' मल्टिप्लेक्सच्या झगमगाटात मुंबईतील जुन्या, लाडक्या थिएटर्सचं काय होतंय? जाणून घ्या… – InMarathi

मल्टिप्लेक्सच्या झगमगाटात मुंबईतील जुन्या, लाडक्या थिएटर्सचं काय होतंय? जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सर्वच शहरातून सिंगल स्क्रिन थिएटर्स जाऊन आता त्याजागी मल्टिस्क्रिन मल्टिप्लेक्स उभी राहू लागलेली आहेत. मुंबईत मात्र अजूनही काही जुनी थिएटर्स उभी आहेत.

सिनेमाच्या सोनेरी दिवसांची साक्षिदार असणारी ही थिएटर्स आज मोडकळीस आलेल्या अवस्थेत असली तरिही ती मुंबईची जान आणि शान आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

दादरचा लॅण्डमार्क असणारं चित्रा थिएटर लवकरच पाडलं जाणार आहे. आणखी एक सिंगल स्क्रिन थिएटर काळाच्या रेट्यात नामशेष होत आहे.

 

chitra inmarathi

 

कोणे एकेकाळी हाऊसफ़ुलचे बोर्ड पाहिलेली, महान चित्रपटांचे प्रिमियर्स झालेली, पांच का दो पांच का दो ची दबक्या आवाजातली तिकिट विक्री ऐकलेली, इंटरवलला कॅम्पाकोला, सामोसा विकलेली आणि तिकिटांच्या रांगा लागलेली मुंबईतली सिंगल स्क्रिन थिएटर्स आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

मल्टिप्लेक्सनी सिंगल स्क्रिन थिएटर्सची सत्ता संपुष्टात आणली असली तरिही काही जुनी थिएटर्स आजही तग धरून आहेत. ही सर्व थिएटर्स थोडी थोडकी नाहीत तर पन्नास शंभर वर्षांहून अधिक जुनी आहेत.

कोणे एकेकाळी हिंदी सुपरस्टार्सच्या उपस्थितीने ग्लॅमर अनुभवलेली ही थिएटर्स आज मात्र दूर्लक्षावस्थेत आहेत. गंमत म्हणजे यातली अनेक थिएटर्स ही ग्रॅण्ट रोड भागात आहेत. एकेकाळी सिनेमा हब असणारा ग्रॅण्ट रोड आज ही मोडकळीला आलेली थिएटर्स घेउन उभा आहे.

 

cinema hall inmarathi

 

यापैकी अनेक थिएटर्स ही सुरवातीच्या काळात चक्क नाट्यगृहं होती मात्र नंतर सिनेमाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांचं रुपांतर सिनेमागृहात करण्यात आलं.

कॅपिटॉल सिनेमा, फ़ोर्ट-

छत्रपती शिवाजी टर्निनसच्या बरोबर समोर असलेलं ही थिएटर १८७९ साली बांधलेलं आहे. कुंवाजी पघटीवाला यांनी हे थिएटए बांधलं.

सुरवातीच्या काळात हे नाट्यगृह होतं मात्र सिनेमाची वाढती लोकप्रियता बघून १९२८ साली त्याचं सिनेमागृहात रूपांतर करण्यात आलं.सुरवातीला ब्रिटिश सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्यानंतर अनेक ब्रिटिश चित्रपट इंग्रजांनी या थिएटरमधे चालविले.

 

capital inmarathi

 

या थिएटरची मॅजमेंट ग्लोब थिएटर्सकडे आहे. कुलाबा येथील प्रसिध्द रिगल थिएटर ग्लोब थिएटर्स यांच्या मालकीचं आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून काहीही डागडुजी न केल्यानं थिएट वाईट अवस्थेत उभं आहे.

अल्फ़्रेड थिएटर्स, ग्रॅण्ट रोड

१८८० साली हे थिएटर रिपॉन या नावानं सुरू करण्यात आलं आणि १९३२ साली याचं नाव बदलून अल्फ़्रेड असं करण्यात आलं.

 

alfred cinema inmarathi

 

कोणे एकेकाळी एकापेक्षा एक हिट हिंदी सिनेमे इथे प्रदर्शित झालेले असले तरिही सध्या या चित्रपटगृहात सी ग्रेड सिनेमेच दाखवले जातात.

इम्पिरियल सिनेमा, ग्रॅण्ट रोड

१९०५ साली ऑक्रेस्ट्रा थिएटर म्हणून याची सुरवात झाली. १९०५ नंतर मात्र स्वस्ताली तिकिटं असणार्‍या भोजपुरी सिनेमांचं थिएटर अशी याची ओळख बनली.

 

impirial cinema inmarathi

 

अगदी मामुली म्हणजे ३० ते ५० असा दर असणारी तिकिटं असणारे सिनेमे इथे प्रदर्शित होतात. विशेषत: मध्यप्रदेशातून आलेला कामगारवर्ग या ठिकाणी आजही सिनेमा बघायला येतो. या चित्रपटगृहाच्या अवतीभवती पांढरे शुभ्र पिलर्स असल्यानंच याला इम्पिरियल हे नाव देण्यात आलं.

रॉयल टॉकिज ग्रॅण्ट रोड

१९११ साली सुरु झालेलं हे थिएटर माहिती पट आणि नाटकांसाठी ओळखलं जातं. याठिकाणी सहाशे प्रेक्षक बसू शकतील इतकी याची क्षमता आहे.

 

royal cinema inmarathi

 

१९३० पासून या थिएटरमधे सिनेमांची स्क्रिनिंग होऊ लागली. या स्क्रिनिंगना चित्रपटसृष्टितील अनेक लोकप्रिय कलावंत हजेरी लावत असत.

एडवर्ड थिएटर-, धोबी तलाव

पूर्वी हे थिएटर ‘किंग एडवर्ड’ या नावानं ओळखलं जायचं.

या चित्रपटाची एक खास ओळख म्हणजे, १९७४ साली प्रदर्शित झालेला जय संतोषी मां हा चित्रपट. हा चित्रपट त्याकाळी महिलावर्गानं इतका डोक्यावर घेतलेला होता की, थिएटरचं रुपांतर जवळपास मंदिरात झालं होतं. हा सिनेमा बघायला येताना महिला ओटिचं सामान, ओवाळण्याची थाळी घेऊन जात असत.

 

 

edward

 

एकेकाळी प्रचंड वैभव बघितलेलं हे थिएटर आज शेवटच्या घटका मोजत आहे. अत्यंत सुंदर असं स्थापत्यशस्त्रा असलेलं हे थिएटर आज जेमतेम तीस चाळीस प्रेक्षकांना सिनेमा दाखवत आहे.

न्यू रोशन टॉकिज, ग्रॅण्ट रोड

ग्रॅण्ट रोडच्या प्रसिध्द दिल्ली दरबारच्या अगदी समोर असलेलं हे थिएटर. १९३० सालापासून हे थिएटर याठिकाणी उभं आहे.

 

ner roshan cinema inmarathi

 

या थिएटरचई मालकी पारसी कुटुंबाकडे होती. इकबाल या पारसी इसमानं हे थिएटर विकत घेतलं आणि थोडं आधुनिक पध्दतीनं याचं बांधकाम केलं. त्याच्या या नव्या रूपानंतर हे थिएटर बर्‍यापैकी चालू लागलं. मात्र पुन्हा एकदा मल्टिप्लेक्स आल्यानं या चित्रपटगृहाला अवकळा आली.

आज हे थिएटर मोडकळीस आलेलं आहे.

निशात सिनेमा, ग्रॅण्ट रोड

मुंबईचा रेड लाईट एरिया म्हणून परिचित असणार्‍या या एरियात निशात सिनेमा हे थिएटर आहे, निता पहलाज निहलानी यांच्या मालकीचं असणारं हे थिएटर भोजपुरी सिनेमांसाठी प्रसिध्द आहे.

 

nishat inmarathi

 

१५ ऑगस्ट १९५२ या दिवशी येथे पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. सध्या सिनेमागृहाची डागडुजी करण्यात आल्यानं तिकिट दर वाढविलेले आहेत मात्र पूर्वी सर्व चित्रपटांसाठी १५ ते २० रूपयांचं तिकिट होतं.

दौलत टॉकिज, ग्रॅण्ट रोड

 

doulat inmarathi

 

इतर अनेक थिएटर्सप्रमाणेच हे देखिल सुरवातीला नाट्यगृहच होतं मात्र सिनेमाची वाढती लोकप्रियता आणि नाटकांचा घटता प्रेक्षकवर्ग लक्षात घेत नाट्यगृहाचं रूपांतर सिनेमागृहात करण्यात आलं.

रिगल, कुलाबा

चार्ल्स स्टिव्हन यांनी रचना केलेलं आणि फ़्रामजी सिधवा यांनी बांधलेलं हे थिएटर. अत्यंत प्रशस्त, हवेशीर, भरपूर पार्किंगची सोय आणि वातानुकुलीत असं हे थिएटर काही वर्षांपूर्वी पुन्हा बांधण्यात आलं.

 

regal inmarathi

 

हे थिएटर त्याच्या ग्लॅमरमुळे प्रेक्षकांतच नाही तर बॉलिवुडमधेही परिचित आहे. या थिएटरमधे फ़िल्मफ़ेअर नाईटस, १७ वा मामी महोत्सव आदींचं आयोजन केलं गेलं आहे.

या चित्रपटग्रुहाचं वैशिष्ट्य म्हणजे भारातातील पहिलं वातानुकुलीत सिनेमागृह म्हणून याची लिम्का बुक ऑफ़ रेकॉर्डमधे नोंद केली गेली आहे.

मेट्रो, सीएसटी

या आर्ट डेको हेरिटेजची सुरवात १९३८ साली झाली. याठिकाणी केवळ एमजीएमचेच चित्रपट प्रदर्शित होत असत. चित्रपटगृहाच्या आत संगमरवराचं सुशोभीकरण आहे आणि जेजे स्कूल ऑफ़ आर्टची शिल्पं आहेत.

 

metro inmarathi

 

१९५५ साली फ़िल्मफ़ेर पुरस्कारांचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं. १९७० साली गुप्ता कुटुंबियाकडे याची मालकी आली आणि आजतागायत हे बॉलिवुडचं रेडकार्पेट सिनेमागृह म्हणून ओळखलं जातं.

मल्टिप्लेक्सच्या रेट्यातही हे थिएटर दिमाखात उभं आहे, याचं कारण बदलत्या काळाबरोबर याचं रूपांतरही सहा स्क्रिनच्या मल्टिप्लेक्समधे करण्यात आलं. मात्र हे करताना त्याच्या जुन्या हेरीटेज रुपाला अजिबात धक्का लावण्यात आलेला नाही.

भारतमाता चित्रपटगृह, करीरोड- भायखळा, लालबाग परळ या परिसरातील मराठी प्रेक्शकांचं हक्काचं असं हे थिएटर. गेली अनेकवर्षं या चित्रपटगृहाची डागडुजीची मागणी जोर धरुन आहे मात्र हे चित्रपटगृह मोडकळिस आलेल्या अवस्थेत वर्षानुवर्षं उभं आहे.

आजही काही प्रमाणात मराठी चित्रपट याठिकाणी प्रदर्शित होत असतात. मराठा मंदिर, मुंबई सेंट्रल- या थिएटरची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे याठिकाणी वर्षानुवर्षं चाललेला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा चित्रपट!

 

maratha mandir inmarathi

 

याच चित्रपटगृहात कोणे एकेकाळी मुघ ए आझम या चित्रपटाचा दिमाखदार प्रिमियर झालेला होता. या प्रिमियरला चित्रपटाचे हिरो दिलिप कुमार यांनी घोड्यावर बसून प्रवेश केलेला होता. याशिवाय चित्रपटगृहाच्या दाराशी हत्ती उभे केले गेले होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?