'बुर्ज खलिफा पेक्षाही लांब आणि हटके आकाराची इमारत न्युयॉर्क मध्ये उभी राहणार!

बुर्ज खलिफा पेक्षाही लांब आणि हटके आकाराची इमारत न्युयॉर्क मध्ये उभी राहणार!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

जगातील सर्वात लांब इमारत कोणती? असा प्रश्न विचारला की लगेच उत्तर येतं- दुबईची बुर्ज खलिफा. ही ईमारत सर्वात उंच देखील आहे आणि सर्वात लांब देखील!

Burj-Khalifa-Tower-marathipizza
alldubai.ae

पण या इमारतीला मिळालेले हे भूषण लवकरच दुसरी एक इमारत हिसकावून घेईल असे म्हटले तर वावगे ठरू नये. म्हणजेच बुर्ज खलिफा ही इमारत जगातील सर्वात लांब इमारत राहणार नाही. ती दुसऱ्या क्रमांकावर घसरणार आहे. (अर्थात जगातील सर्वात उंच इमारतीचा तिचा मान तसाचं राहणार आहे.)

या मागचं कारण म्हणजे न्युयॉर्कच्या प्रसिद्ध मॅनहॅटन शहरामध्ये उभी राहणार आहे जगातील सर्वात लांब इमारत!

the-big-bend-marathipizza01
boredpanda.com

Oiio Studio ही कंपनी या इमारत उभारणीचे कामकाज सांभाळेल. ही कंपनी त्यांच्या हटके बिल्डींग डिजाईन साठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे आणि जगातील सर्वात लांबीची इमारतीची डिजाईन देखील त्यांनी हटकेचं ठेवली आहे. इंग्रजी अक्षर U उलटा केल्यावर कसा दिसेल तशी या इमारतीची डिजाईन आहे.

मॅनहॅटन शहरामध्ये इमारतीच्या उंचीवर काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत,. त्यामुळे इमारत सरळसोट उंच न उभारता या अश्या वेगळ्या डिजाईन मध्ये उभारण्याचा कंपनीचा मनसुबा आहे.(अन्यथा या इमारतीने जगातील सर्वात उंच इमारतीचा मान देखील मिळवला असता.)

the-big-bend-marathipizza02
boredpanda.com

या इमारतीचे नाव तिच्या स्वरूपाला साजेसे म्हणजे The Big Bend असे ठेवण्यात येईल.

the-big-bend-marathipizza02
boredpanda.com

संपूर्ण इमारतीची लांबी अंदाजे ४००० फुट असेल. त्यामुळेच ही इमारत उभारताना इंजिनियर लोकांचा चांगलाच कसं लागणार हे मात्र नक्की!

the-big-bend-marathipizza03
boredpanda.com

इमारतीमध्ये मध्ये अश्या लिफ्ट बसवण्यात येणार आहेत, ज्या जेथे इमारत वाकली आहे त्या भागात देखील सहज काम करू शकतील.

the-big-bend-marathipizza04
boredpanda.com

या इमारतीचे बांधकाम कधी सुरु होणार हे अजूनही घोषित करण्यात आलेले नाही, परंतु जर ही इमारत प्रत्यक्षात अवतरली तर मात्र आपल्याला इंजीनियरिंगचा आजवरचा जगातील सर्वात अद्भुत चमत्कार पाहायला मिळेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?