' ‘अळशी’ खाण्यात आळशीपणा नको: नावडती असली, तरी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी! – InMarathi

‘अळशी’ खाण्यात आळशीपणा नको: नावडती असली, तरी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मानवी शरीर हे निसर्गाचीच एक रचना असल्यामुळे जितकं आपण निसर्गाच्या सानिध्यात राहून, प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थांऐवजी नैसर्गिक वनस्पती, अन्नपदार्थ यांचं सेवन करू तितकंच आपल्यासाठी उपयुक्त ठरतं.

गेल्या दोन दशकांचा काळ हा आपल्या जीवनशैली मध्ये सर्वार्थाने बदल करणारा काळ ठरला. ह्या वेळेस, वेळेअभावी माणसं “जंक फूड” कडे वळू लागली व पारंपरिक अन्नपदार्थांचा आणि जिन्नसांचा आपल्याला विसर पडला. पण प्रत्येका गोष्टीचं एक चक्र असतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भूतकाळात जिथून सुरु केलं होतं, कधी ना कधी गाडी त्या ठिकाणी येऊन थांबतेच. आणि नेमकं तसंच आत्ता होतंय. जुन्या फॅशन पासून, जुन्या खान पानाच्या सवयी सुद्धा आताच्या ह्या काळात स्वीकारल्या जातायत. त्यांचं स्वरूप मात्र जरा वेगळं आहे. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे व्यायामशाळेतून केला जाणारा ज्वारीच्या भाकरीचा प्रचार, रोज एक चमचा तुप खाण्याचा प्रचार.

 

हे ही वाचा – भाजी एक फायदे अनेक! कांद्याच्या पातीचे ११ आरोग्यदायी फायदे तुम्ही वाचायलच हवेत…

ह्याच प्रमाणे असे किती तरी कडधान्यातले, भाजी पाल्यातले, बियांमधले प्रकार आहेत जे नव्याने आपल्या पर्यंत येऊन पोहोचलेत आणि जवासाच्या बिया त्यातीलच एक आहेत.

जवस आपण चटणीच्या स्वरूपात खातच आलोय, हेच जवस म्हणजेच फ्लॅक्स सिड्स आता पाश्चात्य देशां मध्ये सुद्धा फार फॅशन मध्ये आलंय. आणि तिकडून आपल्या तरुण पिढीची पुन्हा जवसाशी ओळख झालीये. तिकडे इतकं फॅड का आलं, जवासात असं काय आहे ते आज आपण पाहणार आहोत.

जवसाचे फायदे –

१) पोषक तत्त्वांनी परिपूर्ण –

जवस हे मानवी इतिहासात घेतलं जाणारं सगळ्यात जुनं पीक आहे. जवसात व्हिटॅमिन, कॅल्शियम, मिनरल्स, गुड फॅट अशी अनेक पोषक तत्व आढळतात. त्यामुळे रोज एक चमचा जवस खाण हे अपल्यासाठी अत्यंत आवश्यक आणि फायद्याचं ठरतं.

 

omega inmarathi

 

२) सर्वाधिक ओमेगा ३ फॅट्स 

शाकाहारी लोकांसाठी ओमेगा ३ चा नैसर्गिक असा कुठलाही स्रोत नाही, कारण ओमेगा ३ हे फक्त मासोळीत आढळतं. तेच ओमेगा ३ फॅट जवासाच्या बियांमध्ये सुद्धा आढळतं.

हे ओमेगा ३ फॅट्स, आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास व आपल्या हृदयाला सुदृढ ठेवण्यास मदत करतात. ह्या ओमेगा ३ फॅट्स मुळे शरीरात कुठेही गांठी होण्याचा धोका सुद्धा टाळता येतो.

३) कॅन्सर टाळण्यास उपयुक्त –

जवासाच्या बियांत इतर झाडांच्या तुलनेत, ८०० पट अधिक “Lignan” नामक कंपाउंड आढळतं. हे कंपाउंडमध्ये अँटिऑक्सिडंट आणि इस्ट्रोजन घाटक अधिक असतात. जे शरीरातील कॅन्सर पेशी मारण्यास व वाढू न देण्यास उपयुक्त असतात. त्यामुळे रोज एक चमचा जवस खाल्ल्याने आपण स्तनांचा, प्रोस्ट्रेट कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराला दूर ठेऊ शकतो.

४) फायबर युक्त बिया

संशोधकांनुसार, रोजच्या जेवणाचा काही भाग हा फायबरयुक्त असायला हवा. स्त्रियांना रोजच्या आहारातून १२% तर पुरुषांना ८% फायबरची आवश्यकता असते.

फायबर हे आपल्या आतड्याना स्वच्छ करून आपलं पचन सुधारतं, ज्यामुळे सेवन केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचं पोषण आपल्या शरीराला मिळतं आणि आपलं आरोग्य सुदृढ राहतं. शिवाय फायबर युक्त अन्नामुळे अनावश्यक फॅट आपल्या शरीरात साचून राहत नाही.

जवासात हे फायबर भरपूर प्रमाणात आढळतं. म्हणून रोजच्या आहारात जवसाचं सेवन असावंच.

५) रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदात होते –

 

doctor checking blood pressure inmarathi

हे ही वाचा – अनेक आरोग्यादायी फायदे देणारा पदार्थ तुमच्या घरात आहे! कोणता पदार्थ? जाणून घ्या.

ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्या साठू तर जवस एक वरदानच आहे. जवस हे कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेऊन हृदयाला सुदृढ ठेवतं आणि त्यात ब्लड प्रेशर कमी करणारे तत्व आढळतात. त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशर चा त्रास आहे त्यांनि तर रोज एक चमचा जवासाच्या बिया खाण्याचा नियमच करून घ्यायला हवा.

७) हाय क्वालिटी प्रोटीन ने परिपूर्ण  

जवासाच्या चे प्रोटीन असतं, ते अत्यंत उच्च दर्जाचं असतं. त्या प्रोटीन मध्ये arginine, aspartic acid and glutamic acid आढळतात. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती बळावते व शरीराच्या कुठल्याही रक्तवाहिनीत कसलाही कचरा साचून राहत नाही.

७) मधुमेहाचा त्रास कमी करण्यास उपयुक्त –

संशोधनानुसार जवासात न विरघळणारे फायबर असल्याने, मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहारात 2 छोटे चमचे जवासाच्या चटणीचा समावेश करून घेतल्याने त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण 8-15% कमी होऊ शकते.

८) वजन घटवणे –

जवासातलं फायबरचं प्रमाण हे बऱ्याच समस्यांवरचं एक रामबाण औषध आहे. ह्याच फायबर मुळे आपल्यालं पोट दीर्घकाळ भारल्यासारखं वाटतं. आणि सारखी सारखी भूक लागत नाही. ज्यामुळे सततच्या खाण्याने वाढलेलं वजन नियंत्रणात येण्यास मदत होते.

९) इतर आजार टाळण्यास उपयुक्त –

जवासात आढळणाऱ्या फायबर, lignans आणि अमिनो ऍसिडस् मुळे पार्किन्सन्स डिसीज, अस्थमा हे आजार होण्याचा धोका पण टाळता येतो.

जवासाचा गुणधर्म हा उष्णतेचा आहे. त्यामुळे ज्यांना सर्दी पडस्याचा त्रास होतो त्यांनी जवस, आलं, व गुळाचा काढा करून घेतल्यास सर्दी कमी होते व कफ पाताळ होऊन बाहेर पडतो.

 

cough-and-cold-inmarathi

 

*जवासाचा उपयोग कसा करावा व सेवन करण्याचे काही नियम –

1) साबुत किंवा संबंध जवासाच्या बियांपेक्षा, कूट किंवा जवासाच्या चटणीचा उपयोग करावा. जवासाच्या बियांवर असलेली परत आपल्या आतड्यांना भेडणे शक्य नसते. ज्यामुळे त्यातून मिळणारे पोषण हे कूट करून घेतलेल्या बियांपेक्षा कमी असते.

2) जवासाच्या तेलापेक्षा बियांना प्रधान्य द्यायला हवे. तेलातून फायबर मिळण्याचे प्रमाण भरपूर कमी होते.

javas oil inmarathi

 

3) गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच जवासाचा आपल्या आहारात समावेश करावा.

4) कमी रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी जवासाचं आठवड्यातून 2-3 वेळच सेवन करावं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेवन करावं.

5) आपल्याला दिवसातून फक्त 10 ग्राम म्हणजे 1 चमचा जवसाचे सेवन करण्याची गरज असते. त्यामुळे चवीला छान लागतं म्हणून अधिक प्रमाणात ह्याचे सेवन करणे टाळावे.

6) जवासाच्या बिया आणि पावडर नेहमीच हवाबंद बरणीत ठेवावी.

7) जवासाची चटणी, बिस्कीट, मफिन, स्मुदी ह्यांसारखे विविध पदार्थ बनवून आपण आपल्या आहारात याचा समावेश करू शकता.

===

हे ही वाचा – काकडीचे ‘सगळे’ फायदे माहित नसतील, तर आरोग्य उत्तम राखणं खूपच कठीण जाईल!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?