' सावधान: गरजेपेक्षा जास्त प्रमाणात होणारी लघवी संकेत आहे ‘या’ गंभीर आजारांचा – InMarathi

सावधान: गरजेपेक्षा जास्त प्रमाणात होणारी लघवी संकेत आहे ‘या’ गंभीर आजारांचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागते का? रात्री देखील लघवीमुळे चार-पाच वेळा उठावं लागतं का? होणाऱ्या लघवीचं प्रमाण हे खूप जास्त आहे का? या प्रश्नांची उत्तरे जर ‘हो’ असतील तर आपल्याला काही गंभीर आजार होऊ शकतात. त्याचेच हे संकेत मानावे लागतील.

अर्थात त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. आपलं शरीर आपल्याला होऊ शकणाऱ्या त्रासाची कल्पना देत असतं, पण आपण आपल्या कामाच्या गडबडीत स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. आणि नंतर हीच गोष्ट गंभीर स्वरूप धारण करू शकते.

 

woman washroom inmarathi

 

आपल्या मूत्राशयात दर तासाला ७० ते ८० मिलीलीटर मूत्र तयार होत असते. जोपर्यंत मूत्राशय भरत नाही, तोपर्यंत माणसाला लघवीला जाण्याची गरज नसते. मुत्राशय पूर्णक्षमतेने भरलं की मग मात्र त्याचं विसर्जन करणं आवश्यक असतं.

जर वेळेत मूत्रविसर्जन केलं नाही तरी किडनीवर प्रेशर येतं आणि त्यातून देखील मूत्राशयात जंतुसंसर्ग होऊ शकतो. म्हणूनच दिवसभरातून साधारण चार ते आठ वेळा टॉयलेटमध्ये जाण्याची गरज पडते.

पण जर हे प्रमाण आठपेक्षा जास्त असेल आणि रात्रीदेखील वारंवार लघवीसाठी उठावं लागत असेल, तर याचा अर्थ असा आहे, की तुम्ही जरुरीपेक्षा जास्त पाणी पीत आहात. त्यामुळेच किडनीवर प्रेशर येतं आणि किडनीचे आजार होतात.

आता कोण कोणत्या परिस्थितीत जास्त वेळा लघवी होऊ शकते?

डायबिटीज / मधुमेह:

लघवीला वारंवार जावे लागणे आणि होणाऱ्या लघवीचे प्रमाणही जास्त असेल तर टाईप वन आणि टाईप टू प्रकारचा डायबिटीज होण्याची शक्यता अधिक असते. लघवीद्वारे आपल्या शरीरात न वापरली गेलेली साखर आपले शरीर बाहेर टाकत असते.

 

diabetes inmarathi

 

अर्थात शरिरात सातत्याने अशी लक्षणं दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला  घेत तपासणी करून शंकामुक्त व्हा.

प्रेग्नेंसी

स्त्रियांच्या गरोदरपणाच्या काळात स्त्रियांना वारंवार लघवीला जावे लागते. कारण गर्भाशयाचा आकार वाढत असतो आणि त्याचाच दबाव मूत्राशयावर येतो.

 

pregnanat Indian 3 Inmarathi

 

गरोदरपणात वारंवार होणारी लघवी ही बाब सामान्य असली तरी त्याचं प्रमाण वाढल्याचं लक्षात येत असेल तर ही धोक्याची घंटा असू शकते.

प्रोस्टेटचा त्रास

पुरुषांच्या शरीरातील प्रोस्टेट ग्रंथी वाढतात. ज्यामुळे युरेथ्रावर म्हणजेच मूत्र वाहून नेणाऱ्या नळीमध्ये अडथळा येतो. त्यामुळे मूत्राशय संकुचित होत जाते आणि थोडी थोडी लघवी साठली तरी लघवीची भावना होते, आणि वारंवार लघवीला जावे लागते.

 

man urine

 

वयाच्या पन्नाशीनंतर बर्‍याच पुरुषांना हा त्रास होऊ शकतो.

शरीरांतर्गत असलेली अज्ञात कारणे

कधीकधी शरीरात काहीतरी बिघाड होतो आणि त्याचा ताण किडनीवर येतो त्यामुळे किडनी इन्फेक्शन होते.

 

Kidney Pain Feature InMarathi

 

किडनीमध्ये जंतुसंसर्ग होतो आणि आपल्या ओटीपोटात आणि मूत्राशयात वेदना सुरू होतात आणि वारंवार लघवी येते.

स्ट्रोक किंवा मेंदूशी निगडीत आजार

जर स्ट्रोक आला किंवा मेंदू मधील किडनीशी निगडीत मज्जातंतूंना धक्का बसला तर किडनीचे काम व्यवस्थित चालत नाही आणि मग पेशंटमध्ये मूत्र बाहेर टाकण्याच्या क्रियेवर नियंत्रणही राहत नाही. त्यावेळेस सतत यूरिनेशन होत राहते.

 

brain inmarathi

 

याशिवाय मूत्राशयाचा कॅन्सर, मुत्राशयाचे बिघडलेले कार्य, रेडिएशन या सगळ्यामुळे देखील वारंवार लघवीला जावे लागू शकते.

वारंवार लघवीला जाणे कदाचित एक समस्या नसेल, पण ज्या लोकांमध्ये मूत्राशय पूर्ण क्षमतेने भरत नाही, तरीदेखील लघवीची भावना होत राहते आणि वारंवार लघवीला जावे लागते हेच जास्त घातक आहे.

यामुळे आपल्या रोजच्या जगण्यातदेखील अडचण निर्माण होते. वारंवार लघवीला जावे लागण्याबरोबरच जर ताप, अशक्तपणा, थंडी वाजून येणे, लघवीतून रक्त जाणे, लघवीचा रंग बदलणे, लघवी करताना वेदना आणि जळजळ होणे इत्यादी गोष्टी घडत असतील तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य.

 

urine inmarathi

 

वारंवार लघवीला जावे लागणे, याची देखील कारणे आहेत.

तुमची काही मेडिकल हिस्ट्री असेल आणि काही गोळ्या औषधे सुरू असतील तर त्या औषधांमुळे देखील वारंवार लघवीला जावे लागू शकते.

लघवी दिवसात जास्त वेळा होते की रात्री देखील उठावं लागतं हेदेखील पाहिलं जातं.

तुम्ही नेहमी पेक्षा जास्त लिक्विड इंटेक घेता का हेदेखील पाहिलं जातं. म्हणजे बऱ्याचदा डायट करताना ताक, एनर्जी ड्रिंक, सरबत, ज्यूसेस, सूप यांचं प्रमाण जास्त असेल तर वारंवार लघवीला जावे लागू शकते.

 

green juice inmarathi

 

त्याचबरोबर चहा कॉफीचं प्रमाण जास्त असेल किंवा अल्कोहोल घेण्याची सवय असेल तरीदेखील वारंवार लघवीला जावे लागू शकते.

तसेच थंड हवामानात राहणार्‍यांना आणि एसी मध्ये राहणार यांनादेखील जास्त वेळा लघवीला जावे लागू शकते.

या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मग डॉक्टर तुम्हाला काही टेस्ट सांगतात. ज्यामध्ये यूरिन कल्चर एक प्राथमिक स्वरूपाची टेस्ट असते. यामध्ये मुत्राचा विश्लेषण केलं जातं आणि नक्की कशामुळे हा त्रास होतोय हे शोधलं जातं. आणि खरोखरच प्रॉब्लेम असेल तर सिस्टोस्कॉपी, सिस्टोमेट्री या टेस्टद्वारे त्याचं निरीक्षण केलं जातं याद्वारे मूत्राशयावर किती प्रेशर येतं याचा अंदाज घेतला जातो.

अल्ट्रा सोनोग्राफीद्वारेही मूत्राशयातला बिघाड तपासता येतो. तसेच न्यूरोलॉजिकल चाचण्या घेऊन देखील मूत्राशयातील मज्जातंतूचा बिघाड ओळखता येतो.

वारंवार लघवीला जाणे हे काही जणांच्या बाबतीत दुर्दैवाने खूपच घातक ठरते.

डायबिटीज, मूत्राशयातील जंतुसंसर्ग याबरोबरच किडनी निकामी होणे देखील घडू शकते. ओटीपोटात संसर्ग होऊन लैंगिक आजार देखील जडू शकतात. किडनीचा कॅन्सरही होऊ शकतो. काहीजणांना एन्झायटीचा त्रासही सहन करावा लागतो.

जास्त तहान आणि भूक लागू शकते त्यामुळे काही जणांचे वजन वाढते. तर होणाऱ्या त्रासामुळे काही जणांचे वजन कमी होते.

 

===

===

 

जर मूत्राशयाचे आजार टाळायचे असतील तर

१. आहारामध्ये जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळावेत.

 

spicy food inmarathi

 

२. चहा कॉफी आणि मद्य हे अति प्रमाणात घेऊ नयेत.

३. आहारामध्ये जास्त चोथायुक्त पदार्थांचे सेवन करावे. चॉकलेट,आर्टिफिशियल स्वीटनर यांचा वापर टाळावा.

४. डायबिटीज मधील रक्तातील शर्करा योग्य राहण्यासाठी उपचार घ्यावेत.

५. अगदी झोपायला जाताना पाणी पिऊ नये.

६. ओटीपोटातील स्नायू मजबूत करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करावा.

 

yoga inmarathi

 

७. थोडा जरी त्रास जाणवला तर लगेचच डॉक्टरांना दाखवावे. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?