआऊट्स काढून त्याचा संच बनवा म्हणजे आरटिओमधील नियोजित वेळेतील भेटीत कोणतीही दिरंगाई अथवा धावपळ होणार नाही.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एका महिन्यात तुमच्या घरी नुतनीकरण झालेला लायसन्स मिळेल.

 

driving inmarathi

 

सरकारी कामांसाठी मध्यस्तांचीच गरज भासते. त्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागते या सगळ्या तक्रारी पुसण्याची व्यवस्था आरटिओने केली आहे. गरज आहे ती फक्त नागरिकांनी सतर्क रहात आपल्याला देण्यात आलेल्या सुविधांचा लाभ घेणं गरजेचं आहे. 

इंटरनेटचचा वापर हल्ली सर्वच वयोगटातून केला जातो. सोशल मिडिया अथवा इतर कामांसाठी इंटरनेट वापरताना सरकारी सुविधांसाठीही याचा वापर कसा करता येईल? त्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागेल? याची माहिती वेगवेगळ्या वेबसाईट्सवर उपलब्ध आहे. ती माहिती वाचून त्यात सहभागी होण्याची गरज आहे.

ऑनलाईन प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढला तर इतर अनेक विभागांकडूनही अशा प्रकारच्या सुविधा मिळतील आणि दलालांची साखळी तोडून नागरिकांना पारदर्शी व्यवहार करता येतील.

हे ही वाचा – प्रॉपर्टी डिस्प्युट आणि ७/१२ मुळे होणाऱ्या वादांना ब्रेक लावण्यासाठी महाराष्ट्रानेही उचलले ठोस पाऊल

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?